आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक, भावना आणि कट्टरता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काही दिवसांपूर्वी मल्लिका शेरावतने अमेरिकेत इंग्रजी भाषेचा चित्रपट बनवला होता. या चित्रपटात पती डेमोक्रॅटीक पार्टीचा कार्यकर्ता असतो आणि पत्नी रिपब्लिकनसाठी जीव देण्यास तयार असते. या विनोदी चित्रपटाचे प्रदर्शन होऊ शकले नाही. भारतातदेखील सुचेता आणि आचार्य कृपलानी दोन वेगवेगळ्या पक्षातून निवडणूक लढवत होते. दिग्विजयचा भाऊ काही काळासाठी विरोधी पक्षाच्या ताफ्यात गेला होता. राजमाता सिंधियाने भाजपला मदत केली तर त्यांचा मुलगा माधवराव सिंधिया कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते. भारतातील कुटुंबाच्या सदस्यांचे विरोधी पक्षात जाण्याचे कारण अंतर्गत तडजोड असावी, कारण कुटुंबातील एक व्यक्ती तरी सत्तेत कायम असावा, असा काही लोकांचा विचार आहे. एकाच खोलीत राहणार्‍या पती-पत्नीचे राजकीय विचार एकमेकांच्या विरोधात असू शकतात. मात्र, तरीही नाते सांभाळले जाते. पक्षातील रणनीतींना गुप्त ठेवत त्यांच्यामधील प्रेम कायम राहू शकते.
परदेशात काही जोड्या अशा आहेत, ज्यांच्यामध्ये दोन परस्परविरोधी देशातील लोक आहेत आणि त्यांच्या भागात युद्धावेळी या जोडीच्या घरात शांती कायम असते. खरे तर प्रेम आणि युद्ध अनेक स्तरावर लढवले आणि सांभाळता येऊ शकते. रुस्तम शत्रु राष्ट्रावर आक्रमण करतो आणि तेथील एका महिलेवर प्रेम करतो. मात्र, अनेक वर्षाचा काळ उलटल्यानंतर त्याचा मुलगा सोहराब त्याच्याशी युद्ध करतो. मुलाला गंभीररीत्या घायाळ केल्यानंतर त्याला समजते की हा आपलाच मुलगा आहे. लेख टंडनच्या ‘आम्रपाली’मध्येदेखील नायिकेला शत्रू देशातील राजाशी प्रेम होते. प्रेम शिखरावर पोहोचल्यावर आपण शत्रू राजाशी प्रेम केल्याचे आम्रपालीला समजते. या अपयशी चित्रपटात शंकर-जयकिशन आणि शैलेंन्द्रने अभूतपूर्व माधुर्य रचले होते.
‘तडप ये दिन रात की, कसक या दिन रात की, भला यह रोग है कैसा, सजन अब तो बता दे बिना कारण ये कैसी उदासी, क्यों अचानक घिर के आती है, थका जाती है मुझको, बदन क्यों तोड जाती है।’ सध्याच्या काळात परस्परविरोधी पक्ष लोकांच्या प्रेमसंबंधात दुरावा आणू शकत नाहीत, कारण कोणताही पक्ष राजकीय आदर्शावर विश्वास ठेवत नाही. सर्व प्रकरण सुविधा, स्वार्थ आणि सत्तेची हाव असणे आहे. एक कट्टर कम्युनिस्ट आणि कट्टर भांडवलदारामध्ये प्रेम होऊ शकत नाही. मात्र, असे झाले तर, हेमामालिनी भाजपकडून निवडणूक लढत आहेत आणि त्यांच्या विरोधात प्रकाश कौर निवडणूक लढवत असेल तर धर्मेंद्र कोणाच्या प्रचाराची धुरा सांभाळतील. सनी देओल निश्चितच आपल्या जन्मदात्या आईचा प्रचार करतील. तेव्हा रुस्तम सोहराबसारखी घटना घडू शकते.
राजकारणाच्या सिद्धांतावरून प्रेरित नसल्यावरदेखील राजकारण करणार्‍यांना जीवनात खरे प्रेम होऊ शकत नाही. तो देखील तितकाच वरवरचा असेल जितका राजकीय विश्वास; परंतु लिट्टे आणि माओवादी संघटनामध्ये राहून शत्रूवर प्रेम करण्याचा प्रश्नच उभा राहत नाही. या पक्षांचा लोखंडी विळखा वेगळ्या प्रकारचा आहे. शिवाय त्यांचे शास्त्रदेखील वेगळे आहे. माओवादी विचारधारा असणारे आपल्या ध्येयाकडेदेखील दुर्लक्ष करत नाहीत. याप्रकारचा राजकीय विश्वास कशा प्रकारचा असू शकतो याचा अंदाज आपल्याला महान फिल्मकार डेव्हिड लीन यांच्या ‘ब्रिज ओवर रिव्हर क्वाई’ या चित्रपटातून येऊ शकतो.
यामध्ये एक क्रांतिकारी पात्र आपल्या मवाळ विचाराच्या असलेल्या बहिणीच्या सायकलीच्या कॅरिअरमध्ये बॉम्ब ठेवतो आणि पोलिसांना फोन करतो. ती आदर्श महिला पोलिसांना बॉम्बसोबत सापडते आणि देशद्रोहाच्या गुन्ह्यामध्ये तिला फाशीची शिक्षा सुनावण्यात येते. आदर्श नागरिकाला फाशीवर चढवल्याने लोकांमध्ये आक्रोश भडकेल, जे क्रांतिसाठी चांगले ठरेल असा विचार क्रांतिकारी भावाचा आहे. ही खरोखरच आश्चर्यकारक गोष्ट आहे की, राजकीय पद्धतीने भावना नष्ट केली जाऊ शकते, तथापि भावनाशिवाय समानता, स्वातंत्र्यता आणि न्यायाची स्थापना केली जाऊ शकत नाही. अशा प्रकारे निवडणुका जिंकण्याविषयी सर्मपित लोक कार्यकर्ता बनू इच्छित आहेत. तथापि राजकारणाचा आधारच सामान्य माणसापासून भावनात्मक तारतम्य बनवण्याचे असते. त्यामुळे भावनाहीनतेने काम चालू शकत नाही. जनतेत इच्छा जागृत करण्यासाठीदेखील भावनेची गरज असते. शेवटी सत्तेची हाव भावनेला मारून टाकते आणि ज्येष्ठांकडे दुर्लक्ष केले जाते त्यांचा अपमान करण्याला रणनीती मानली जाते.