आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नरेंद्र मोदी यांच्यावर दोन बायोपिक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जवळपास दोन वर्षांपूर्वी मितेश पटेल आणि त्याचा मित्र-भागीदार रूपेश पॉल यांनी परेश रावल यांच्या मदतीने नरेंद्र मोदींची परवानगी घेत त्यांच्या जीवनावर सिनेमा बनवण्याची योजना आखली. पटकथेवर कामही सुरू केले, पण निवडणुकीमुळे शूटिंग सुरू होऊ शकली नाही. तथापि, निवडणुकीच्या काळातच हा सिनेमा प्रदर्शित करण्याची मूळ योजना होती. आज रूपेश पॉल आणि मितेश पटेल काही कारणांमुळे वेगळे झाले. दोघांचीही स्वतंत्रपणे सिनेमा बनवण्याची इच्छा आहे. मितेशच्या सिनेमाचे दिग्दर्शक आणि नायक परेश रावल आहेत. त्यांची मोंदीशी असलेली जवळीकता जगजाहीर आहे. रूपेश पॉलच्या सिनेमात बंगालचा अभिनेता व्हिक्टर बॅनर्जीला नरेंद्र मोदींच्या भूमिकेसाठी करारबद्ध करण्यात आले आहे. दोघेही कधीकाळी भागीदार होते का आणि आज वेगळे झालेल्या लोकांजवळ एकच पटकथा आहे का? हा सिनेमा भागीदारीत सुरू झाला होता, पण आता भागीदारी तुटल्यानंतर पटकथा आणि प्रोजेक्टच्या कॉपीराइटवर कोणाचा अधिकार आहे? नुकतेच ‘तनू वेड्स मनू’च्या एका भागीदाराने दिग्दर्शकाला कायदेशीर पत्र पाठवले आहे. ज्यासाठी कंगनाने सप्टेंबर महिना आरक्षित केला, त्या यशस्वी सिनेमाचा दुसरा भाग बनवू शकत नाहीत, असे त्या पत्रात म्हटले आहे. हे तर निश्चित आहे की, वाद वाढल्यावर नरेंद्र मोदी परेश रावल यांच्या बाजूने उभे राहतील. या प्रकरणाशी संबंधित दुसरा मुद्दा हा आहे की, एका पंतप्रधानाचे दोन बायोपिक त्यांच्या सत्ता काळातच प्रदर्शित होणार असतील, तर त्यांना अघोषित ‘सरकारी’ सिनेमा म्हटले जाईल. तसेच आपल्या पंतप्रधानांच्या बायोपिकमधील एखादा अंश हटवण्याचा आपल्याला अधिकार आहे का? हा पेच सेन्सॉर बोर्डाच्या अधिकार्‍यांच्यासमोर निर्माण होईल. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू राज कपूर, दिलीप कपूर, ख्वाजा अहमद अब्बास, चेतन आनंद इत्यादी चित्रपटसृष्टीतील लोकांशी अनेकदा थोड्या वेळासाठी भेटत होते. तसेच 1946 मध्ये चेतन आनंद यांच्या ‘नीचा नगर’चे प्रदर्शन त्यांच्यामुळेच होऊ शकले. याचा सविस्तर तपशील श्रीमती उमा आनंद यांच्या पुस्तकात प्रकाशित झाला आहे. अशाच एका मुलाखतीत नेहरू राज कपूरना म्हणाले की, ‘तुम्ही मुलांवर एक सिनेमा बनवा आणि गरज पडल्यास त्यात ठरावीक वेळेसाठी मी स्वत: हजर राहील.’ तुम्हाला माहीतच असेल की, नेहरूंचा जन्मदिन ‘बाल दिन’ म्हणून साजरा केला जातो.
