आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकत्र कुटुंब पद्धतीचे महत्त्व सांगणारा- ‘आँखो देखी’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रजत मिश्राच्या संजय मिश्रा अभिनीत ‘आँखो देखी’ मध्ये दिल्ली 6 मधील अरुंद गल्ल्यामधील निम्न मध्यमवर्गीय कुटुंबाची कथा आहे. यात बिकट परिस्थितीत फक्त नात्याच्या बळावर ते कुटुंब जगत असते. अशा प्रकारच्या कुटुंबात नात्यात दुरावा माणसाला मोडून टाकतो. कधी-कधी रोजची कुरबुर चांगली वाटते. त्यातून कधी-कधी विनोदही निर्माण होत असतो. हा चित्रपट ते जीवन जवळून पाहण्याची संधी देतो, ज्यांच्यासाठी तत्त्वज्ञानाविषयी गंभीर होणे विनोदी होत जाते. या नाटकीय जीवनातदेखील त्यांचे हसणे, थट्टा करणे खरच एक गंभीर समस्या आहे.
अनेक लोक सरळ सपाट आणि समस्यांनी वेढलेले जीवन जगत असतात. मात्र, हा प्रवास सोपा नाही. अशा अवस्थेत एखादी आतील शक्ती आपल्याला वेडे होण्यापासून वाचवते. खरे तर अशा परिस्थितीत लोकांना वेड न लागणे एक आश्चर्य आहे. जीवनाचे हे वास्तव रजत कपूर यांनी इतके चांगल्या प्रकारे मांडले आहे की, आपणदेखील त्याच घरातले आहोत, असा भास होतो. हा प्रभाव दाखवण्यासाठी रजत कपूरला रंगमंचाच्या कलावंतांनी सहकार्य केले आहे. संजय मिश्राने त्यात अत्यंत विलक्षण अभिनय केला आहे.
जयप्रकाश चौकसे यांचा सविस्तर लेख वाचण्यासाठी, पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...