आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शैक्षणिक परिसरातील मौजमजा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नव्या शायनिंग इंडियात होणारे बदल आणि लोकसंख्येच्या 40 टक्के युवा लोकांना जाणून घेण्यासाठी शाळा व कॉलेजच्या परिसरात होणार्‍या हालचालींच्या मदतीने माहिती मिळवता येऊ शकते. गेल्या दोन दशकांपासून कॉलेज कॅम्पस अनेक चित्रपटांचा महत्त्वाचा भाग राहिले आहेत, परंतु चित्रपटांमध्ये सादर केलेला परिसर वास्तवापासून कोसो दूर आहे आणि ज्यामुळे आज खूप विक्री होत आहे, त्या फँटसीचा तो भाग आहे. करण जोहर आपला ‘स्टुडंट ऑफ द इयर’ एक महान चित्रपट असून युवा मनाचे प्रतिनिधित्व करत असल्याच्या अविर्भावात आहे. या चित्रपटात दाखवण्यात आलेल्या शैक्षणिक संस्थेसारखा एखादा भव्य परिसर जगातील कोणत्याही शैक्षणिक संस्थेचा असू शकत नाही. भव्यतेला करण जोहर महानता समजत आहे आणि त्याचा मानस व सिनेमात भव्यतेबाबत असलेला आदर मूर्ख मुलाच्या हट्टासारखा आहे. त्याच्या चित्रपटातील एकही दृश्य वर्गखोलीचे नाही.
सर्व विद्यार्थी उघड्या अंगाने कॅम्पसमध्ये फिरतात. मुख्य पात्रांनीही स्त्री पात्रांपेक्षा जास्त देहप्रदर्शन केले आहे. त्यांचा कॉलेज परिसर एका तलावाप्रमाणे असून ज्याद्वारे पात्रांच्या शरीरात मसल्सचे मासे पोहत असतात आणि विद्यार्थी मासे पकडण्याचा काटा किंवा जाळे फेकत असतात. प्राचार्यांनाही क्रीडा प्रशिक्षकाचे पिळदार शरीर आवडते. हे शक्य आहे की, सर्व फाजील गोष्टींना हिमतीने झेलले जाते, परंतु वृद्ध प्राचार्य मृत्यूच्या क्षणांमध्येही आपल्या वेगळ्या रुचित बुडालेले आहेत. असो, करणच्या सर्व चित्रपटांमध्ये शैक्षणिक परिसर असेच राहिले आहेत. आज वास्तव जीवनातील शैक्षणिक परिसर एका वेगळ्या लाटेवर थिरकतात. जशी युवा स्वप्ने, भय आणि महत्त्वाकांक्षा भारतीय परिसरात आहेत, तसेच पाकिस्तानी मालिकांमध्ये दाखवण्यात आलेल्या शैक्षणिक परिसरांमध्येही आहे. सर्व ठिकाणी अनभिज्ञ अस्वस्थता आहे, आक्रोश आहे, परंतु सर्व ऊर्जा एखाद्या नव्या समाजाला जन्म देण्यासाठी नव्हे, तर स्वत:साठी चांगली नोकरी व सुविधायुक्त जीवनासाठी आहे. तसेच रणबीर कपूरचा ‘ये जवानी है दिवानी’मधील संवाद ‘पच्चीस में नोकरी, 26 में बंगला और 27 में छोकरी’ याचेच प्रतिनिधित्व करतो.
जून महिन्यात आकाशात जेवढे ढग नसतात त्यापेक्षा जास्त गर्दी शैक्षणिक परिसरामध्ये असते. तसेच प्रसिद्ध संस्थांमध्ये प्रवेश मिळवणे आता एका युद्धासारखे झाले आहे. यात विद्यार्थ्याचे संपूर्ण कुटुंब सहभागी असते. आर्थिक उदारीकरणानंतर शिक्षण नवा नफा कमावणार्‍या उद्योगाच्या रूपात समोर आले आहे. त्यात आता काही आंतरराष्ट्रीय ‘ब्रँड्स’चाही समावेश आहे. रुग्णालये आणि पंचतारांकित हॉटेल्सपेक्षा जास्त नफा शिक्षण उद्योगातून मिळतो. बाजार शासित काळात यशाचा मंत्र जपणार्‍या पिढय़ा घडवल्या जात आहेत आणि हे शिक्षण केवळ उच्च वर्ग किंवा नुकत्याच समृद्ध झालेल्या उच्च मध्यम वर्गासाठी आहे. शेतकरी, सैनिक आणि दलितांचे साधारण उत्पन्न किंवा गरीब कुटुंबातील मुलांसाठी ही सुविधा उपलब्ध नाही. शायनिंग इंडियाचे क्षेत्र हळूहळू इंच-इंच वाढत चालले आहे आणि अनेक शतकांपासून उपेक्षित असलेला वर्ग आता स्वत:ला आणखी असहाय समजत आहे.
शिक्षण उद्योगाची ही भव्य संगमरवरी कोठारे यशाच्या मंत्राच्या अधीन आणि जीवनमूल्यांपासून दूर कमी-अधिक प्रमाणात रोबोटप्रमाणे कुशल लोक घडवत आहेत. कवी कुमार अंबुज यांच्या ‘कुशलता की हद’ या ताज्या कवितेतील शेवटची ओळ आहे ‘कुशलता की हद है कि फिर एक दिन एक फूल को, क्रेन से उठाया जाता है.’ महात्मा गांधींच्या कथनातील त्या शिक्षण संस्था मृत्यू समान आहेत, ज्या व्यावहारिक जीवन व्यवस्थितपणे जगत आदर्श जीवन मूल्यांच्या निर्वाहाचा धडा शिकवत नाहीत. मात्र, भालचंद्र पेंढारकरांनी 1922 मध्ये ‘वंदे मातरम आर्शम’ नामक जो चित्रपट बनवला होता त्याचाच सार वर्धित रूपात आपण हिरानी यांच्या ‘थ्री इडियट्स’मध्ये पाहिला आहे.