Home | Parde Ke Pichhe | Alia Bhatt And Siddharth Malhotra Setting New Trends In Bollywood

पडद्यामागील : सिनेताऱ्याच्या वाढदिवशी कलिंगड कापण्याची पद्धत, आलियाने आणला नवा ट्रेंड

जयप्रकाश चौकसे | Update - Feb 12, 2016, 05:00 AM IST

अभिनेत्री आलिया भटसोबत सिद्धार्थ मल्होत्राचे जवळचे संबंध आहेत. गेल्या महिन्यात सिद्धार्थच्या वाढदिवशी आलिया एक कलिंगड घेऊन मेहबूब स्टुडियोत पोहोचली होती.

 • Alia Bhatt And Siddharth Malhotra Setting New Trends In Bollywood
  आलिया भट-सिद्धार्थ मल्होत्रा

  अभिनेत्री आलिा भटसोबत सिद्धार्थ मल्होत्राचे जवळचे संबंध आहेत. गेल्या महिन्यात सिद्धार्थच्या वाढदिवशी आलिया एक कलिंगड घेऊन मेहबूब स्टुडियोत पोहोचली होती. तिथे सर्वांसमक्ष विधिवतपणे केकऐवजी कलिंगड कापून सर्वांना देण्यात आले. कलिंगडाची एक फोड आलिया आणि सिद्धार्थने मिळून खाल्ली. कदाचित पहिल्यांदाच एखाद्या स्टारच्या वाढदिवशी कलिंगड कापण्यात आले असावे. हे नव्या पिढीचे सिनेस्टार नेहमीच काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतात. हा एक शुभ संकेत आहे. मध्यम वर्गातील कितीतरी कुटुंबे आपल्या घरी केक कापतात, परंतु सिनेतारे समाजामध्ये नव्या परंपरा सुरू करू शकतात, जेणेकरून यामुळे मध्यम वर्गातील कुटुंबीयांची बचत होईल आणि पाश्चात्त्य रूढी-परंपरांपासूनही त्यांचा बचाव होईल. वस्तुत: पूर्व आणि पश्चिमेकडील संस्कृतींमध्ये कोणतेच युद्ध नसून ते रचण्यात आले आहे. संस्कृती विघटनशील असतात. संस्कृतीची संक्षिप्त आणि सोपी परिभाषा म्हणजे ती मनुष्याच्या मनातील विकास आहे आणि ज्या भव्य इमारतींची रचना केली जाते, त्या संस्कृतीअंतर्गत येतात. त्यामुळे जेव्हा खोदकामात एखादी रचलेली इमारत सापडते तेव्हा त्यामध्ये आपल्याला गतसंस्कृतीची माहिती मिळते. तसेच त्या कोसळलेल्या इमारतींमधील काही वस्तूंद्वारे त्या काळातील जीवनशैली समोर येते. काही दस्तऐवज किंवा दगडांवर आढळून आलेली लेखनशैली त्या कालखंडावर प्रकाश टाकते.
  अशी कल्पना करा की, आजच्या काळातील जग जलमय होते किंवा भूकंपाने नष्ट होते. मात्र, हे शक्य नाही. कारण अंध सरकारे धरणांची उंची वाढवत चालली आहेत आणि ही धरणे फुटल्यावर महापूर शक्य आहे. आपण समुद्राच्या तळामध्ये टिकून राहिलेल्या द्वारकेप्रमाणे होऊ आणि १०० वर्षांनंतर आपली प्रतीके सापडतील तेव्हा भावी पिढी त्या भव्य इमारतींचे अवशेष पाहून म्हणेल, किती भव्य संस्कृती होती! परंतु पुस्तके आणि शिलालेखांच्या अभावामध्ये ते आपल्या सांस्कृतिक वारशावर दु:खी होतील. जाहिरातपट त्यांच्या हाती लागले तर साबणाच्या जाहिरातीच्या आधारे ते वर्तमानात घाणीने माखलेल्या भारताला स्वच्छ-सुंदर देश म्हणतील.
  पुढील स्लाईडमध्ये वाचा, चित्रपट समीक्षक जयप्रकाश चौकसे यांचा उर्वरित लेख...

 • Alia Bhatt And Siddharth Malhotra Setting New Trends In Bollywood
  हृतिक रोशन-आशुतोष गोवारिकर

  हृतिक रोशन आणि नव्या अभिनेत्रीसोबत आशुतोष गोवारीकर इतिहासावर आधारित एका चित्रपटाची निर्मिती करत आहेत. याचा विषयच पात्रांना तोकडे कपडे घालण्याचे स्वातंत्र्य देतो. मात्र, त्या कालखंडाच्या संस्कृतीविषयी ते काय म्हणतील? लेखक रांगेय राघव यांची कादंबरी 'मुरदों का टीला' अशाच एका पुरातन शोधावर प्रकाश टाकते. हे आकलन अशा प्रकारेदेखील करता येईल की, स्त्री आणि पुरुषाचे तोकडे कपडे म्हणजे त्या कालखंडात शरीराला अत्यंत महत्त्व होते आणि त्याचे प्रदर्शन करणे किंवा दाखवण्याला वाइट म्हटले जात नव्हते. तसेच शरीरच जर आत्म्याचे राहण्याचे ठिकाण अाहे, तर ते स्वच्छ-सुंदर ठेवणे दाखवण्यामध्ये कोणीच आक्षेप घेऊ शकत नाही. या अर्थाने शरीर प्रार्थनास्थळाप्रमाणे पवित्र होते. आत्म्याचा अर्थ मनुष्याची विचारप्रक्रिया असून शरीर विचारप्रक्रियेने प्रभावित होते. पर्शियन (इराणी) भाषेत 'माज़' हा शब्द आहे. याचा अर्थ एकाच वाक्यात सांगायचा झाल्यास जीवघेण्या आजाराशी झुंज देत पुन्हा बरी होऊन सुंदरही दिसणारी वृद्ध महिला. त्यामुळे शरीराला क्षुद्र म्हणणे किंवा नगण्य म्हणणे एक प्रकारची कूपमंडूकता (विहिरीतील बेडकाप्रमाणे एकाच ठिकाणी राहणे किंवा मर्यादित ठिकाणालाच जग समजणे) असून ती आपल्या जनमानसाच्या मनामध्ये खोलवर रुजलेली आहे. एखाद्या पुरातन संस्कृतीच्या अवशेषांमध्ये तुम्हाला सेन्सॉरशिपचे कोणतेच प्रमाणपत्र मिळत नाही. हा तर अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर प्रहार आहे आणि प्रजासत्ताक मूल्यांच्या पतनाचे प्रतीक आहे. तथापि, आलिया भट्टचे आपल्या प्रियकराच्या जन्मदिनी कलिंगड कापणे सुखद वाटले. 
   
  पृथ्वी जलमय झाल्यावर पाणबुड्या मेहबूब स्टुडिअोतील त्या टेबलापर्यंत पोहोचला आणि त्याला चाकू कलिंगडाचे निशाण सापडले तर तो म्हणेल, 'हा देश खूपच निसर्गप्रेमी राहिला असावा.' त्याला हेदेखील माहीत नसेल की, या काळात डझनभर विचारवंतांची हत्या झाली आहे आणि देशामध्ये सीमारेषा तयार झाल्या आहेत. 

Trending