आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हास्य आणि वेडेपणा सिनेमाचे रहस्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साजिद खान आणि निर्माते वासू भगनानी यांचा 'हमशकल्स' किशोर कुमार यांच्या 'हॉफ टिकिट', 'झुमरू' यासारख्या वेडेपणाच्या चित्रपटांना समर्पित करण्यात आला आहे. मात्र, किशोर कुमार यांनी 'दूर गगन की छांव' हा गंभीर चित्रपट आणि सार्वकालिक महान हास्य चित्रपट 'चलती का नाम गाडी' देखील बनवला आहे. वस्तुत: बिनडोकपणे थट्टा उडवणार्‍या चित्रपटांची दीर्घ परंपरा आहे. विनोदी चित्रपट आणि वेडेपणाचे चित्रपट यांच्यात फरक असतो. खरोखरच्या विनोदी चित्रपटांमध्ये जीवनातील गंभीर समस्यांबाबत चिंता व्यक्त केली आहे. उदाहरणार्थ, चार्ली चॅपिलनचा 'गोल्ड रश' मनुष्याची लालसा आणि बेहिशोबी मालमत्तेबाबत तीव्र आग्रह अधोरेखित करतो. चित्रपटातील एका दृश्यात सोन्याच्या शोधात निर्जन बर्फाच्छादित प्रदेशात उपाशीपोटी अडकलेला चॅपलिन आपले बूट उकळतो आणि त्यातील खिळे असे खातो जणूकाही हाड काढून मांस खात आहे. जीवनाबद्दल तत्त्वज्ञानाची भावना असणारे निर्माते आपल्या विनोदी चित्रपटाची मुखवट्याच्या रूपात मांडणी करतात. जेणेकरून त्यांचे दु:ख दिसू नये. म्हणजेच मुळातच हे ट्रॅजेडी चित्रपट आहेत, पण त्यांना विनोदाचे स्वरूप देण्यात आले आहे.
अश्रू आणि हास्य यांच्यात खोलवर संबंध आहेत. डोळे आणि ओठांमधील एक-दोन इंच अंतर निश्चित करण्यात संपूर्ण आयुष्य जाते. अनेकदा सक्तीने बंद केलेले ओठ रडत असतात आणि डोळे हसतात. चार्ली चॅपलिनचा समकालीन बस्टर कीटनच्या चित्रपटांना अनुराग बसूच्या 'बर्फी'मध्ये आदरांजली वाहण्यात आली होती. चार्ली चॅपिलनपासून सुरुवात होत राज कपूर मार्गे जात या परंपरेचे सध्याचे दिग्दर्शक वूडी अँलेन आहेत. अर्शू- हास्य परंपरेतील चित्रपटांमध्ये वास्तवाचा अंधकार आणि आदर्शाचा प्रकाश हस्तांदोलन करताना दिसतो. त्याला कवी 'सुरमई उजाला और चम्पई अंधेरा' असे म्हणतात.
स्वत:मध्ये ट्रॅजेडी गुंडाळून तयार होणारे विनोदी चित्रपट आणि हास्यासाठी हास्याप्रमाणे तयार होणारे 'चलती का नाम गाडी', 'पडोसन', 'अंगूर' आणि 'गोलमाल' यांच्यापेक्षा वेडेपणाचा सिनेमा वेगळा आहे. तो तर्कहिनतेला महती देण्याचा प्रयत्न करतो. हा सिनेमा अर्थहीन हास्य फवार्‍यांना आपल्या ध्वनिपटाप्रमाणे वापर करतो. किशोर कुमार आणि जॅरी लिप्सने हेदेखील साधले आहे. या क्षेत्रात मेहमूद यांनीदेखील काही चित्रपट बनवले आहेत. या परंपरेचे आद्यप्रवर्तक आय. एस. जोहर आहेत. त्यांनी 'जौहर मेहमूद इन गोवा', 'फाइव्ह रायफल' इत्यादी अनेक चित्रपटांची निर्मिती 'पागलपन सिनेमा' म्हणून केली. हे चित्रपट कुठे ना कुठे व्यवस्थेची थट्टा उडवतात आणि गांभीर्याचा मुखवटा लावून फिरणार्‍या त्या सर्व लोकांवर हसतात. आपण आपल्या आयुष्यात अनेक समजदार लोकांचा आदर करतो. तसेच ही समजदारी ओढलेली आहे की खरी आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. सोप्या गोष्टी अत्यंत कठीण आणि किचकट भाषेत सागंणारे अनेक लोक आपला मूर्खपणा लपवण्यामध्ये यशस्वी ठरतात. आय. एस. जोहर या गोष्टीचा पर्दाफाश करतात. वेड्याचा इलाज शक्य आहे. त्यासाठी वेड्यांची इस्पितळेही असतात, पण मूर्खांसाठी इस्पितळ असल्याचे तुम्ही कधी ऐकले आहे काय? ज्या व्यक्तीने पहिल्यांदा पृथ्वी गोल आहे, असे म्हटले होते त्याला वेडे ठरवण्यात आले.
