आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

Casting Buzz: \'ढिशुम’मध्ये समलैंगिकच्या भूमिकेत दिसणार अक्षय कुमार?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिग्दर्शक रोहित धवनच्या ‘ढिशूम’मध्ये अक्षय कुमार एका खास भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटात त्याची भूमिका ही एका समलैंगिक व्यक्तीची असल्याचे समजते. वरुण धवन, जॉन अब्राहम आणि जॅकलिन फर्नांडिसचादेखील चित्रपटात समावेश असून यांनी नुकतेच मोरोक्कोमधील शूटिंग शेड्यूल पूर्ण केले आहे. अक्षयच्या भूमिकेचे अद्याप शूटिंग झाले नसून त्याने आपण ही भूमिका साकारणार की नाही हे अद्याप निश्चितरीत्या कळवले नाही. मात्र, त्याला ही भूमिका आवडल्याचे सांगण्यात येते.
अक्षय यापूर्वी रोहितच्या ‘देसी बॉयज’मध्येदेखील दिसला होता. जॅकलिनने अक्षयसोबत ‘ब्रदर्स’चे शूटिंग पूर्ण केले आहे. रोहित अक्षयला आपला ‘लकी मॅन’ मानतो त्यामुळे खास भूमिकेच्या माध्यमातून तो अक्षयचा ‘ढिशूम’मध्ये समावेश करू इच्छितो.