आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भ्रष्टाचार थांबू शकतो का?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘सत्यमेव जयते’ कार्यक्रमाच्या दुसर्‍या सत्रातील चौथ्या भागात आमिर खानने भ्रष्ट व्यवस्थेचा मुद्दा सादर केला. त्याने समस्येचा प्रत्येक पैलू सादर करत व्यवस्थेचा एक भाग समजला जाणारा आणि सर्वाधिक छाती ठोकणार्‍या सामान्य माणसालादेखील सोडले नाही. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आमिर खानने एक गमतीदार गोष्ट सांगितली. एक मालक दररोज एक लिटर दूध पीत होता. त्याचा नोकर पाव लिटर दूध स्वत: पिऊन त्यात तेवढेच पाणी मिसळायचा. हा प्रकार मालकाच्या लक्षात येताच त्याने देखरेख करण्यासाठी अजून एक नोकर ठेवला. दोन्ही नोकरांनी अर्धा लिटर पाणी दुधात मिसळणे सुरू केले आणि चौथ्या नोकराची नियुक्ती झाल्यानंतर चौघांनी सर्व दूध पिऊन टाकले. रात्री मात्र मालकाच्या मिशांवर मलाई लावली जेणेकरून सकाळी नित्यनेमाप्रमाणे दूध पिल्याचे त्याला जाणवावे. हा मालक सामान्य जनता आहे आणि दूध व्यवस्थेचे सर्व घटक मिळून-मिसळून पितात.
एक आमंत्रिताने सांगितले, की 1986 मध्ये तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी सांगितले होते की, केंद्राद्वारे गरिबांच्या मदतीसाठी दिलेल्या एक रुपयामधील फक्त चार आणे गरिबांपर्यंत पोहोचतात. आज तर व्यवस्थेचा भ्रष्टाचार इतका वाढला आहे की, जर केंद्राने 50 रुपये दिले तरीही सामान्य माणसापर्यंत चार आणेच पोहोचतील. प्रत्येक वेळी भ्रष्टाचाराचा मुद्दा निघाल्यानंतर आपण नेता-अधिकार्‍यांकडे बोट करतो. तसे तर व्यवस्थेच्या विराट स्वरूपात असंख्य लोक काम करतात. सर्वजण ‘दूधामध्ये आपला हिस्सा’ मागतात. भ्रष्टाचारावर दिवसभर छाती ठोक करणारा व्यक्ती व्यवस्थेचा आरसा सतत पुसत असतो. कारण त्यामध्ये खराब प्रतिमा दिसून येते. जेव्हा तो आपला चेहरा स्वच्छ करतो, त्यावेळेस त्याला आरशामध्ये स्वच्छ प्रतिमा दिसून येते.
असे किती लोक आहेत ज्यांना आपला चेहरा साफ करायचा आहे. यावर धर्मवीर भारती यांची कविता आठवली, ‘हम सबके माथे पर दाग, हम सबकी आत्मा में झूठ, हम सब सैनिक अपराजेय, हाथों में तलवारों की मूठ.’ या कार्यक्रमात अरुणा रायसहित काही लोक आले होते, जे 1994 पासून राइट्स टू इनफर्मेशनसाठी काम करतात. याची सुरुवात ग्रामीण भागातून झाली. तेथे मजुराकडून अंगठा लावून घेतला जात होता आणि त्याला अध्र्यापेक्षाही कमी मजुरी दिली जात होती. कार्यक्रमात आमंत्रित व्यक्तीने सांगितले की, सरकार कागदावर चालते. गरिबाच्या मदतीसाठी कागदी कार्यवाही करणारे अनेक लोकदेखील सामान्य माणसेच असतात. एका आमंत्रित महिलेने सांगितले की, एक गरीब मजुराच्या घरात राखेने चिन्ह काढण्यात आले होते, तो त्यांच्या कामाचा एक भाग होता, कारण ते लोक शिकलेले नव्हते. मात्र, त्यांना कधीच पूर्ण मजुरी दिली नाही, फक्त आश्वासनच मिळाले. संपूर्ण तपास झाल्यावर फाइल बंद केल्याचे समजले. म्हणजे त्यांना कधीच पैसा मिळाला नाही. तेच ‘मनरेगा’ योजनेसोबत होत आहे. कार्यक्रमात बिहारचा एक तरुण दिल्लीत नोकरी करत होता, त्याला संगणकाची इतकी जाण नव्हती मात्र किती पैसा मेहनत करणार्‍यांना मिळाला याचा तो कायम शोध घेत राहिला. त्याला कळल्यावर नोकरी सोडून तो आपल्या गावी परत आला आणि अन्यायाच्या विरुद्ध लढा दिला.
अशा प्रकारचे अनेक प्रयत्न ग्रामीण भागात झाले आणि नंतर राइट टू इन्फर्मेशन अँक्ट लागू झाला. त्यामुळेच सगळे घोटाळे उघड झाले. आंध्र प्रदेश, केरळ आणि बिहारमध्ये करण्यात आलेल्या प्रयत्नांनीच अखिल भारतीय स्वरूप धारण केले. समस्यांच्या समाधानाचे आदर्श रूप केरळच्या ग्रामपंचायतीत दिसून येते. तिथे पंचायतीतून मदत निधी मिळतो. सत्तेच्या विकेंद्रीकरणाची गोष्ट राहुल गांधी करत आहेत, मात्र ते मांडण्यामध्ये नाटकीय तत्त्वे नाहीत, जे बघ्यांना आवडत नाही. कार्यक्रमात आमिर खानने शरद जोशीची कथा ऐकवली. बनारसमध्ये एक भोळा पर्यटक भाचाच्या वेशात आलेल्या ठगाचा शिकार होतो. तो जेव्हा नदीत आंघोळ करत होता, तेव्हा त्याचे सामान घेऊन तो पळून जातो. नंतर तो मामा पश्चाताप करतो. समस्यांच्या घाटात लुटलेला सामान्य माणूस अशा प्रकारे वेडा होऊन उभा राहतो. एका आमंत्रिताने सांगितले की, एका राजाने शिक्षा दिली होती की, शंभर कांदे खा किंवा शंभर बूट. पंधरा कांदे खाताच डोळ्यातून पाणी वाहू लागले, तो बूट खाण्यासाठी तयार झाला. सरकार बदलल्यावर सामान्य माणसालादेखील शंभर कांदे किंवा शंभर बूट खाण्यास भाग पडते. वरवरचा बदल करून देश बदलू शकत नाही. आतून बदल घडवण्यासाठी घरातच नैतिक मूल्यांची स्थापना केल्याशिवाय व्यवस्थेत बदल होऊ शकत नाही. ज्या घरात बाजार घुसला आहे आणि आपल्याला त्याची सवय झाली आहे. तेव्हा बदल कसा होऊ शकतो? अशा प्रकारचे ज्वलंत मुद्दे मांडल्याबद्दल आमिर खानचे अभिनंदन.