एकेकाळी सुपरस्टार असणारी काजोल 22 वर्षांपासून अभिनय क्षेत्रात आहे. तिच्या यशस्वी चित्रपटांची यादी दीपिका, कतरिना आणि करीना यांच्या बरोबरीची आहे. या वर्षी तिचा एक चित्रपट तिचा पती बनवत आहे. शाहरुख निर्मित आणि
रोहित शेट्टी दिग्दर्शित चित्रपटात काजोलला करारबद्ध करण्यात आले आहे. एवढेच नाही तर एका अत्यंत महत्त्वाच्या भूमिकेसाठी
अजय देवगणलाही विनंती केली जात आहे.
रोहित शेट्टी आणि
अजय देवगण यांचे खूप जुने संबंध आहेत. अजयनेच त्याला सुरुवातीच्या काळात संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. सावळी काजोल
आपल्या अभिनयाच्या बळावर टिकून आहे. तिने कधीच बिकिनी घातली नाही आणि कधी आयटम साँगही केला नाही. यासाठी ती कधी तयारही होणार नाही. काजोलला स्वत:वर खूप विश्वास आहे. ती अत्यंत मजबूत आणि मूडी महिला आहे. तिची आई तनुजादेखील आपल्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्री होती.
(पुढे वाचा, शूटिंग सेटवर ऐश्वर्याच्या सोबतच असते आराध्या...)