Home | Parde Ke Pichhe | Article On Late Sadhana By Jayprakash Choukase

पडद्यामागील : अभिनेत्री साधना नय्यर अखेर कोण होत्या?

जयप्रकाश चौकसे | Update - Dec 29, 2015, 06:00 AM IST

हरी शिवदासानी यांच्या भावाची कन्या साधना यांनी आपल्या करिअरला ग्रुप डान्सद्वारे प्रारंभ केला.

 • Article On Late Sadhana By Jayprakash Choukase
  दिवंगत अभिनेत्री साधना
  शुक्रवारी साधना नय्यर यांचे निधन झाले. गेल्या तीन वर्षांपासून त्या कॅन्सरशी झुंज देत होत्या. हरी शिवदासानी यांच्या कन्या बबिता असून त्या राज कपूर यांचे ज्येष्ठ चिरंजीव रणधीर कपूर यांच्या पत्नी आहेत. हरी शिवदासानी यांच्या भावाची कन्या साधना यांनी आपल्या करिअरला ग्रुप डान्सद्वारे प्रारंभ केला. 'श्री ४२०' मधील 'इके बलम आजा' या गाण्यामध्ये त्यांनी ग्रुपमध्ये नृत्य केले होते. त्यांच्या आई-वडिलांची जेमतेम परिस्थिती होती.
  साधना याच कुटुंबीयातील एकमेव कमावत्या होत्या. आर. के. नय्यर हे राज कपूर यांचे सहायक दिग्दर्शक होते. दोघेही चांगले मित्र होते. एकेदिवशी नय्यर 'लव्ह इन सिमला'चा विचार मनात घेऊन थेट शशधर मुखर्जींना भेटायला गेले. मुखर्जींकडे गुणवत्ता ओखळण्याची कला होती. जेव्हा नय्यर साधना आणि शशधर यांची भेट घालून देण्यासाठी गेल्यावर पूर्ण विश्वासाने म्हणाले, हीच नायिका असेल, तेव्हा या मुलीचे कपाळ खूप मोठे आहे, एवढीच शशधर यांची शंका होती. नय्यर साहेबांनी त्यांना मेकअप रूममध्ये नेले आणि लगेच कात्रीने थोडे केस कापले त्यांना कपाळाच्या बाजूने कट दिला. कालांतराने हीच हेअरस्टाइल 'साधना कट' नावाने लोकप्रिय झाली. 'लव्ह इन सिमला'मधील ही स्टाइल होती.
  पुढे वाचा, आजारामुळे एक डोळा झाला होता निकामी, खऱ्या डोळ्याप्रमाणे दिसणारा लावला होता काळा दगड...

 • Article On Late Sadhana By Jayprakash Choukase
  दिवंगत अभिनेत्री साधना
  विमल राय यांच्या 'परख'ने त्यांना गुणवंत कलाकाराच्या रूपात ख्याती दिली. साधना यांची लोकप्रियता वाढत गेली आणि रामानंद सागर यांच्या 'आरजू'मध्ये त्यांनी राजेंद्रकुमार यांच्याएवढे पाच लाख रुपये मानधन मिळवले. आशा पारेख आणि सायराबानोदेखील तेव्हा नायिका झाल्या, पण साधना यांनी अधिक यश मिळवले. 'दूल्हा-दूल्हन'मध्ये त्या राज कपूर यांच्या नायिका बनल्या. त्यांच्या संघर्षामुळे राज कपूर त्यांना 'सध्धोरानी' म्हणत असत. आर. के. नय्यर आणि साधना यांचे लग्न झाले, पण त्यांना मुले झाली नाहीत. नय्यर यांच्या भगिनींच्या मुलांनाच साधना आपली मुले मानत होत्या. आपल्या मृत्युपत्रातही त्यांना संपत्तीचा अधिकार दिला. भरभराटीच्या काळात त्यांना थायरॉइडच्या आजाराने ग्रासले. त्या काळात यावर कोणताच उपचार नव्हता. आणखी एका आजारामुळे त्यांना लंडनला जाऊन आपला एक डोळा काढावा लागला आणि खऱ्या डोळ्याप्रमाणे दिसणारा काळा दगड लावला. यानंतर त्या बराच काळ चित्रपटसृष्टीपासून दूर राहिल्या. नंतर नय्यर यांनी त्यांच्यासोबत 'गीता मेरा नाम' या यशस्वी चित्रपटाची निर्मिती केली. त्यांनी नारी सिप्पी यांना निर्माता बनण्यासाठी मदत केली. त्यांनी 'वो कौन थी'ची निर्मिती केली होती. या चित्रपटाला मदन मोहन यांनी संगीत दिले. त्यांचे 'नयना बरसे रिमझिम-रिमझिम' हे गाणे अत्यंत लोकप्रिय ठरले. देव आनंदसोबतच्या 'हम दोनों'चे संगीतही जबरदस्त होते. त्यांनी बी. आर. चोप्रांच्या 'वक्त'मध्येही काम केले आहे. 
   