राज कपूर यांनी ‘अब दिल्ली दूर नहीं’ची निर्मिती केली होती. त्याच्या कथेचा सार हा आहे की, जो गुन्हा केलाच नाही, त्या गुन्ह्यात एका लहान मुलाच्या वडिलांची कारागृहात रवानगी केली आहे. मुलगा आपल्या गावात असेपर्यंत त्याने केलेल्या सर्व प्रयत्नांना अपयश येते. त्यानंतर तो एकटाच पैसा आणि कोणतेच साहित्य सोबत न घेता दिल्लीच्या दौर्‍यावर जातो. तेथे तो आपल्या नेहरू चाचांना न्याय मागतो. संपूर्ण चित्रपट याच दौर्‍याच्या मानवी संवेदनांनी भरलेला तपशील आहे. तसेच क्लायमॅक्समध्ये एका सार्वजनिक सभेतील भाषण संपवल्यानंतर बाहेर जाणार्‍या पंतप्रधानांची भेट घेण्याचा प्रयत्न करणारा तो मुलगा असहायपणे ओरडत आहे. त्याची आर्त हाक नेहरू ऐकतात आणि त्याच्याकडे धाव घेतात, त्याला कडेवर घेतात. या भागाच्या शुटिंगसाठी नेहरूंच्या काही तासांचीच गरज होती. राज कपूर यांच्या पत्रास उत्तर देताना नेहरूंनी त्यांना दिल्लीला येण्यास सांगितले. तेथे इंदिरा गांधी राज कपूरना म्हणाल्या की, ‘त्यांची खरोखरच ही शुटिंग करण्याची इच्छा आहे, पण मंत्रिमंडळाने यास विरोध केला आहे. हा विरोध करण्यात मोरारजी देसाई आघाडीवर आहेत. या वादामुळे नेहरू शुटिंग करणार नाहीत.’ इंदिराजींनी यासाठी दिलगिरीही व्यक्त केली. राज कपूर यांनी आपल्या आयुष्यात पहिल्यांदाच इच्छा नसतानाही एक चित्रपट पूर्ण केला आणि फिल्म्स डिव्हिजनकडून नेहरूंचे स्टॉक शॉट्स घेऊन संपादन टेबलावर मुलगा आणि नेहरूंच्या भेटीचे दृश्य कसेतरी तयार केले.
या प्रस्तावित सिनेमामध्ये ते अभिनय करणार नाहीत इथपर्यंत ठीक आहे, पण पडद्यावर तर मोदींचे रूपच सादर होईल. मोदींचा बायोपिक प्रदर्शित झाल्यानंतर टीकेकडे सहिष्णुतेने बघितले जाईल. नरेंद्र मोदी यांच्या प्रचारात थ्रीडी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. याद्वारे एकाच वेळी त्यांची थ्रीडी प्रतिमा अनेक शहरांमध्ये पाहण्यात आली. प्रस्तावित सिनेमांमध्येही असाच काहीसा प्रभाव तयार होईल. कृष्ण आपल्यासोबत असल्याची अनुभूती सर्व गोपिकांना होत असल्याचे स्वर सागरात वर्णन केले आहे. याची आठवण आज या प्रकरणामुळे होत आहे. टेक्नोलॉजी संपूर्ण मायथॉलॉजी सादर करू शकते. बाजार आणि जाहिरात क्षेत्रातील दिग्गजांनी मोंदींची इच्छा आणि त्यांच्या सहमतीने त्यांना एका उत्पादनाप्रमाणे सादर केले आणि मार्केटिंगच्या अभ्यासक्रमात हा धडा समाविष्ट केला जाईल, हे या प्रयत्नाचे विलक्षण यश आहे. या कालखंडाचे सत्य केवळ बाजार आणि जाहिरातीच ठरवतात आणि याचा बहुतांश लोक स्वीकारही करतात. निवडणुकीतील मोठय़ा विजयानंतर अनेक गोष्टी आणि मुद्दे अदृश्य झाले आहेत. अशा प्रकारचे बायोपिक आपल्या सत्ताकाळात तयार होऊ देणे कदाचित सर्व प्रतिमा निर्मितीला सर्व सीमांच्या पलीकडे घेऊन जाईल. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हानिकारक असतो. इंदूरच्या सरोजकुमारचे म्हणणे आहे की, आता जिंकलेल्या खासदारांनी आपल्या प्रचार सिनेमांपासून वेगळे व्हावे. साबण-तेल विकणारा खासदार चांगला दिसत नाही.