आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Akshay Kumar,Sonakshi Sinha Dines With Prince Of Dubai

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अक्कीने दुबईत प्रिन्ससोबत केले डिनर, मुंबईतील घरी जावे लागले बाईकने

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वंस अपॉन अ टाईन इन मुंबई दोबारा या चित्रपटाची टीम अक्षय कुमार, सोनाक्षी सिन्हा, एकता कपूर आणि इमरान खान यांनी यंदाची ईद दुबईत साजरी केली. ईदनिमित्त दुबईचे प्रिन्स महंमद यांनी रॉयल्टी नाद एल शेबा पॅलेसमध्ये या चित्रपटाच्या स्टार कास्टला शानदार डिनर पार्टीसाठी आमंत्रित केले होते.

चित्रपटाची निर्माती एकता कपूर आणि मुख्य कार्यकारी अदिकारी तनुज गर्गसह अक्षय कुमार, सोनाक्षी सिन्हा आणि इमरान खान बॉलिवूडमधील पहिले कलाकार ठरले आहेत, ज्यांना प्रिन्सने डिनरसाठी रॉयल पॅलेसमध्ये आमंत्रित केले होते.

या पूर्वी बॉलिवूडमधील कोणत्याही कलाकाराला येथे आमंत्रित करण्यात आले नव्हते. डिनरनंतर हॉटेल ओबेरॉयमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेला कलाकारांनी संबोधित केले. त्यानंतर सर्व कलाकार दुबईतील फेमस गोल्डसोक येथेही गेले होते.

दुबई दौरा आटोपल्यावर सर्व कलाकार मुंबईला परतले. मुंबई विमानतळावर आल्यावर अक्की कारने नव्हे तर दुचाकीने घरी गेला. त्याने असे का केले हे त्यालाच ठाऊक. त्याने बाईक चालविली तेव्हा इमारान मागच्या सिटवर बसला होता. सोनाक्षी सिन्हा कारने घरी गेली...

अक्षयला बाईक चालविताना बघा पुढील स्लाईडसमध्ये...