आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करमणूक क्षेत्रात 'जिंदगी'चे पाऊल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देशी मालिका दाखवण्याच्या उद्देशाने झी वाहिनीचे नवीन चॅनेल 'जिंदगी'चा शुभारंभ झाला आहे. याप्रसंगी 'काश मैं आपकी बेटी न होती' या मालिकेच्या एका भागातील दृश्यात एक गरीब आई आपल्या मुलांना विनंती करते की, 'आजची रात्र तुम्हाला उपाशीच राहावे लागेल. कारण घरात फक्त मूठभर तांदूळच शिल्लक आहेत. तेसुद्धा दिवसभर कष्ट करून घरी आलेल्या तुमच्या वडिलांना द्यायचे आहेत. तुम्हाला आधीच भात खाल्ल्याचा अभिनय करायचा आहे.' वडील घरी आल्यानंतर मुलांनी चांगला अभिनय केला, पण वडील अन्नाचा पहिला घास घेताना सर्वात लहान मुलाचे तोंड उघडले. त्यालाही खूप भूक लागली होती. कदाचित यामुळेच त्याला राहवले नाही. वडिलांनाही कळून चुकले की, सर्व जण अभिनय करत आहेत. थोडे का असेना, पण सर्वांनी मिळून भात खाण्यास त्यांनी सांगितले.
जेवण झाल्यानंतर वडील आपल्या खोलीत जातात आणि मनात विचार करतात, 'मी किती लाचार आहे. मुलांसोबत जेवण नाही, तर भूक वाटण्यासाठी असहाय आहे.' ही पाकिस्तानची वास्तववादी मालिका आहे. या मालिकेचे संकेत स्पष्ट आहेत. दोन्ही देशांतील गरिबांच्या घरांमध्ये भूकच रांगत आहे. सीमेने भूक आणि लाचारीच वाटली आहे. विभाजनापूर्वीही गरिबांची कमतरता नव्हती, पण दोन्ही देश स्वतंत्र झाल्यानंतर आणखी एक सखोल विभाजन झाले. या भयावह दरीच्या एकीकडे अभाव व भूक आहे, तर दुसरीकडे समृद्धी असून त्याचा आधार शोषण आहे.
अनेक दशकांपूर्वी 'धर्मयुग' नामक एक इराणी लघुकथा 'टाइम्स'च्या साहित्य पुरवणीत प्रकाशित झाली होती. त्याचा सारांश हा होता की, ज्या घरात मृत्यू झाला आहे, त्या घरातील चूल तीन दिवस पेटवली जात नाही आणि दोन्ही वेळचे जेवण शेजार्‍यांच्या घरातून येते असे. त्या काळात प्रेम आणि संकटसमयी एकमेकांना मदत करणे, असा शेजार्‍याचा अर्थ होता. त्या गरीब वसाहतीच्या एका टोकाला श्रीमंताचे घर असते आणि गावात एखाद्याचा मृत्यू झाला तेव्हा याच घरातून मोठय़ा स्वरूपात चविष्ट जेवण येते.
काही दिवसांनंतर कुटुंबातील एक लहान मुलगी आजारी पडते आणि अभावांनी जन्मलेल्या जादूटोण्याद्वारे तिच्यावर उपचार करण्याचे प्रयत्न केले जातात. त्या वेळी त्या घरातील एक छोटा मुलगा ज्याच्या डोक्यात फक्त एखादी व्यक्ती मृत झाल्यानंतर त्या श्रीमंत घरातून वस्तीत येणारे जेवण असते. त्याच जेवणाच्या नादात तो मुलगा आपल्या वडिलांना, माझी लहान बहीण कधी मरणार, असे विचारतो. तो मुलगा निर्दयी किंवा क्रूर नाही, त्याला मृत्यूचा अर्थही माहीत नाही, पण त्याला फक्त भूक माहीत आहे. याच खेळण्यासोबत खेळत तो मोठा होत आहे. काही कथा आपल्या हृदयाला अशा काही पिळतात, जणू काही धोबीघाटावर कपडे पिळले जात आहेत किंवा उसाचा रस काढणार्‍या यंत्रात वारंवार पीळ देऊन देऊन उसापासून शेवटचा थेंबही काढला जात आहे. एका काळात 'टाइम्स'सह इतर वृत्तपत्र समूहांनीही साहित्याच्या पुरवण्यांचे प्रकाशन रद्द केले होते. याच काळात शिक्षण संस्थांमध्ये वाणिज्य शाखेचे वर्ग खचाखच भरलेले असायचे आणि कला विभागात शांतता असायची. विज्ञान विभागात थोडेफार उत्साहाचे वातावरण होते, पण 'बहर' केवळ वाणिज्य शाखेतच होता. समाजात परिवर्तनाचे सूक्ष्म संकेत अशा प्रकारेच समोर येतात.
आज पुस्तकांच्या सर्वच पंचतारांकित दुकानांमधील 50 टक्के भागात व्यापार व्यवस्थापनाची पुस्तके ठेवलेली असतात. 25 टक्के जागेवर मुलांचे कॉमिक्स आणि 'लॉर्ड ऑफ रिंग' व 'हॅरी पॉटर'च्या प्रभावात लिहिलेली तथाकथित मायथोलॉजीची पुस्तके असतात. छोट्याशा एखाद्या अदृश्य जागेत साहित्याच्या नावावार लगदा किंवा 'फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे'सारखी पुस्तके ठेवलेली असतात. आपण दैनंदिन जीवनातूनच साहित्याची हकालपट्टी केली आहे. भोपाळचे डॉ. शिवदत्त शुक्ला यांनी कालरेस रुझ जेफान यांचे 'द शॅडो ऑफ द विंड' हे पुस्तक का कणास ठाऊक कोठून आणले. कदाचित, या पुस्तकाच्या भाराने त्यांना कमरेची शल्यचिकित्सा करून घेण्यासाठी बाध्य केले असावे.
असो, भूक कमी-अधिक प्रमाणात सर्वच देशांमध्ये आहे, परंतु काही चतूर देशांनी गरिबांना दान देऊन जिवंत ठेवले आहे. कारण त्यांचा निझाम सेवकांच्या फौजेविना चालू शकत नाही. महानगरांमधील संगमरवरी इमारतींच्या खाली नरकासारख्या झोपडपट्टय़ांमध्ये सेवकांची फौज वसलेली आहे. ज्याप्रमाणे काही प्रजातींचा त्या नष्ट होण्याच्या धोक्याच्या वेळी महत्प्रयासाने बचाव केला जातो, त्याचप्रमाणे भूकही साठवून ठेवली जाते. तुम्ही या दृष्टिकोनावर कोणताही शिक्का मारा, पण भुकेकडे राजकीय सिद्धांताच्या पलीकडे जाऊन केवळ मानवी करुणेच्या वतरुळात बघितले पाहिजे. खाण्यामुळे होणार्‍या मृत्यूंची संख्या भुकेने मरणार्‍यांपेक्षा कमी आहे. भूक ही क्रूरतेतून जन्मलेली अय्याशी आहे.