आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आशुतोष गोवारीकर यांचा ‘मोहेंजोदडो’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आशुतोष गोवारीकर यांच्या ‘मोहेंजोदडो’ चित्रपटात हृतिक रोशनने काम करण्यास होकार दिला आहे. गोवारीकर टीमने ‘जोधा अकबर’ हा यशस्वी चित्रपट बनवला होता. तसेच इतिहासावर आधारित असलेला हा चित्रपट त्या काळात केवळ 40 कोटींत तयार झाला होता. त्या वेळी हृतिक आणि ऐश्वर्या राय बच्चन यांचे मानधन आजच्या प्रमाणे गगनाला भिडलेले नव्हते. त्या काळात चित्रपटसृष्टीतील तज्ज्ञांना असे वाटत होते की, ‘मुघल ए आझम’ प्रेक्षकांच्या अवचेतनात एवढा फिट बसला आहे की, आशुतोष यांनी केलेले प्रयत्न त्या तुलनेत तोकडे आहेत. तथापि, एकाच कालखंडातील या दोन वेगवेगळ्या कथा असल्यामुळे तुलना करण्याची गरजच नव्हती. प्रेक्षक तुलनेच्या फेर्‍यात कधीच अडकले नाहीत आणि जोधा-अकबर यांच्या प्रेमकथेचा आनंद घेण्यात सलीम-अनारकली यांची पूर्णपणे काल्पनिक असलेली कथा कधीच बाधा बनली नाही.
एकच कालखंड असल्यामुळे आशुतोष गोवारीकरांच्या प्रयत्नांमध्ये अधिक विश्वासार्हता असल्याचे आणि ए. आर. रहमान यांचे संगीतही मुघल संगीताशी मिळते-जुळते असल्याचे मुघल इतिहासाच्या जाणकारांना वाटते. तथापि, ‘मुघल ए आझम’मध्ये ‘मोहे पनघट पर छेड गयो नंदलाल’ ही लखनऊचे नवाब वाजिद अली शाह यांची रचना होती. या रचनेला मुघल म्हटले जाऊ शकत नाही. वस्तुत: लोकप्रियतेचा आधार विश्वासार्हता नसतो, तर त्याचे रसायनच वेगळे असते. त्यामुळेच ‘मुघल ए आझम’चे स्थान वेगळे आहे, परंतु ही कथा फारशी थिएटरच्या अधिक जवळची होती, तर आशुतोष गोवारीकर यांची रचना हॉलिवूडच्या ऐतिहासिक चित्रपटांप्रमाणे तुमच्या तर्कशक्तीशी छेडछाड करत नाही.
असो, हे सर्व लिहिण्याचे तात्पर्य म्हणजे, आशुतोष गोवारीकर यांचा राष्ट्रीय गुणवत्तेबाबत नेहमीच आग्रह असतो. तसेच आपल्या पद्धतीने संशोधन करून विश्वासार्हता प्रदर्शित करू इच्छितात. त्यांचा ‘लगान’ एक अद्भुत चित्रपट होता. यात साकारण्यात आलेले इंग्रजांचे पात्र मनोज कुमार यांच्या ‘क्रांती’प्रमाणे खरेखुरे वाटत होते. गावातील नवशिके क्रिकेटपटू डॉन ब्रॅडमनसारखे नव्हते, तर ते आव्हान म्हणून आपला जीव ओतणारे लढवय्ये व्यक्ती दिसून येत होते. आशुतोष गोवारीकर यांचा अनेक वर्षांपासून करमणूक जगताशी संबंध आला आहे. त्यांनी टीव्हीपासून सुरुवात केली होती आणि आता पुन्हा ‘स्टार’ वाहिनीवर ‘एव्हरेस्ट’ सादर करणार आहेत. त्यांचा अभिषेक बच्चन अभिनीत ‘खेलेंगे जी जान से’ हा चित्रपट स्वातंत्र्य संग्रामाच्या स्पर्श न केलेल्या एका विषयावर तयार करण्यात आला होता. यामध्ये किशोरवयीन मुलाचा विद्रोह दाखवण्यात आला होता. चित्रपट चालला नाही, पण त्याच्या विश्वासार्हतेवर कोणतेच प्रश्नचिन्ह नाही.
आशुतोष गोवारीकर यांनी रांघेय यादव यांची ‘मुदरें का टिला’ ही कादंबरी वाचली आहे किंवा नाही, हे सांगणे कठीण आहे. कारण या कादंबरीचा आधारही ‘मोहेंजोदडो’च आहे. ही काबंदरी वाचून मला अनेक वर्षे झाली आहेत. त्यामुळे फारसे काही आठवत नाही. मात्र, रांघेय यादव आणि आशुतोष गोवारीकर यांचा आपल्या कामाबाबतचा सर्मपणाचा भाव समान आहे. ती कादंबरी संशोधनासाठी उपयुक्त ठरू शकते, परंतु चित्रपटाचा एकमेव स्रोत ठरू शकत नाही. मोहेंजोदडोचे अवशेष हरवलेल्या संस्कृतीबाबत सखोल माहिती देतात. तसेच हे अवशेष गौरवशाली संस्कृती असल्याचा आभासही होतो. या अवशेषांचा जवळून अभ्यास केल्यावर त्याच्या पतनाची कारणेदेखील समोर येतात. जर पुरातन संस्कृती अत्यंत वैभवशाली असतानाही ज्ञानाची तहान लागत नसेल किंवा कमी झाल्यामुळे नष्ट झाली असेल, तर आधुनिक संस्कृती कदाचित माहितीचा स्फोट किंवा ज्ञानासाठी अमर्याद तहान लागत असल्यामुळे मरू शकते.