आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्क्रिप्ट रायटर 'कंगना'!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेहून पटकथा लिहिण्याचे प्रशिक्षण घेतल्यानंतर कंगना रनोट स्वत: अभिनय करणार्‍या पटकथांमध्ये सल्ला तर देणारच आहे, पण त्यातील काही भागही ती स्वत: लिहिणार आहे. लेखन विभागात आपले नाव समाविष्ट व्हावे, अशीदेखील तिची इच्छा आहे.
खरे सांगायचे म्हणजे सर्वच सिनेतारे पटकथेत बदल करतात. आता कंगनादेखील या खेळात सहभागी होत आहे. 'दबंग'प्रदर्शित झाला तेव्हा यूटीव्हीचा प्रमुख सिद्धार्थ कपूर ऋषी कपूर यांना म्हणाला की, 'दबंगची पटकथा माझ्याकडे आली होती. नीरस चित्रपटात पैसा गुंतवणे मला योग्य वाटले नाही. मात्र, प्रदर्शित झालेला 'दबंग' मूळ पटकथेपेक्षा खूप वेगळा आहे. त्यामुळे साहजिकच सर्व बदल सलमान आणि अरबाजने केले.'
'प्रेम रोग'ची मूळ कथा सरंजामशाही मूल्यांवर प्रहार करणार्‍या एका तरुण विधवेची होती, पण नायकाचे चरित्र गौण होते. पटकथा लेखक जैनेंद्र जैन यांनी त्यात अनेक बदल केले आणि चित्रीकरणादरम्यान राज कपूर यांनीदेखील बदल केले. मूळ पटकथेत बदल न करता तयार झालेल्या चित्रपटांची संख्या खूप कमी आहे. चित्रपट निर्मिती निरंतर बदलाची प्रक्रिया आहे.
अनेकदा लोकेशनवर पोहोचून दिग्दर्शक बदल करतात. उदाहरणार्थ, राकेश रोशनने 'करण-अर्जुन'च्या राजस्थानमधील शूटिंगमध्ये आपल्या मूळ कथेत बैलगाडीच्या जागी उंटगाडी असा उल्लेख केला असता राखीने त्यावर आक्षेप घेतला. या चित्रपटाच्या निर्मितीदरम्यान सर्व सिनेतार्‍यांनी गटबाजी करत राकेश रोशनला विरोध केला. कारण दोन भावांनी पुढच्या जन्मी वेगवेळ्या कुटुंबात जन्म घ्यावा आणि पुन्हा एकत्र येऊन मागच्या जन्मी झालेल्या अन्यायाचा प्रतिकार करावा, ही संकल्पनाच त्यांना मुळात आवडली नव्हती.
चित्रपट निर्मितीची एक शाळा असून ती 'वॉटर राइट' पटकथेबाबत बोलते. म्हणजेच त्यात बदल केला जाणार नाही. जणू काही ती पटकथा नसून 'वॉटरप्रूफ' पाणबुडी आहे. दुसर्‍या शाळेत लोकेशन, कलावंतांची क्षमता आणि इतर कारणांमुळे बदल करणे योग्य मानले जात नाही. चेतन आनंद यांच्याकडे 'हकीकत'चा एक आलेख होता आणि लोकेशनवर जाऊन चेतन आनंद दृश्य लिहित होते. त्या चित्रपटाच्या निर्मितीत भारतीय सैन्याने सहकार्य केले होते आणि सैन्याच्या सुविधेसाठी बदलही केले होते. विजय आनंद यांनी 'राम-बलराम' आणि 'राजपूत'ची कमी-अधिक पटकथेवर निर्मिती केली होती. प्रसार माध्यमांवर घट्ट पकड असलेला दिग्दर्शकच 'हार्ड बाऊंड' पटकथेच्या अभावात काम करू शकतो.
आमिर खान आपल्या प्रत्येक चित्रपटात निर्मितीच्या प्रत्येक विभागावर संपूर्ण नियंत्रण ठेवतो. हे काम त्याने 'लगान'च्या निर्मितीनंतर केले. बर्‍याच अनुभवानंतर तुम्हाला हा अधिकार प्राप्त होत असतो. कंगना रनोटला चित्रपटसृष्टीत येऊन केवळ सात वर्षे झाली आहेत. सध्या तिच्याकडे पुरेसा अनुभव नाही. मात्र, प्रतिभावंत कलाकार असल्यामुळे ती आपल्या भूमिका अधिक आकर्षक करण्याचा सल्ला देऊ शकते.
सिनेतार्‍याला त्याच्या लोकप्रियतेच्या प्रमाणात अधिकार मिळतात, हे चित्रपट उद्योगातील व्यावहारिक तथ्य आहे. आता 'क्वीन'च्या प्रदर्शनापूर्वी कंगनाकडे बदल करण्याचा अधिकार नव्हता. आजदेखील कंगना त्याच लोकांसोबत काम करत आहे ज्यांच्यासोबत तिने याअगोदर काम केले आहे. त्यांच्याशी कंगनाचा नेहमीच संवाद होत असतो. उदाहरणार्थ, साई कबीरचा 'रिव्हॉल्व्हर रानी' हिट झाला नाही, परंतु कंगनाला अजूनही कबीरवर विश्वास आहे. त्यामुळे त्याच्यासोबत ती दुसरा चित्रपट करत आहे. 'रिव्हॉल्व्हर रानी'ची कमाई हळूहळू वाढत होती, परंतु दुसर्‍याच आठवड्यात मल्टिप्लेक्सवाल्यांनी चित्रपटाचे शो कमी केले आणि वेळादेखील गैरसोयीच्या दिल्या. आज चित्रपट व्यवसायात मल्टिप्लेक्स मालकांची भूमिका महत्त्वाची ठरत आहे. 'पाकीजा'ने तिसर्‍या आठवड्यात जोर धरला होता. आजच्यासारखी दशा असती तर या चित्रपटाला तिसर्‍या आठवड्याचीदेखील संधी मिळाली नसती.