आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पडद्यामागील : 'सैराट' अर्थात बिनधास्त प्रेम आणि त्यातून दिलेला धडा!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागराज मंजुळेंसारख्या नवख्या दिग्दर्शकाने मराठीत 'सैराट' आणला. या 'सैराट'ने महाराष्ट्रात भरपूर व्यवसाय केला. मराठीतील कोणत्याही प्रथितयश कलाकाराला घेता केलेल्या या चित्रपटाच्या शूटिंगपूर्वी नव्या कलाकारांना प्रशिक्षण देण्यात आले. एकाच वर्कशॉमध्ये या कलाकारांनी आपला उदरनिर्वाह करण्यासाठी आवश्यक असणारी कला घेतली. त्यांनी घेतलेल्या परिश्रमाचे फळ आता दिसत आहे. शाळेत जाणाऱ्या कोवळ्या वयातील प्रेमी-प्रेमिकांचे प्रेम यात दाखवले आहे.
श्रीमंत बापाची मुलगी आणि गरीब बापाचा मुलगा हा अनेकदा वापरलेला फॉर्म्युला त्यात वापरला आहे. तरीही केवळ प्रतिभाशाली अभिनय आणि उत्कृष्ट दिग्दर्शनामुळे हा चित्रपट वेगळ्या उंचीवर पोचला आहे. या विषयावर बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपट यापूर्वी आले. त्यात ग्रॅज्युएटला महान समजले जाते.
राज कपूर यांनी जोकर आणि बॉबीमध्ये असेच कोवळ्या वयातील प्रेमी दाखवले होते. या चित्रपटाचा शेवट मंजुळे यांनी ऑनर किलिंगवर केला आहे. जातीच्या क्रूर भिंती या प्रेमिकांना एकत्र येऊ देत नाहीत. मंजुळे या चित्रपटाचा शेवट गोड दाखवू शकले असते, मात्र त्यांनी ते टाळले. मुळात त्यांना याच ऑनर किलिंगवर आक्रमण करायचे होते.
बातम्या आणखी आहेत...