आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शुद्धी' विरुद्ध 'बाजीराव मस्तानी'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्या प्रत्येक क्षेत्रात छायायुद्ध लढले जात आहेत. क्रूर लोक आरडाओरडा करत दुसर्‍यांवर आक्रमण करण्याच्या मुद्रेत नृत्य करत आहेत. त्याला तुम्ही 'डान्स ऑफ डेमोक्रसी' म्हणू शकता. चित्रपट उद्योगात असेच एक छायायुद्ध करण जोहर आणि संजय भन्साळी यांच्यामध्ये सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. मुद्दा हा आहे की, 2015 मधील ख्रिसमसच्या सुट्यांमध्ये जोहरचा 'शुद्धी' आणि भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी' चित्रपटाचे प्रदर्शन होत आहे. म्हणजे अजून या दोन्ही चित्रपटांचे शूटिंग सुरू व्हायचे तर दूरच, चित्रपटातील कलावंतांची निवडदेखील झाली नाही. करणकडे कदाचित दीपिका पदुकोण, तर भन्साळींकडे रणवीर सिंह आहे. भन्साळींना आशा आहे की दीपिका आपल्याकडे येईल. असे ऐकण्यात आले की, हृतिक रोशनने 'शुद्धी' सोडला आणि करीना कपूरला या चित्रपटामधून हटवण्यात आले. चित्रपट उद्योगात नवीन पद्धत सुरू झाली आहे. सुरुवातीला सुट्यांच्या आठवड्याची निवड करायची आणि प्रदर्शनाची तारीख निश्चित केल्यानंतर बॅकवर्ड प्लॅनिंग करायची. म्हणजेच जर 20 डिसेंबरला चित्रपट प्रदर्शित होणार असेल तर एक डिसेंबरला सेन्सॉर आणि एक नोव्हेंबरपासून डीआय करायचे.
आजकाल शूटिंगनंतर डिजिटल प्रक्रियेद्वारे नायक-नायिकेला सुंदर दाखवले जाऊ शकते. तसेच खराब दृश्याचीदेखील दुरुस्ती होते. जसे विवाहापूर्वी मुलीला ब्यूटी पार्लरमध्ये पाठवले जाते, यामुळे तिचे सौंदर्य अधिक खुलून दिसते. बॅकवर्ड प्लॅनिंगच्या हिशेबाने 20 डिसेंबरला प्रदर्शित होणार्‍या चित्रपटाचे शूटिंग सप्टेंबरमध्ये संपायला हवे. कारण पोस्ट प्रॉडक्शनसाठी तीन महिने लागतात. एकूणच हे सर्व मॅनेजमेंटचे फिल्मी फंडे आहेत. आता गुणवत्तेला प्राधान्य दिले जात नाही. जुन्या काळात के. आसिफ 'मुघले आजम' बनवण्यासाठी दहा वर्षे घेत होते. चित्रपट कधी पूर्ण होणार हे विचारण्याचे धाडस गुरुदत्तचे गुंतवणूकदारदेखील करत नव्हते. राज कपूर यांनी 'आवारा'च्या प्रदर्शनापूर्वी यामध्ये स्वप्नाचे दृश्य जोडण्याचा निर्णय घेतला, यासाठी चार महिने लागले. या विरळ लोकांसाठी काम करणे साधनेप्रमाणे होते. तुम्ही एखाद्या योग्याला साधना केव्हा पूर्ण होईल हे विचारू शकत नाही.
आज चित्रपटदेखील फॅक्टरीचे उत्पादन आहे. तंत्रज्ञान एवढे विकसित झाले की सर्व खराब शॉट्स नंतर दुरुस्त करता येऊ शकतात. आजकाल काही धनाढय़ कुटुंबे घरी जन्म घेणार्‍या मुलाचे भविष्य काय असेल, हे ज्योतिष्याला विचारतात. त्यानंतर ज्योतिष्याने सांगितलेल्या भविष्यानुसारच सिझेरियनद्वारे मुलास जन्माला घालण्याचे डॉक्टरांना सांगतात. जणू काही नॉर्मल डिलेव्हरीची वाट पाहिली जाऊ शकत नाही. अनेक गर्भर्शीमंत लोक 'कंट्रोल फ्रीक' असतात. म्हणजेच प्रत्येक गोष्ट आपल्या नियंत्रणात हवी, असे त्यांना वाटते. सहकारी अथवा कुटुंबातील सदस्यांच्या विचारांना कोणतेच महत्त्व नसते.
जर तुम्हाला एका 'कंट्रोल फ्रीक'ला पूर्ण फॉर्ममध्ये पाहायचे असेल तर त्याला कारच्या मागील सीटवर बसवून त्याच्याकडून ड्रायव्हरला दिलेल्या सूचना ऐका. यालाच बॅकसीट ड्रायव्हिंगदेखील म्हणतात. कंट्रोल फ्रीक वडीलच आपल्या मुलांचे करिअर निवडतात आणि त्यांच्या पत्नी शोधतात. खरं तर प्रत्येक मनुष्य जीवन आणि समाजाच्या कोणत्याही स्तरावर 'कंट्रोल फ्रीक' आहे. दुसर्‍यांवर स्वत:ला लादण्याची प्रवृत्ती अत्यंत सशक्त असते.
या प्रकरणाची दुसरी बाजू खूप भयावह आहे. आपल्याला पावलोपावली कुणी तरी निर्देश द्यावेत, असे काही लोकांना वाटते. कारण स्वत: काही तरी करण्यामध्ये याच प्रवृत्तीमुळे ते असर्मथ ठरतात. जगाच्या इतिहासामध्ये वेळोवेळी हुकूमशहा निर्माण झाले. 'कंट्रोल फ्रीक' असणे यामागचे कारण आहे. तसेच कुणी तरी कायम निर्देश देत राहावे, असे इतर लोकांना आवडणे हेदेखील एक कारण आहे. च्युइगमद्वारे कायम राहण्याचा प्रभाव देणारे स्नायू असेच असतात. 'शुद्धी' विरुद्ध 'बाजीराव मस्तानी' चित्रपटाचे छायायुद्ध बर्‍याच गोष्टींचे संकेत आहेत.