आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्जुन कपूरच्या टॅटूमध्ये 'आई'चे वर्णन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उदय चोप्रा आणि नर्गिस फखरीच्या प्रेमकथेत नर्गिसच्या हॉलीवूड स्वप्नामुळे अडथळा आला आहे. मात्र, अर्जुन कपूर आणि अलिया भट यांची प्रेमकथा संथ गतीने चालत आहे. रणवीरसिंह आणि दीपिका पदुकोणच्या प्रेमकथेत दीपिकाचा गुप्त अजेंडा फक्त आपला पहिला प्रियकर रणबीर कपूरच्या मनामध्ये ईष्र्या जागवणे हा आहे. सर्व फिल्मी प्रेमकथा एकतर्फी असतात. चित्रपटांमध्ये रमलेला मनुष्य पडद्यावर प्रेमाचा अभिनय करता करता प्रेम करण्याची एकाग्रता आणि वेड यापासून अनभिज्ञ राहतो. त्याचे खरे प्रेम त्याच्या पडद्यावर सादर झालेल्या प्रतिमा आहेत. अर्जुन कपूरने 'इश्कजादे' चित्रपटाची अभिनेत्री परिणीती चोप्राशी यापूर्वीच एक डाव खेळला आहे.
असो, अर्जुन कपूरने आपल्या शरीरावर 'माँ' गोंदवले आहे. सैफने करिनाचा टॅटू काढला होता, युवा वर्गही अनेकदा आपल्या प्रेयसींच्या नावाचे टॅटू काढतो. गुलशेर शानी यांच्या जीवनावर प्रकाश टाकणार्‍या 'सांप-सीढी' या कादंबरीनंतर 'कस्तुरी' नावाने प्रकाशित झालेल्या एका पुस्तकात एका आईला आपल्या अल्पवयीन मुलीच्या विवाहित होण्याच्या इच्छेची माहिती तेव्हा मिळते, जेव्हा ती जत्रेमध्ये आपल्या मांडीवर गोंदवून घेते. गोंदवून घेतल्याने प्रेमाचा मार्ग खुला होतो, असे त्या भागातील मुलींना वाटते. ती चांगला पती मिळण्यासाठी सोळा श्रावणाचा उपवास करत नाही. असा प्रयोग शैलेंद्र यांनी 'संगम'मधील गाण्यामध्ये केला. नायिकेचे कडवे असे होते, 'करते -करते कितने सावन बीत गए, जाने कब इन आँखो का शर्माना जायेगा हर दिल जो प्यार करेगा, गाना गायेगा' आदिवासींच्या 'गोंदवून' घेण्याच्या संस्कृतीचा अंगीकार आता महानगरातील तरुण वर्गानेही केला आहे. अशाप्रकारे मनुष्यच नव्हे तर परंपरेचेदेखील अपहरण होत आहे. आता गोंदणाचा अतिरेकच होत आहे.
जयप्रकाश चौकसे यांचा सविस्तर लेख वाचण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...