आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

EXPERT VIEW: ‘बँग-बँग’मध्ये तणावरहित दिवसाची केलेली कल्पना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फॉक्स स्टारच्यामुंबई कार्यालयाने आपल्याच कंपनीचा हॉलिवूड चित्रपट ‘नाइट अँड डे’ची भारतीय आवृत्ती ‘बँग-बँग’ नावाने बनवली आहे. हृतिक रोशन आणि कतरिना कैफ जोडीचा चित्रपट दीर्घ काळानंतर आला आहे. हा सिनेताऱ्यांचा डिझायनर चित्रपट आहे, पण ‘सिंघम’ आणि ‘किक’पेक्षा वेगळ्या पद्धतीचा लार्जर दॅन लाइफ आहे. सिंघम आणि किक आपल्या सिनेताऱ्यांच्या चाहत्यांसाठी त्यांच्या अंदाजात बनवण्यात आले होते. ‘बँग-बँग’ हृतिक रोशनच्या चाहत्यांसाठी रचण्यात आला आहे. यामध्ये पाश्चात्त्य चित्रपटांप्रमाणे टंग इन चीक रहस्य आहे. म्हणजेच संकेताच्या माध्यमातून हसवले आहे. अशाच प्रकारे अॅक्शन दृश्यांमध्येही तंत्रज्ञानातून जन्मलेली अद‌्भुत विलक्षण गोष्ट रचण्यात आली आहे. फरक तोच आहे, जसा मॉलमधून खरेदी केलेला माल आणि रस्त्यावर विकण्यात आलेल्या मालामध्ये असतो.
दोन्ही वेगवेगळे ब्रँड आहेत, पण मार्केट सारखेच आहे. या चित्रपटातील नायकाची सटकत नाही, तो कूल राहून शत्रूंना मारत राहतो. या चित्रपटामध्ये जेवढे लोक मारले जातात त्यांच्याबद्दल कोणालाच पश्चात्ताप होत नाही. तर बँकेत काम करणारी आणि या सर्वांसाठी अनोळखी असलेली नायिका दु:ख व्यक्त करते.
प्रत्येक चित्रपटात चांगले विरुद्ध वाइट युद्धाचे एक कारण ठरते. आरोपींना कोणत्याही कायदेशीर अडथळ्याशिवाय एका देशातून दुसऱ्या देशामध्ये नेता येईल, या कारणाची चित्रपटात निवड करण्यात आली आहे. गुन्हेगार हा आंतरराष्ट्रीय करार रोखू पाहतात, जेणेकरून अॅक्ट्रेडिशन कायद्याच्या आड लपता येईल. कायदा संमत व्हावा, असे सरकारला वाटते. म्हणून या अॅक्शनपटात युद्धाचे कारणही थोडे सोफिस्टिकेशन आहे. तसेच संपूर्ण सादरीकरणात अत्याधुनिकता आहे. ती काही वितरण क्षेत्रांमध्ये अडथळा, तर काहींमध्ये सहायक ठरते. चित्रपटाचा मूळ उद्देश हृतिकला आपल्या धडधाकट अंदाजात सादर करणे हा आहे. तो चित्रपटात ताजेपणासह सादर झाला आहे. अनेकदा नायकांच्या शरीराच्या नदीतून माशा बाहेर उड्या मारत असल्यासारखे वाटते. हृतिक या क्षेत्रामध्ये सर्वांपेक्षा फिट आहे.
कतरिना कैफ नेहमीप्रमाणे सुंदर दिसत आहे. तिच्या संवादफेकीतही नवा आत्मविश्वास दिसून येत आहे. या चित्रपटामध्ये ‘धूम-३’पेक्षाही जास्त संधी तिला मिळाली आहे. एका छोट्या शहरातील नोकरी करणाऱ्या मुलीचे चरित्रचित्रण दिलासा देते की, ती महानगरीय तिखट मिरची नाही. मात्र, तिच्या मिठापासून तुम्ही दूरही राहू शकत नाही. एके दिवशी विदेशात फिरायला जायचेच, अशी नायिकेची मध्यमवर्गीय इच्छा आहे. ती तणावरहित, चिंतामुक्त दिवसाची इच्छुक आहे. खरे म्हणजे अशा प्रकारचा दिवस अनेक लोकांचे स्वप्न असू शकते. आज तणावमुक्त क्षणाची कल्पनादेखील केली जाऊ शकत नाही. तथापि, या नायिकेला योगायोगाने असा एक दिवस मिळतो, जो तिच्या दैनंदिन जीवनापेक्षा वेगळा आहे. तिच्या स्वप्नांमधील आदर्श दिवसात अत्यंत गंभीर तणाव आहे, धोके आहेत आणि विश्वासाचे संकट आहे, याची तिला जाणीव होते.
अशा प्रकारच्या चित्रपटामध्ये लिहिणाऱ्यांच्या मनात नकळतच ही गोष्ट आली की, तणावरहित आणि चिंतामुक्त दिवस एक स्वप्न असून ते अशक्य आहे. तथापि, डिझाइन चित्रपटामध्ये करमणुकीव्यतिरिक्त काहीही शोधणे व्यर्थ आहे आणि जे मिळते ते बोनस मानले पाहिजे. चित्रपटालाही पाच दिवसांच्या सुट्यांचा बोनस मिळाला आहे.