आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाहुबली चित्रपटासाठी वेरुळ-अजिंठ्यावरुन मिळाली प्रेरणा, वाचा पडद्यामागची स्टोरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नायगरा फॉल्स या नावाने ओळखल्या जाणाऱ्या केरळमधील एथिरपल्ली धबधब्याची प्रतिकृती साकारणे, युद्धासाठी वापरल्या जाणाऱ्या शस्त्रांना कासवाचे शेल्स वापरणे, घोड्यांपासून ते हत्तींपर्यंत यांत्रिक जनावरे तयार करणे, अगदी 2,500 वर्षांपूर्वीचे वातावरण पडद्यावर चितारणे काही सोपी बाब नाही. बाहुबलीच्या निमित्ताने असे ऐतिहासिक वातावरण साकारण्यात आले. त्यामुळे चित्रपट बघणे ही जशी एक पर्वणी ठरणार आहे, तशीच त्या मागची माहिती जाणून घेणे हेही फार रोमांचक आहे. आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय, ही रोमहर्षक स्टोरी. दी मेकिंग ऑफ बाहुबली....
यासंदर्भात चित्रपटाचे आर्ट डायरेक्टर साबू सायरील म्हणाले, की या चित्रपटाची सुरवात मुंबईतील ताज लॅंड एन्ड या हॉटेलपासून झाली. या चित्रपटाचे डायरेक्टर राजामाऊली यांनी मला येथेच पहिल्यांदा स्टोरी सांगितली. हा एक मोठा प्रोजक्ट आहे. तो स्विकारणे एक अवघड आव्हान होते. पण मी ते स्विकारले. याची सुरवात 2012 मध्ये झाली असली तरी 2013 पासून प्रत्यक्ष काम सुरु झाले. या चित्रपटाला एकूण 380 दिवस लागले.
साबू सायरील यांनी divyamarathi.com च्या प्रतिनिधीसोबत अगदी मनमोकळ्या गप्पा मारल्या. चित्रपटाच्या निर्मितीवर ते भरभरून बोलले. चित्रपट तयार करण्यासाठी कोणकोणत्या बारीक सारीक बाबी कराव्या लागल्या याची माहिती दिली.
सायरील यांनी चित्रपटाविषयी सांगितलेली रोमांचक माहिती वाचा, पुढील स्लाईडवर... जाणून घ्या मेकिंग ऑफ बाहुबली... वेरुळ-अजिंठा लेण्यांवरुन मिळाली प्रेरणा...