Home | Parde Ke Pichhe | Bollywood Celebs Who Does Not Celebrate Holi

तापसी पन्नू नाही खेळत होळी, हे 4 बॉलीवुड सेलेब्स देखील रंगांपासून राहतात दूर

दिव्य मराठी वेब टीम | Update - Mar 02, 2018, 03:39 PM IST

होळी रंगांचा उत्सव आहे आणि बॉलीवुड सेलेब्स हा सन अतिशय उत्साहात साजरा करतात. अमिताभ बच्चन, जावेद अख्तर, अनिल कपूर आणि एक

 • Bollywood Celebs Who Does Not Celebrate Holi

  मुंबई- होळी रंगांचा उत्सव आहे आणि बॉलीवुड सेलेब्स हा सन अतिशय उत्साहात साजरा करतात. अमिताभ बच्चन, जावेद अख्तर, अनिल कपूर आणि एकता कपूरसह अनेक सेलेब्स असे आहेत जे दरवर्षी होळीच्या दिवशी पार्टी होस्ट करतात. परंतु, या वर्षी श्रीदेवी यांचे निधन झाल्याने बॉलीवुडचे अनेक सेलिब्रेशन रद्द झाले. परंतु, तुम्हाला माहिती आहे का? बॉलीवुडमध्ये असेही काही सेलेब्स आहेत, जे कधीच होळी साजरी करत नाहीत. पाहूयात कोणते आहेत ते सेलेब्स....?

  तापसी पन्नू
  तापसी म्हणते की, घरी मोठ्या मुश्किलीने होळी सेलिब्रेट करते. माझे कुटुंबीय रंगांची होळी खेळत नाही. त्यामुळे मी देखील त्यांच्यासोबत हॉटेलमध्ये राहते आणि त्यांच्यासोबतच होळी साजरी करते.


  पुढील स्लाइडवर पाहा हे चार खेळाडू देखील नाही खेळत होळी...

 • Bollywood Celebs Who Does Not Celebrate Holi

  कीर्ती सेनन
  कीर्ती सेनन म्हणते की, ती तशी होळी खेळत नाही, जशी ती तिच्या गावी खेळत होती. ती सांगते की, मी जास्त होळी खेळत नाही. दिल्लीप्रमाणे येथे माझे फ्रेन्ड सर्कल नाही. याशिवाय अभिनेत्री असल्यामुळे मला माझ्या स्किनची काळजी देखील करावी लागते.

 • Bollywood Celebs Who Does Not Celebrate Holi

  रणवीर सिंह
  - 'गोलियों की रासलीला' आणि 'पद्मावत' सारख्या फिल्मस मध्ये होळी सीन करणारा अभिनेता रणवीर सिंह खऱ्या आयुष्यात हा सन साजरा करत नाही.
  - एका मुलाखतीत तो कारण सांगताना म्हणाला होता की, मी होळी सण मानत नाही. मी स्वच्छतेबाबात अतिशय सजग आहे, त्यामुळे मी होळी खेळत नाही.

 • Bollywood Celebs Who Does Not Celebrate Holi

  करीना कपूर....
  करीना कपूरने एकदा सांगितले होते, आम्ही कधीच होळी साजरी करत नाही. माझ्या आजोबाचे निधन झाले होते, त्यांच्यासोबत आमचे रंग देखील निघून गेले. तेव्हापासून आम्ही होळी खेळत नाही.

 • Bollywood Celebs Who Does Not Celebrate Holi

  जॉन अब्राहम
  - एका इंटरव्यू दरम्यान जॉन म्हणाला होता की, मी होळी खेळत नाही. लोक होळीचा गैरवापर करतात आणि त्याचा अतिरेक करतात. त्यामुळे मी असे सेलेब्रेशन करत नाही.
  - जॉन ने निसर्गाच्या हानिशी संबंध जोडताना सांगितलेकी, तुम्ही झाडे कापता, यामुळे निसर्ग नष्ट होत आहे. धर्माच्या नावावर प्रत्येक वस्तू नष्ट करत आहात. त्यामुळे मी होळी खेळत नाही.

Trending