आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पडद्यामागील : 'दंगल'मध्ये साक्षी तन्वरसोबत ताकदीनिशी आखाड्यामध्ये उतरणार आमिर खान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

छोट्या पडद्यावर आपल्या विनोदी कार्यक्रमासाठी लोकप्रिय असणारा कपिल शर्मा अब्बास-मस्तान जोडीच्या विनोदी चित्रपटात नायकाच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे. प्रत्येक यशस्वी व्यक्तीला आपण आता दुसऱ्या क्षेत्रात आपली विजयी पताका फडकवावी असे नेहमी वाटत असते. छोट्या पडद्यावर अभिनयासाठी लोक्रपिय साक्षी तन्वरने 'मोहल्ला अस्सी'मध्ये भूमिका साकारली होती. मात्र, कॉम्बो डीलच्या आधारे 'मोहल्ला अस्सी' प्रदर्शित करण्याचा सनी देओलचा प्रयत्न राहणार आहे. कारण चित्रपटासमोर काही कायदेशीर अडचणी उभ्या ठाकल्या आहेत आणि चित्रपटाच्या प्रोमोमध्ये कथितरीत्या अपशब्दांचा वापर केल्याने वाराणसीतील काही लोकांनी तक्रारदेखील दाखल केली आहे. सनी देओल अभिनीत दिग्दर्शित 'घायल-2' दिवाळीमध्ये प्रदर्शित होत आहे. सिनेताऱ्यांच्या आघाडीच्या काळामध्ये त्यांच्या चित्रपटांसमोर अनेक अडचणी येतात, मात्र यशामुळे समीकरण बदलत जाते.
'दंगल'मध्ये साक्षी तन्वर आमिर खानच्या पत्नीची भूमिका करत असल्याचे समजते. आमिरच्या चित्रपटांचा खूप प्रचार होतो आणि ते पाहिलेदेखील जातात. त्यामुळे साक्षी तन्वरला मोठ्या पडद्यावर चांगल्या जोडीदारासोबत पाहता येणार आहे. साक्षीने बराच काळ चालणाऱ्या मालिकांमध्ये काम केले आहे. तिचे राम कपूरसोबतच्या 'बडे अच्छे लगते हैं' मालिकेच्या सुरुवातीचे भाग मनोरंजक होते आणि त्यामध्ये साक्षीने प्रभावशाली अभिनय केला होता. या मालिकेतील प्रसंग मनोरंजक होते आणि तिच्या उशिरा होणाऱ्या सहवासाच्या दृश्यांवर खूप ओरड निर्माण झाली होती. कारण कौटुंबिक प्रेक्षकांसाठी बनवण्यात येणाऱ्या कार्यक्रमामध्ये मोकळेपणा दाखवला जात नव्हता. खरं तर दारूच्या नशेमधील दृश्यांमध्ये सहसा अतिशयोक्तीपणा दिसून येतो. मात्र, साक्षीने आपल्या स्टाइलने ही दृश्ये शूट केली. साक्षी रिअल लाइफमध्ये दारूपिते अशा अफवा त्या काळी ऐकायला मिळत होत्या. मात्र, वास्तवामध्ये पिण्याच्या दृश्यामध्ये अति नाटकीपणा येतो आणि जॉनी वॉकर, ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये कधीच दारूचा ग्लास शिवला नाही त्यांनी दारुड्याची भूमिका इतक्या सहजपणे साकारली की मिया बदरुद्दीनचे नावच जॉनी वॉकर करण्यात आले. त्यामुळेच कदाचित 'अभिनय शिकवला जाऊ शकत नाही, पण शिकला जाऊ शकतो' असे म्हटले जाते.
भावनांना अनुभवण्यासाठी तो आत्मसात करणे गरजेचे असते. जर दृढ इच्छाशक्ती असेल तर ही गोष्ट साध्य होऊ शकते. अभिनय शिकवला जात नाही म्हणजे याचा ना कोणता फॉर्म्युला आहे ना गणित. प्रत्येक भूमिका वेगळी असते आणि शिकला जाऊ शकतोचा अर्थ म्हणजे आवड असावी. जीवनाकडे पाहण्याची, पारखण्याची समज असावी. अनुभवांना आत्मसात करून शिकला तर हे शक्य आहे. वस्तुत: साक्षी आपल्या दीर्घ टेलिव्हिजन करिअरमध्ये अनुभवाने स्वयंशिक्षित आहे. टेलिव्हिजनमध्ये नेहमी एकसारखी स्थिती असते. टीव्ही उसाचा रस काढणारी हाताने चालणारी मशीन आहे. या मशीनमध्ये दुसऱ्यांदा ऊस घालताना त्यातील शिल्लक रस काढला जातो. उरलेला उसाचा चोथा जनावरदेखील खात नाही.
पुढे वाचा, साक्षी तन्वरसोबत संपूर्ण ताकदीनिशी आखाड्यामध्ये उतरणार आमिर खान...