आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आतला आणि बाहेरचा भूगोल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आमिर खानचा जन्म मुंबईतील ज्या फ्लॅटमध्ये झाला तो फ्लॅट उच्चभ्रू वर्गाच्या पाली हिल आणि वांद्रय़ाचा युनियन पार्क परिसरात आहे. आज तिथे 35,000 रुपये फूटएवढा भाव सुरू आहे, परंतु अनेक दशकांपूर्वी कदाचित त्या फ्लॅटची किंमत काही हजारांमध्ये असावी. फ्लॅट परिसराची संरक्षण भिंत मजबूत असून त्या काळातील आर्किटेक्टच्या हिशेबाने छताची उंची 15 फुटांपेक्षा जास्त आहे. मात्र, आज गगनाला भिडलेल्या किमतींमुळे बिल्डर 10 किंवा 12 फुटांपेक्षा जास्त उंचीच्या खोल्या बनवत नाहीत.
सारांश, या खोल्या आजच्या कोंबड्यांच्या खुराड्यांप्रमाणे असलेल्या खोल्यांपेक्षा वेगळ्या आहेत. इमारतीच्या पुनर्विकासाची जबाबदारी बाहेरील व्यक्तीला न देता मला द्यावी, असा प्रस्ताव आमिरने सर्व रहिवाशांसमोर ठेवला होता. त्याच्या प्रस्तावात स्वत:साठी 20 हजार फुटांचा स्वतंत्र बंगला आणि सर्व सदस्यांना त्यांच्या सध्याच्या जागेपेक्षा थोडी अधिक जागा मिळावी, मजबूत व संपूर्ण गुणवत्तेने पुनर्निर्मिती, सदस्य आपला फ्लॅट विकू शकतील, त्यांना सध्याच्या भावापेक्षा दुप्पट रक्कम 70,000 रुपये फुटांनुसार दिली जाईल, असा उल्लेख होता.
असो, हे सर्व लिहिण्याचा उद्देश म्हणजे, मनुष्य आपल्या जन्म ठिकाणाच्या बाबतीत खूप भावनिक आणि संवेदनशील असतो. वस्तुत: आमिर खानच्या आईचे त्या जागेशी भावनिक नाते जुळलेले आहे. अनेक दशकांपूर्वी त्या येथे नवरी बनून आल्या होत्या आणि जगाचा निरोप त्यांना येथूनच घ्यायचा आहे.
आज राजकारणामध्ये प्रत्येक उमेदवार आपले जन्म ठिकाण किंवा आपल्या शहरापासून दूर निवडणूक लढवत आहे. तो वारंवार त्या शहराशी आपले संबंध जोडण्याचा खरा-खोटा प्रयत्न करत आहे. वस्तुस्थिती ही आहे की, केवळ भारतीय आहात म्हणून तुम्ही कुठूनही निवडणूक लढवली तरी हरकत नाही, पण आपल्या शहराशी घनिष्ठ संबंध असल्याचे जटिल प्रयत्न हास्यास्पद वाटतात. हे सर्व राजकारण्यांकडून प्रांताबद्दलच्या अभिमानाचे वेड निर्माण केल्यामुळे झाले आहे. जवाहरलाल नेहरूंनी इलाहाबादेतून कधीच निवडणूक लढवली नाही. राजकारण असो किंवा इतर कोणतेही क्षेत्र, स्वस्त आधारहीन लोकप्रियतेचा फुगा जास्त काळ उडत नाही.
जन्मस्थळी परतण्याच्या भावनेच्या आधारावर बरेच साहित्य रचण्यात आले आले, अनेक चित्रपटदेखील बनले. आठवणींच्या धाग्याने बांधलेला माणूस जन्मस्थळाकडे ओढला जातो. जन्माच्या वेळची नाळ एक खरी वस्तू आहे, तिथे परतणे ही एक भावना आहे. खुनीदेखील एकदा आपल्याकडून खून केलेल्या ठिकाणी परततो. त्याचा अपराध बोध त्याला त्या ठिकाणी आणतो का? तो पकडल्या गेला नाही, हाच विकृत आनंद आहे. या खुनाच्या धाग्याचा कोणताच संबंध अम्लिकल कार्ड (नाळ)शी नाही आणि जन्मस्थळी परतण्याच्या उत्साहाशीही नाही, पण दोन्ही गोष्टींचा वेग समान आहे.
जन्म ठिकाणाहून पलायन संधीच्या शोधात केले जाते आणि अनेक सामाजिक परिवर्तन पलायनामुळेच होतात. रोजी-रोटी देणारी शहरे किंवा महानगरांमध्ये मनुष्य आपल्या जन्म ठिकाणच्या आठवणी संग्रहित करून ठेवतो. आपल्या सर्व महानगरांमध्ये अनेक भाग आणि उपनगरे निर्माण होत राहतात. तसेच पाश्चिमात्य देशांमधील महानगरांप्रमाणे निर्मळ महानगरे भारतात नाहीत. या विषयावरही बरेच चित्रपट तयार झाले आहेत. हाच विचार भव्य स्वरूपात समोर येतो की, देशाच्या भौगोलिक ठिकाणांपासून माणसाचे आत्मीय तादात्म्य सहजपणे बनते.
आपल्यासाठी हिमालय केवळ पर्वत नाहीत, गंगा फक्त नदी नाही. हे सर्व पर्वत, नद्या माणसांच्या हृदयाच्या भूगोलात नेहमी, प्रत्येक ठिकाणी उपलब्ध असतात. परदेशात वास्तव्यास असलेले भारतीय आपल्या जन्म ठिकाणाला विसरू शकत नाहीत. जहाजाच्या पक्ष्याप्रमाणे पुन: पुन्हा परत येतात. तेथील आलिशान घरांमध्ये तुम्हाला भारताची झलक पाहायला मिळू शकते. चार्ली चॅप्लिनने आपल्या आत्मकथेत लिहिले आहे की, त्याचे आजे-पणजे भारतातील भटके होते आणि युरोपमध्ये त्यांना जिप्सी म्हटले जाऊ लागले. त्यापैकी काही लंडनमध्ये येऊन सथायिक झाले. चॅप्लिनच्या हृदयात भारताबद्दल भावनिकता होती आणि संधी मिळाल्यावर ते महात्मा गांधींना जाऊन भेटलेदेखील होते. आज आमिर जेवढय़ा पैशांमध्ये आपल्या जन्म ठिकाणाचा पुनर्विकास करू इच्छितो त्यापेक्षा कमी पैशांमध्ये त्याच्याही पेक्षा अधिक चांगली जागा त्याला मिळू शकते. मात्र, एका भावनेचे मूल्य पैशांच्या मापदंडावर मोजले जाऊ शकत नाही.