  पुढे वाचा, साधना यांच्याविषयीच्या खास बाबी... 
   
 • Article On Late Sadhana By Jayprakash Choukase
  दिवंगत अभिनेत्री साधना
   
  साधना यांच्या दगडाच्या डोळ्यावरून एका युरोपियन चित्रपटातील दृश्य आठवले. दुसऱ्या महायुद्धात नाझी छळछावणीचा निर्दयी प्रमुख लोकांची निर्घृणपणे हत्या करत होता. ज्या कैद्याने आपल्या प्रश्नाचे उत्तर दिले त्याला सोडण्यात येईल, अशी सवलत तो आपल्या वाढदिवशी देतो. एका अशक्त कैद्याला बोलावून तो म्हणतो, 'जर्मन डॉक्टर अत्यंत कुशल असून त्यांनी लावलेला दगडांचा एक डोळा अगदी खराखुरा दिसतो.' त्याने कैद्याला विचारले, 'माझा कोणता डोळा दगडाचा आहे?' त्यावर कैदी लगेच डावा डोळा असल्याचे सांगतो. इतक्या लवकर कसे उत्तर दिले? असे विचारल्यावर कैदी म्हणतो, 'दगडाच्या डाव्या डोळ्यामध्ये मानवी करुणा स्पष्टपणे दिसते.' नाझी अत्याचाराचे हे स‌र्वात सबळ, प्रबळ आणि प्रखर उत्तर होते. हिटलरने जर्मन जातीच्या श्रेष्ठतेचा जो जिन दिव्यातून काढला होता, त्याने अगणित लोकांचे प्राण घेतले. आजकाल आपल्याकडेही अशाच प्रकारच्या श्रेष्ठतेचे सामूहिक गुणगान होत आहे. 
   
  पुढे वाचा, अनेक मुलींना मिळवून दिले होते काम...
 • Article On Late Sadhana By Jayprakash Choukase
  दिवंगत अभिनेत्री साधना

  साधना यांनी केरळातून आलेल्या बहुतांश गरीब मुलींना आपल्या इथे काम दिले. त्यांनी त्यांच्यामध्ये जगण्याची आणि सेवा करण्याची सवय लावून दिली. ही कला शिकून त्या मुलींना देशी-विदेशी श्रीमंतांकडे चांगल्या पगारावर काम मिळायला लागले. त्यांच्यापैकीच एकीने सर्व ऑफर नाकारल्या. त्या गेल्या १० वर्षांपासून साधना यांची सेवा करत होत्या. साधना यांनी कार्टर रोडवरील आपला सुंदर फ्लॅट भाड्याने दिला होता आणि आशा भोसले यांच्याकडून ५० वर्षांपूर्वी भाड्याने घेतलेल्या बंगल्यामध्ये त्या राहत होत्या. दरम्यान, हा बंगला आशाजींनी एका बिल्डरला विकल्यानंतर बिल्डरने साधनाजींना अनेकदा धमकावले, पण त्या कधीच घाबरल्या नाहीत. 
   

Trending