आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुत्राला चित्रपटसृष्‍टीत आणण्‍यासाठी सनी देओलने बनविला प्‍लॅन, जाणून घ्‍या...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्‍या पुत्राला सिनेसृष्‍टीत आणण्‍यासाठी सनी देओलने एक मोठा प्‍लॅन बनविला आहे. त्‍यासाठी त्‍याने 'ये जवानी है दिवानी' चे लेखक अयान मुखर्जी सोबत पुत्रासह भेट घेतली आहे. आपल्‍या पुत्राचा पहिलाच चित्रपट भव्‍य दिव्‍य स्‍वरुपात असावा असे त्‍यांना वाटते. सनी देओल यांनी असे ठरविले, की ते स्‍वत: त्‍यांच्‍या मुलाला निर्देशित करणार नसून त्‍याचा निर्देशक युवा असावा. त्‍यांच्‍या निर्देशकांच्‍या अनुसूचीमध्‍ये इम्तियाज अलीचेही नाव आहे. त्‍यांनी ठरविले आहे, की त्‍यांच्‍या मुलाचा पहिला चित्रपट प्रेम कथेवरच असेल.


जाणकारांच्‍या मते असे सांगण्‍यात येते, की धर्मेंद्रनेही सनी देओला चित्रपटसृष्‍टीत आणण्‍यासाठी असाच मोठा प्‍लॅन तयार केला होता. राहुल रवैल यांनी निर्देशित केलेल्‍या 'बेताब' चित्रपटातून पदार्पण केले होते. जेव्‍हा धमेंद्र 'मेरा नाम जोकर' मध्‍ये काम करत होते तेव्‍हा राजेंद्र कुमारने त्‍याचा मुलगा कुमार गौरवला राहुल रवैलच्‍या 'लव्‍ह स्‍टोरी' साठी निर्देशित केले होते. जाणकारांच्‍या मते 'बेताब' आणि 'लव्‍ह स्‍टोरी' ला आर.डी. बर्मन यांनी संगीत दिले असून त्‍यांना युवा चित्रपटांसाठी श्रेष्‍ठ संगीतकार मानले जायचे.

पुढील स्‍लाइडमध्‍ये जाणून घ्‍या सनी द‍ेओलचा मुलासाठी बनविलेला प्‍लॅन....