आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहरुखला \'मन्‍नत\'वर जाऊन भेटणार सलमान, आहे एक खास कारण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आजच्‍या पिढीतील कलावंतांमध्‍ये ग्रेसफुल मैत्री राहुच शकत नाही. ते प्रतिस्‍पर्धीच असतात, असे अभिनेता सलमान खानचे वडील सलीम खान यांचे ठाम मत आहे. सलमान खाने शाहरुखची गळाभेट घेतली खरी, परंतु,दोघांमध्‍ये असलेली रस्‍सीखेच कोणत्‍याही क्षणी कमी झालेली दिसली नाही. परंतु, आता सलमान हे सर्व खोटे ठरवण्‍यासाठी शाहरुखला भेटण्‍यासाठी त्‍याच्‍या घरी 'मन्‍नत'वर जात आहे. चाहत्‍यांसाठी ही निश्चितच एक रोचक बातमी आहे.

सलमान अचानक शाहरुखच्‍या घरी का जात आहे? हा प्रश्‍न सर्वांनाच पडला असेल. यामागचे कारणही अतिशय खास आहे. 'किक' या आगामी चित्रपटासाठी सलमान खान 'मन्‍नत'मध्‍ये प्रवेश करणार आहे.

शाहरुखची कंपनी रेड चिलीजमध्‍ये व्‍हीएफएक्‍स तंत्रज्ञानाचा वापर करुन काम करण्‍यात येते. 'क्रिश3'मध्‍ये व्‍हीएफएक्‍सचे काम किंग खानच्‍याच कंपनीने केले होते. हे काम पाहून 'किक'चा निर्माता साजिद नाडियादवालाही चांगलाच प्रभावित झाला आहे. त्‍यालाही 'किक'चे व्‍हीएफएक्‍स मन्‍नतमधील रेड चिलीजच्‍या कार्यालयात करायचे आहे. त्‍यामुळे 'किक'च्‍या बहाण्‍याने सलमान खान लवकरच मन्‍नतवर पोहोचणार आहे.