आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'क्वीन\' कंगना अमेरिकेच्या विद्यालयात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'क्वीन' चित्रपटाच्या व्यावसायिक यशासोबतच कंगना रनोटच्या विलक्षण अभिनयाने तिच्यासाठी प्रेक्षकांचे प्रेम आणि चित्रपट उद्योगाची प्रशंसा मिळवली. एवढचे नाही तर तिच्या समकालीन प्रतिस्पर्धी अभिनेत्रींनी देखील तिच्या प्रतिभेचे कौतुक केले. एका छोट्या शहरातून महानगरात येऊन कुणाचीही शिफारस आणि गॉडफादर नसताना तिने मध्यम बजेटच्या चित्रपटांमध्ये यश मिळवले, तेदेखील कोणत्याही मोठय़ा बॅनरमध्ये काम न करता. राकेश रोशनच्या 'क्रिश 3' चित्रपटात तिने साकारलेल्या खलनायिकेच्या भूमिकेसमोर नायिकेची भूमिका फिकी वाटते. आज तिने पुन्हा 'क्वीन' च्या यशाचा उल्लेख न करता 'तनु वेड्स मनु -2' चित्रपटाचे शूटिंग करण्याचा निर्णय घेतला. तसेच ती दीड महिन्यासाठी अमेरिकेला जाऊन पटकथा लेखन आणि दिग्दर्शनाचा कोर्स पूर्ण करेल. याचा पहिला टप्पा तिने काही महिन्यांपूर्वीच पूर्ण केला आहे. स्वत:चे मूल्यमापन करण्याचे हे तिचे वेड तिला इतरांपासून वेगळे ठरवते.
जयप्रकाश चौकसे यांचा सविस्तर लेख वाचण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...