पडद्यामागील: चुंबन दृश्य / पडद्यामागील: चुंबन दृश्य कमी करणा-या सेन्सॉरची नियमावली चित्रपटांसाठी ठरली शापित खडक

Dec 04,2015 04:02:00 PM IST
जेम्स बाँड मालिकेतील नवा चित्रपट ‘स्पेक्टर’मधील सेकंदांचे चुंबन दृश्य कमी करून सेन्सॉर बोर्डाने तीन सेकंदांचे केले आहे. भारतामध्ये १९१३ पासून कथा चित्रपटांच्या निर्मितीस सुरुवात झाली पहिला सेन्सॉर अधिनियम पहिले महायुद्ध संपल्यानंतर १९१८ मध्ये लागू करण्यात आला. तोपर्यंत सिनेमा माध्यम कोणत्याही देशाला योग्यरीत्या समजले नव्हते. इंग्रजांनी युद्धावेळी तयार केलेले पत्रव्यवहाराचे सेन्सॉर नियम चित्रपटांसाठी लागू केले. चित्रपटात ब्रिटिश सत्तेविरोधात कोणीही बंड करू नये, एवढीच एकमेव चिंता इंग्रजांना होती. हीच सेन्सॉरची नियमावली बनली आणि पुढेही अमलात आणली जाऊ लागली. मात्र, त्या वेळी भारतीय चित्रपट दिग्दर्शकांनी धार्मिक कथांमध्ये आपापल्या पद्धतीने देशभक्ती जागवली. उदाहरणार्थ, ‘महात्मा विदुर’मध्ये महाभारतातील पात्र विदुरला गांधीजींप्रमाणे सादर करण्यात आले आणि ‘कीचक वध’ नावाच्या चित्रपटामध्ये कीचकाची भूमिका एका इंग्रजाला देण्यात आली. प्रेक्षकांना दिग्दर्शकाचा हेतू स्पष्टपणे समजत होता. याच अनुभवातून सिनेमाची भाषा दिग्दर्शक आणि प्रेक्षकांमधील समजूतदारपणातून ठरते, असे निश्चित झाले. एखाद्या सेन्सॉर बोर्डाऐवजी हाच समजूतदारपणा नियंत्रणाचा अधिक चांगला उपाय ठरतो आणि अदृश्य रूपाने काम करतो. 
 
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, कोणाच्या अध्यक्षतेखाली चित्रपट उद्योगाच्या समस्यांवर आयोगाची स्थापना करण्यात आली...
 
१९५१ मध्ये मंत्री एस. के. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली चित्रपट उद्योगाच्या समस्यांवर आयोगाची स्थापना करण्यात आली. या आयोगाच्या शिफारशींवर सेन्सॉर कोड बनवण्यात आला आणि त्यामध्ये थोडेफार फेरबदल करत आजही त्याची अंमलबजावणी सुरू आहे. तथापि, गेल्या ६५ वर्षांत समाजामध्ये अनेक परिवर्तन झाले. तसेच परमिसिव्हनेस मसक्युलॅरिटीच्या प्रदर्शनाची लाट संपूर्ण देशामध्ये अनेक दशकांपासून चालत आहे. समाज बदलला आहे आणि खुलेपणादेखील आला आहे. प्रासंगिकता आणि संदर्भ बदलले आहेत. मात्र, सेन्सॉर कोडमध्ये काळानुरूप बदल करण्यात आले नाहीत. तथापि, राज्य घटनेमध्ये अनेक दुरुस्त्या करण्यात आल्या. ‘गॉन विथ विंड’; हे अमेरिकेमध्ये बायबलनंतर सर्वाधिक वाचण्यात आलेले पुस्तक आहे. नायक वेश्यालयांमध्ये जाण्याचे दृश्य या पुस्तकावर आधारित चित्रपटातील होते. सेन्सॉरकडून हे दृश्य कापले जाणार होते, पण पुस्तक वाचणाऱ्या वाचकासोबत अन्याय होईल, असा विचार करून ते कापण्यात आले नाही. वाचक आणि प्रेक्षकांचा हॉलीवूड सन्मान करते. अशा प्रकारचा सन्मान आपल्याकडे दुर्मिळच म्हणावा लागेल. तथापि, असा सन्मान करूनच आपले सेन्सॉर बोर्ड उत्तरोत्तर गमावत चाललेला सन्मान, प्रतिष्ठा मिळवू शकते. पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा ऑलिव्हर सिनेमाविषयी काय होती सेन्सॉरची भूमिका...भारतीय सेन्सॉर बोर्ड अनेक वेळा वादाला कारणीभूत ठरले आहे. परीक्षण समितीमध्ये चित्रपट क्षेत्रातील जाणकार असणे आवश्यक आहे. कारण ज्यामुळे दृश्याचा अर्थच बदलतो, तो दृश्याचा छोटासा अंश अनेकदा हटवला जातो. उदाहरणार्थ, १९८१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ऑलिव्हर ट्विस्टपासून प्रेरित चित्रपटामध्ये चिखलात भांडण केल्यानंतर नायिका टबमध्ये अंघोळ करते. तिथे नायक येतो आणि गुन्हेगाराच्या प्रेमासाठी इतर एखाद्या मुलीसोबत भांडण करू नये, हे तिला समजावून सांगतो. कारण त्याची आपल्या गुन्हेगारी आयुष्यामुळे कधीही कारागृहात रवानगी केली जाते. पुढील दृश्यामध्ये टॉवेल फेकून जा, असा आवाज नायिका टबातूनच त्याला देते. चित्रपट व्यकरणाशी अनभिज्ञ सेन्सॉरने बाथ टबचे काही अंश कापले. त्यामुळे कदाचित प्रेम करून परत जाणाऱ्या नायकाला मुलीने टॉवेल फेकण्यास सांगितले, असा प्रभाव निर्माण झाला असावा. पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, सेन्सॉर नियमावलीचा एखादा शापित देवीप्रमाणे खडक आहे...वस्तुस्थिती ही आहे की, साहित्य आणि सिनेमावर आतापर्यंत चालवण्यात आलेल्या तथाकथित अश्लीलतेच्या काही खटल्यांमध्ये सेन्सॉरचा पराभव झालेला आहे. संपूर्ण प्रकरणाच्या मुळामध्ये शिरले असता आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये लैंगिक शिक्षण अभ्यासक्रमाचा विषय बनवण्यात आलेला नाही. असे झाले असते तर एखादे पुस्तक किंवा चित्रपटापासून कोणालाही अनैतिक होण्याचा धोका राहिला नसता. समस्या टाळत राहणे आणि त्याच्या मुळावर घाव घालणे हेच आपल्या राष्ट्राचे वैशिष्ट्य आहे. आज तंत्रज्ञानाने किशोरवयीनांसाठी तथाकथित अश्लीलतेच्या गुहेतील लोखंडी फाटके उघडली आहेत आणि विषयाचे ज्ञानच त्यांना योग्य निर्णयाची क्षमता देऊ शकते. सेन्सॉर नियमावलीचे एखाद्या शापित देवीप्रमाणे खडकात रूपांतर होऊन ती मूळ बनली आहे. केवळ ज्ञानाचे चरण पडल्यावर ती जिवंत होऊ शकते. सर्व वाद ठळक बातम्या होऊन लुप्त होतात.
X