आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

75th Birth Anniversary: वाचा आर.डी. बर्मन यांचा जीवनप्रवास

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज (27 जून) पंचम अर्थातच राहूल देव बर्मन यांचा 75वा वाढदिवस आहे. आज ते आपल्यात असते तर प्रीतम, हिमेश रेश्मिया आणि साजिद-वाजिद यांचे प्रतिस्पर्धी असते. विशेष म्हणजे, एकेकाळी या गायकांचे वडील पंचम यांचे वडील राजकुमार सचिन देव बर्मन यांचे सहकारी होते.
पंचम जेव्हा लोकप्रियतेच्या शिखरावर होते तेव्हा लक्ष्मीकांत-प्यारेलाल सिंहासनावर विराजमान होते. मात्र त्यांचे प्रतिस्पर्धी लक्ष्मीकांत विसरले नाहीत, की 'दोस्त' गाण्यामध्ये माऊथ ऑर्गन वाजवण्यासाठी त्यांनी पंचम यांची मदत घेतली होती. त्याकाळी प्रतिस्पर्धी असणे गरजेचे होते, मात्र त्यांना शत्रु मानले जात होते. इतरांच्या कौशल्यासाठी आणि श्रेष्ठ कामासाठी टाळ्या वाजवण्यात त्यावेळी काहीच संकोच बाळगला जात नसत.
राजकुमार सचिन देव बर्मन यांच्या एकुलत्या एक मुलाचे नाव राहूल देव ठेवण्यात आले होते. मात्र त्यावेळी सुपरस्टार अशोक कुमार यांनी जेव्हा राहूलला कुशीत घेतले तेव्हा ते रडायला लागले. अशोक सचिन बर्मन यांना म्हणाले, की हा तर रडतोसुध्दा पंचममध्येच. त्याला पंचम म्हणू, तेव्हापासून सचिन दा यांनी राहूल बर्मन यांना पंचम म्हणण्यास सुरूवात केली. पंचम यांचा जन्म 27 जून 1939 रोजी झाला होता. हा दुस-या महायुध्दाचा काळ होता.
पंचम बालपणीपासूनच शाळेपेक्षा जास्त वेळ वडिलांच्या संगीत कक्षेत घालवत होते. त्यांची संगीतातली रुची पाहून केवळ 17 वर्षांच्या पंचम यांना अभिनेते गुरुदत्त यांनी 'गौरी' सिनेमासाठी साइन केले. या सिनेमात स्वत: गुरुदत्त पत्नी गीता दत्त यांच्यासह अभिनय करत होते.
पती-पत्नीच्या अहंकाराने आणि मतभेदाने सिनेमा अर्ध्यातच डबाबंद झाला. पंचम सिनेमा डबाबंद झाल्याने निराश झाले. मात्र महमूद यांनी पंचम यांना वचन दिले, की लवकरच ते एका सिनेमाची निर्मिती करत आहेत आणि त्यामध्ये पंचम संगीत देतील. पंचम यांना संधी मिळाली मात्र पहिले गाणे त्यांना लता मंगेशकर यांच्याकडून गाऊन घ्यायचे होते. त्याकाळी सचिन बर्मन आणि लता यांच्यामध्ये मतभेद चालू होते.
पंचम यांनी लता दीदी यांना सरावासाठी 'जॅट' इमारतीत बोलावले तेव्हा लता यांना मतभेदाची आठवण झाली. त्यांनी पंचम यांना इमारतीच्या बाहेर हार्मोनिअम घेऊन येण्यास सांगितले आणि म्हणाल्या आपण बाहेरच सराव करूयात.
त्यावेळी आघाडीचे गायिकादेखील रेकॉर्डिंगपूर्वी दहा-पंधरा दिवस गायनाचा सराव करत असत. मात्र आजच्या नवोदित गायिका रेकॉर्डिंगच्या दिवशी सराव करतात. पंचम आणि लता यांनी सरावास सुरूवात करताच सचिन दा बाहेर आले आणि लता यांना म्हणाले, नेहमीसारखे सरस्वतीला नमन न करता सरावास सुरूवात केलीस ना? घरात जाऊन सरस्वतीला नमन करा आणि मगच सरावाला सुरूवात करा. अशाप्रकारे त्यांच्यामधील मतभेद संपुष्टात आले.
सरस्वती कलेलाच जन्म देत असे नाहीये, तर एकमेकांच्या मनातील मतभेदसुध्दा दूर करते. पंचम आणि लता यांनी गायलेले गाणे 'घिर आए काले बादल' 'छोटे नबाव' या सिनेमातील होते. त्यानंतर मेहमूद यांच्या 'भूत-बंगला' सिनेमात पंचम यांनी संगीत देऊन अभिनयसुध्दा केला होता. सचिन देव बर्मन पारंपरिक माधुर्यासह उत्तर पश्चिम धुनसह नवीन प्रयोग करत होते.
असे म्हटले जात होते, की पंचम हे प्रयोगवादी होते, मात्र हे असत्य असून सचिन दा यांनी अनेक प्रयोग केले होते. देवानंद यांच्यासाठी किशोर कुमार यांचा आवाज परफेक्ट असल्याचे सांगितले जात होते. मात्र असे नसून सचिन दा यांनी मोहम्मद रफी यांचा आवाज देवानंद यांच्या 'काला पानी', 'काला बाजार' 'तेरे घर के सामने' आणि 'गाईड'सारख्या सिनेमांना दिला होता. एवढेच नव्हे तर किशोर कुमार यांनी लोकप्रियता मिळवलेल्या 'आराधना' सिनेमातील 'गुनगुना रहे है भंवरे' गाणेसुध्दा मोहम्मद रफी यांनी स्वरबध्द केले होता.
पंचम यांनी 'आराधना'मध्ये वडिलांना सहकार्य तर केलेच सिनेमाला काही धुनसुध्दा दिल्या. वडिलांच्या आजारपणामुळे त्यांना रेकॉर्डिंगसुध्दा करावे लागत होते. अमेरिकेच्या पहिल्या दौ-यादरम्यान 36 चॅनलवर एकाचवेळी होणारी रेकॉर्डिंगची सुविधा पाहून पंचम आश्चर्यचकित झाले होते. शक्ती सामंत आणि इतर व्यवसायी सिनेमा निर्मात्यासाठी काम करत असतानासुध्दा त्यांनी गुलजार यांच्या गाण्यांना धुन दिली.
पंचम हे दिलदार आणि मित्रत्व जपणारे व्यक्ती होते. आज ते या जगात असते तर त्यांनी आधुनिक तंत्रज्ञान सुविधांचा पूरेपूर वापर केला असता. अधुनिक तंत्रज्ञान येण्यापूर्वीच पंचम यांचे निधन झाले.