आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुजॉय घोषचा 'कहानी' हॉलिवूडमध्ये

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('कहानी'सिनेमाचे पोस्टर)
यशराज फिल्म्स सुजॉय घोषच्या 'कहानी'ची त्यात काही बदल करून आंतरराष्ट्रीय बाजारासाठी इंग्रजी भाषेत निर्मिती करत आहे. सर्व कलावंत आणि तंत्रज्ञ हॉलिवूडचे असतील आणि चित्रपटाचे नाव डायटी (देवी) असेल. सुजॉयच्या कहानीचा क्लायमॅक्स दुर्गा पूजेच्या वेळी होतो आणि दुर्गेच्या कथेचे संकेत संपूर्ण चित्रपटात स्पष्टपणे दिसून येतात. नायिकादेखील हजारो लोकांची हत्या करणाऱ्याचा खून आई दुर्गेप्रमाणे करते. या चित्रपटात कोलकात्यातील रस्ते पार्श्वभूमी होते आणि ते जिवंत पात्राप्रमाणे सादर करण्यात आले. 'कहानी'चे निर्माते जयंतीलाल गढा होते.
हे शक्य आहे की, आदित्य चोप्राने त्यांच्याकडून किंवा सुजॉय घोष यांच्याकडून चित्रपटाचे अधिकार खरेदी केले असावेत. या नव्या आवृत्तीत एक अमेरिकन महिला आपल्या हरवलेल्या पतीच्या शोधात कोलकात्याला येते. खरे म्हणजे सुजॉय घोषच्या 'कहानी'ची रचना आणि चित्रपटातील सादरीकरण हॉलिवूडच्या गुन्हेगारीच्या कथांप्रमाणे दमदार होते. ती हरवलेली व्यक्ती नव्हती, तर भारतीय गुप्तहेर होता, हा कथेचा मूळ दावा अंतिम दृश्यातच समोर येतो. त्याला दहशतवाद्यांनी आपला शिकार बनवले होते आणि त्याच्या शोधाचे नाटक खऱ्या निनावी गुन्हेगाराला आपल्या बिळातून बाहेर काढण्यासाठी रचण्यात आले होते. गर्भवती होण्याचे नाटक करता करता नायिकेला एक क्षण असे वाटते की, जणू काही ती खरोखरच गर्भवती आहे आणि ममतेचे नाटकही एक अभूतपूर्व भावनेला जागवू शकते. चित्रपटातील हे दृश्य सर्वाधिक हृदयस्पर्शी होते. चित्रपटाचा संपूर्ण सौंदर्य-बोध किंवा कला-बोध हॉलिवूडसारखा होता. म्हणून याची हॉलिवूड आवृत्ती तयार होणे स्वाभाविक आहे. गेल्या एक शतकापासून आपले चित्रपट निर्माते विदेशांतून कथा चोरत आले आहेत, परंतु पहिल्यांदा आपली कथा वैधरीत्या विदेशात बनवली जात आहे.
शांताराम यांचा 'आदमी' १९४१ मधील चित्रपट आहे. काही मर्यादेपर्यंत याच्याशी मिळता-जुळता चित्रपट 'इरमा लॉ डूज' साधारण दोन दशकानंतर बनला होता. शम्मी कपूर यांनी एक दशकानंतर 'मनोरंजन' नावाने चित्रपट बनवला. त्यात संजीव कुमार आणि झीनत अमान यांच्या प्रमुख भूमिका होत्या. याच चित्रपटातील वेश्या नायिका आपल्या प्रियकराला गर्वाने म्हणते, 'तुम काम मत करो, क्या तवायफों के समाज में मेरी नाक कटवाओगे कि वह एक अदद प्रेमी नहीं पाल सकी.' प्रत्येक समाजाचे आपले गर्व आणि लज्जा वेगवेगळी असते. अशाच प्रकारे चित्रपट समाजाचे गर्व आणि लज्जा वेगळी असते. तसेच कथा चोरण्यात कोणतीच लाज नाही, तर दुसऱ्यांची रचना आपल्या नावाने प्रसिद्ध करण्यालाही गर्व म्हटले जाते. एक प्रतिष्ठित चित्रपट गीतकार हे काम अनेक वर्षांपासून करत आहे आणि त्याच्या पांढऱ्या पोशाखावर डागही नाही, त्याच्या कपाळावरही कोणत्या आठ्या नाहीत. साहित्य आणि सिनेमात प्रेरणा घेण्याची जुनीच परंपरा आहे. वस्तुत: विचार विश्वाची तऱ्हाच न्यारी आहे. एकच विचार अनेक देशांमध्ये वसलेल्या लोकांच्या मनात विजेसारखा चमकतो.
भारतात जेव्हा वात्स्यायन 'कामसूत्र' रचत होता तेव्हा चीनमध्ये ताओसुद्धा लैंगिक संबंधावर पुस्तक लिहित होते. विचार एका लाटेप्रमाणे प्रवाहित असून त्यावर कॉपीराइटचा कोणताच बंधारा बांधण्यात आलेला नाही. हेदेखील खरे आहे की, आपले महान चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे यांनी 'एलियन' नामक पटकथा लिहिली आणि या विज्ञान फँटसीत इतर ग्रहावरून एक प्राणी आपल्या पृथ्वीवर येतो. त्यांनी आपली ही पटकथा गुंतवणूकदाराच्या शोधासाठी हॉलीवूडला पाठवली. काही वर्षांनंतर स्टीव्हन स्पिलबर्ग यांचा विज्ञान फँटसी 'ई. टी.'ने करमणूक जगतात खळबळ माजवली. आता हे गरजेचे नाही की, त्यांनी सत्यजित रे यांचा 'एलियन' वाचला होता. वस्तुत: ज्या चित्रपटांनी लहानपणी प्रभावित केले होते तेच चित्रपट स्पिलबर्ग आयुष्यभर बनवत आले आहेत. सत्यजित रे यांचे कुटुंब तीन पिढ्यांपासून बाल साहित्याची निर्मिती करत आले आहे. तथापि, भारतात बाल साहित्याचा दुष्काळच राहिला आहे. आपले निर्माते बालकाप्रमाणे विचारच करू शकत नाही. तथापि, निर्मिती विश्वात लहानपण प्रेरणेची अजरामर गंगोत्री आहे. वयाच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्या आतील बालपण साठवून ठेवल्यानेच तुम्ही सामूहिक अवचेतनात घर करणाऱ्या कथा रचू शकता. ज्या हृदयात त्याचे बालपण मेले, त्याचे जीवन पटकथा विहीन खडकाळ भाग असतो.