आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'तेरी यादों का हँगओव्हर'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जवळपास दीड महिन्यानंतर सलमान खान पोलंडमधून भारतात आला. तेथे त्याने साजिद नाडियाडवालाच्या 'किक'ची सर्व दृश्ये शूट केली आहेत. तथापि, ही दृश्ये गेल्या वर्षी लंडन येथे शूट होणार होती, परंतु व्हिसाच्या गोंधळामुळे लंडन दौरा रद्द करण्यात आला होता. यात अमेरिकन तंत्रज्ञदेखील सहभागी होणार होते. उणे दोन डिग्री तापमानातील थंडीतून तो आता मुंबईच्या दमट वातावरणात परत आला आहे. मात्र, कुटुंबीयांकडे परत येण्याचा आनंद सर्व तापमानाच्या पलीकडचा असतो. पोलंडमध्ये शूटिंग झाल्यानंतर उर्वरित वेळेत तो रुस्तमे हिंद गामा पहिलवानाच्या बायोपिकची तयारी करत होता. त्याने या पटकथेसाठी आवश्यक सर्व माहिती मिळवली आहे. तसेच त्याने लहानपणी आपल्या काकांकडूनही त्या पहिलवानाच्या बाबतीत ऐकले होते. ही गोष्ट आजही त्याच्या मनात कायम आहे. योगायोग म्हणजे त्याने 'किक'मधील 'तेरी यादों का हँगओव्हर' हे गाणे ऐकवले आहे. एका दारुड्याच्या दुसर्‍या दिवशीच्या सकाळच्या मानसिक स्थितीला हँगओव्हर म्हणतात.
तुम्हाला नशेच्या लाटेने एखाद्या अनोळखी बेटावर आणून असहाय सोडले, असा हा नशा उतरण्याचा पहिला क्षण तुम्ही अनुभवू शकता. ही नशा व नशेनंतरची स्थिती अनेक गोष्टींतून मिळते. उदा. 16 मे रोजी संपूर्ण देश निवडणुकीच्या नशेत बुडालेला असेल. गेल्या दोन महिन्यांचा उत्साह, अफवांचे वावटळ आणि बेजबाबदार वक्तव्यातून मुक्ती मिळेल. तसेच टीव्ही सॅटेलाइट मालकांच्या उंच टीआरपीचा नशादेखील उतरेल, खळबळजनक पत्रकारितेला लगाम लागेल. हवेत ऑक्सिजनचे प्रमाण वाढेल आणि नाजूक फुप्फुसांनाही आराम मिळेल. निवडणुकीच्या काळात रोजंदारीवर काम करणार्‍यांनाही आराम मिळेल, पण विजयी उमेदवार पुन्हा सत्तेच्या नशेत बुडतील.
जयप्रकाश चौकसे यांचा सविस्तर लेख वाचण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...