नव्या विचारांबाबत आपल्या स्वभावात एक विरोध आहे. कारण अनेक शतकांपासून आपल्याला 'स्थापित'चा आदर करणे शिकवले आहे. तसेच विचार व अनेक क्षेत्रात प्रश्न करण्याला का कुणास ठाऊक आदर करण्याचा विरोध म्हटले आहे. वस्तुत: जडत्व कायम राहिल्याने व्यवस्थेच्या दलालांचा फायदा होतो. काही लोकांची विचारांची साखळी त्यांच्या नियंत्रणाच्या बाहेर जाते आणि त्यांना वेडे ठरवले जाते. आवेगाचे नियंत्रण आणि संतुलन कठीण आहे.
वेडेपणाच्या सिनेमात दोन श्रेणी आहेत. तर्कहीनता आणि वेडेपणाच्या बहाण्याने काही गंभीर संकेत दिले जातात आणि दुसर्‍यात वेडेपणा वेडेपणासाठीच असून त्याला स्लॅपस्टिक कॉमेडी असे म्हणतात. स्लॅप म्हणजे चापट. बस्टन कीटन चित्रपटांमध्ये एक व्यक्ती दुसर्‍या व्यक्तीला चापट मारतो, दुसरा तिसर्‍याला मारतो आणि तिसरा पहिल्याला मारतो, म्हणजेच तो चापट मारणार्‍याकडेच परत येतो. साजिद खानच्या 'हमशकल्स'मध्ये असेच दृश्य आहे. तसेच 'इस थप्पड मार कॉमेडी को स्लॅपस्टिक कहते हैं', असा संवादही आहे. साजिदचे आतापर्यंतचे सर्व चित्रपट याच र्शेणीतील आहेत आणि तर्कवाल्यांना हा त्यांचा अपमान वाटू शकतात. वस्तुत: आज सुरू असलेल्या बहुतांश विनोदी कार्यक्रमांचा आधार एकमेकांचा अपमान करणे हाच आहे. आपल्या पत्नीची थट्टा करणार्‍याची का कुणास ठाऊक प्रशंसा केली जाते.
आजच्या काळात वेडेपणाची केवळ वेडेपणासाठीच प्रशंसा करणे कठीण आहे. कारण हे माहितीचे युग आहे आणि लोकांना खूप काही जाणून घेता येते. माहितीच्या हिरव्यागार कालखंडात हे कठीण आहे. असो, या चित्रपटात राम कपूरने सर्वांना आश्चर्यचकित केले. कारण मालिका विश्वात तो गंभीर भूमिका करत होता. भारतीय सिनेमात वेडेपणाचे चित्रपट नेहमीच र्मयादित बजेटमध्ये तयार केले जातात. मात्र, साजिद महागडे चित्रपट बनवतो. कोणत्याही परिस्थितीत वेडेपणाचा चित्रपट यशस्वी झाला तर त्याला विनोदी म्हटले जाते आणि अपयशी ठरला तर शोकांतिका म्हटले जाते.