आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिलीप कुमार यांचे पुस्तक आणि हरवलेली आठवण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सायरा बानो आपले नव्वदी पार केलेले पती आणि सर्वकालीन महान अभिनेते दिलीप कुमार यांच्यावर लिहिलेल्या पुस्तकाचे 9 जून रोजी होणार्‍या एका भव्य कार्यक्रमात विमोचन करणार आहेत. या कार्यक्रमाला लता मंगेशकर यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती राहील. तसेच या वेळी दिलीप कुमार यांच्यावर प्रसून जोशी यांनी लिहिलेल्या गाण्याचे सादरीकरणही केले जाईल. चित्रपसृष्टीतील सर्वच सिनेतारे आणि दिग्दर्शक या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. कारण दिलीप कुमार यांच्याबद्दल चित्रपट उद्योगात खूप आदर आहे. आजचे युवा प्रेक्षक त्यांना टीव्हीवर प्रसारित होणार्‍या त्यांच्या चित्रपटांमुळे ओळखतात. तसेच त्यांना याची जाणीवही नाही की, सध्याच्या ज्या सिनेतार्‍यांनी कधी-कधी सादर केलेल्या चांगल्या अभिनयावर आपण टाळ्या वाजवतो, तो प्रभाव आणि छाप दिलीप कुमार यांचीच आहे. हा प्रभाव आणि छाप पाहण्याचे सुदैव त्यांना मिळालेले नाही. असो, या पुस्तक प्रकाशन सोहळ्याची क्षणचित्रे सर्व टीव्ही चॅनेल्सवर दाखवण्यात येतील.
तसेच ‘देवदास’, ‘मधुमती’, ‘दाग’, ‘मुघलेआजम’ आणि ‘राम और श्याम’चे अंशही दाखवले जाण्याची शक्यता आहे. सायरा बानो यांनी माहिती संकलित केलेल्या या पुस्तकात दिलीप कुमार यांच्या सर्व परिचितांनी आपले विचार मांडले आहेत. तसेच एका वृद्ध पत्रकाराने जीवनवृत्तही लिहिले आहे. सायरा यांच्याकडेही वैवाहिक जीवनाच्या 50 वर्षांचा अनुभव आहे.
दिलीप कुमार कधीही उघडपणे समोर आले नाहीत. तसेच त्यांनी दैनंदिनीदेखील लिहिलेली नाही. कदाचित, हे पुस्तक त्यांच्याविषयी विविध विचार आणि दृष्टिकोनांचा संग्रह आहे. त्यांच्या 9 भावांपैकी केवळ दोनच जिवंत असल्याची माहिती आहे, परंतु ते अनेक वर्षांपासून त्यांच्या जवळ गेले नाही. तथापि, हा कौटुंबिक मुद्दा आहे. दिलीप कुमार आपल्या कुटुंबात आपल्या बहिणीच्या सर्वाधिक जवळ होते. त्यांच्या भरभराटीच्या काळात ‘आपा’चाच (थोरली बहिण) हुकूम चालायचा. आता त्या हयात नाहीत. एमिली ब्रांटे यांचे ‘वुदरिंग हाइट्स’ हे दिलीप कुमार यांचे आवडते पुस्तक होते. ‘दिल दिया, दर्द लिया’ हा चित्रपटही याच पुस्तकापासून प्रेरित होता. यातील नायकाचे चरित्रचित्रण अत्यंत गुंतागुंतीचे आहे.
लहानपणापासून सातत्याने अन्याय सहन करणारी व्यक्ती बदला घेण्यासाठी ताकदीच्या शिखरावर पोहोचते, पण तिला कधीच प्रेम मिळत नाही. या पुस्तकरूपी चावीने दिलीप कुमार यांच्या मनातील रहस्य उलगडू शकत नाही. त्यांनी साकारलेल्या सर्व पात्रांना एकत्र करून तयार केलेल्या मिर्शणाची थोडीफार मदत मिळू शकते. त्यांनी कधीच शेक्सपियरचा हॅम्लेट अभिनीत केला नाही, पण ‘करूं या ना करूं’ या असमंजसपणाने त्यांचा पिच्छा सोडला नाही. याच
असमंजसपणामुळे ते डेव्हिड लीनचा ‘लॉरेन्स ऑफ अरेबिया’ करू शकले नाही. याच कारणामुळे ते ‘चंद्रगुप्त’ आणि ‘तुलसीदास’ही अभिनीत करू शकले नाही. त्यांना केवळ ‘बैजू बावरा’ आणि ‘जंजीर’ न केल्याचे दु:ख आहे. दिलीप कुमार यांना कधीही अभिनेता व्हावे, असे वाटत नव्हते. दुसर्‍या महायुद्धात त्यांच्या वडिलांचा व्यवसाय संकटात सापडला आणि इच्छा नसतानाही दिलीप ‘ज्वारभाटा’मध्ये संधी दिलेल्या देविका राणी यांना भेटले. भारतीय सिनेमाच्या अभिनयात पारसी थिएटरचा प्रभाव पाहिला. अतिरेक ते अतिरंजित अभिनय त्यांना सिनेमा माध्यमासाठी वाईट वाटला आणि हॉलीवूड चित्रपटांचे पॉल मुनी यांचा त्यांच्यावर खोल प्रभाव पडला.
भूमिकेला ‘अंडरप्ले’ करण्यास सुरुवात करणारे ते पहिले भारतीय अभिनेते होते. भावनांची खोली अनुभूत करणे आणि त्यांच्या चेहर्‍यावरील भावना वर येताना त्या दाबण्याचा प्रयत्न करणे, ही त्यांची शैली बनली. अशा प्रकारे चित्रपट अभिनयासाठी शाळेची स्थापना झाली.
आपल्या भूमिकांवर सखोल चिंतन आणि वारंवार सराव केल्यामुळेच ते भारतात ‘मेथड स्कूल’ची स्थापना करू शकले. असो, या पुस्तकाची रचना आजपासून काही वर्षांपूर्वी जेव्हा त्यांची स्मरणशक्ती चांगली होती, तेव्हाच व्हायला हवी होती. गतकाळातील आठवणी येतात-जातात.
कधी त्यांना 50 वर्षांपूर्वीची घटना आठवते, तेव्हा एक मिनिटापूर्वी काय झाले, ते विसरून जातात. आठवणींचा अशा प्रकारे लपंडाव खेळणे खूप कष्टप्रद होऊ शकते. स्मृतिविना मनुष्य केवळ चावीने चालणारे खेळणे बनते. आठवणी पूर्णपणे सुरक्षित राहतानाही दिलीप कुमार पूर्णपणे समोर येत नाहीत, हीदेखील विचार करण्यासारखी गोष्ट आहे. दुसरे म्हणजे संपूर्ण स्पष्टतेने आत्मकथा लिहिणे कठीण आहे. तुम्हाला आपले अनेक गुन्हे स्वीकार करावे वाटतात. वास्तव जीवनात घडलेले गुन्हे किंवा मनात गुन्ह्याचा विचार येणे हेदेखील कुणाला सांगता येऊ शकत नाही. ख्रिश्चन जीवनशैलीप्रमाणे वास्तव जीवनात कन्फेशन रूम नसतात. या पुस्तकातच दिलीप कुमार यांचे अस्मासोबतचे लग्न आणि त्यास नकार देणे कसे काय समाविष्ट होऊ शकेल? आपण सर्व या बाबतीत हत्यारे आहोत. सर्वांनी अनेकदा हत्येचा विचार केला आहे, पण केली नाही.