एमी जॅक्सनला एक्स-बॉयफ्रेंडशी / एमी जॅक्सनला एक्स-बॉयफ्रेंडशी बोलण्याची नाहीये इच्छा, मैत्रीसुध्दा ठेवली नाही

सलोनी अरोरा

Oct 06,2015 03:10:00 PM IST
मुंबई: अलीकडेच अक्षय कुमार स्टारर 'सिंह इज ब्लिंग' सिनेमा झळकलेली एमी जॅक्सन कधीकाळी अभिनेता प्रतीक बब्बरची गर्लफ्रेंड होती. परंतु आता बॉलिवू़डमध्ये परल्यानंतर तिला प्रतीकसोबत बोलण्याचीसुध्दा इच्छा नाहीये. एमीने प्रतीकसोबत 'एक दीवाना था' सिनेमातून बॉलिवू़डमध्ये पदार्पण केले. यादरम्यान दोघांमध्ये जवळीक वाढली. दोघांचे प्रेम इतके पुढे गेले, की प्रतीकने हातावर एमीच्या नावाचे टॅटूसुध्दा गोंदवून घेतले होते. परंतु दोघांचे नाते जास्त काळ टिकू शकले नाही. काही दिवसांतच दोघांचे ब्रेकअप झाले.
आता एमीने अक्षयसोबत बॉलिवूड सिनेमांत एंट्री केली आहे. ती प्रभूदेवाच्या या सिनेमाला स्वत:चे लाँच पॅड मानते. प्रतीकसोबतच्या सध्याच्या नात्यावर एमीने सांगितले, 'मी बॉलिवूडमध्ये पुन्हा आले आहे, मात्र प्रतीक भेटले नाहीये. आमच्या दोघांचे आयुष्य वेगळे आहे. मी माझ्या कामात व्यस्त आहे. आता आम्ही मित्रसुध्दा नाहीये. बॉलिवू़डमध्ये आल्यापासून मला वेळही भेटला नाहीये आणि प्रतीकसोबत बोलावे याचा विचारसुध्दा मनात आला नाहीये.'
सध्या कोणत्याच नात्यासाठी तयार नाहीये-
आयुष्यात पुढे कुणाशी नाते निर्माण करण्याविषयी एमी सांगते, 'मी सध्या कोणत्याच रिलेशनशिपसाठी तयार नाहीये. मी माझ्या करिअरवर लक्ष केंद्रीत करत आहे. मी 'आय' हा दक्षिणात्य सिनेमा केला. विक्रम आणि शंकर यांच्यासोबत मोठे सिनेमा आयुष्यात कदाचित एकदाच करण्याची संधी मिळते. हिंदी सिनेमांत अक्षयसोबत एंट्री करणेसुध्दा मोठी गोष्ट आहे.'
हॉर्स रायडिंगमध्ये पटाईत आहे एमी-
एमी हॉर्स रायडिंगमध्ये मजबूत खेळाडू आहे. ती वयाच्या दुस-या वर्षीपासून हॉर्स रायडिंग करते. तिची आई हॉर्स रायडिंग ट्रेनर होती, म्हणून तिने बालपणीच रायडिंग शिकली. तिच्या या कौशल्यामुळे अक्षयच्या रिलीज झालेल्या 'सिंह इज ब्लिंग'मध्ये एमीने हॉर्स रायडिंग केली आहे. एमी सांगते, 'दिग्दर्शक प्रभूदेवाने मला विचारले, की तुझा छंद काय आहे? मी सांगितले हॉर्स रायडिंग. त्यानंतर त्यांनी अक्षयसोबत माझा हॉर्स रायडिंगचा सीन जोडला. त्यासाठी मी डबल बॉडीचा वापर केलेला नाहीये.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा पूर्वी कशी होती एमी जॅक्सन आणि प्रतीक बब्बरची लव्ह केमिस्ट्री...
X
COMMENT