आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रचार तंत्राचा अंदाज अपना अपना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जनतेला 'अच्छे दिन' येतील की नाही माहीत नाही, परंतु करमणूक जगताच्या बॉक्स ऑफिसला चांगले दिवस येणार आहेत. ईदच्या मुहूर्तावर सलमान खानचा 'किक', दिवाळीत शाहरुख खानचा 'हॅप्पी न्यू इयर' आणि आमिर खानचा राजकुमार हिराणी दिग्दर्शित 'पीके' ख्रिसमसच्या मुहूर्तावर प्रदर्शित होत आहेत. या लोकप्रिय चित्रपटांच्या प्रदर्शनामुळे चित्रपट मालकांचे दिवस बदलणार आहेत. कारण मोठी गर्दी जमवणारे चित्रपटच या व्यवसायाचा आर्थिक कणा आहेत.
गेल्या दीर्घ काळापासून निवडणुका, आयपीएल इत्यादींमुळे व्यवसाय मंद राहिला. या दुष्काळातदेखील काही चित्रपट यशस्वी ठरले. जसे उन्हाळ्यातही अनेक ठिकाणी पाऊस पडतो, पण प्रेक्षकांमध्ये उत्साह जागवल्यानंतरच या व्यवसायाला ताकद मिळते. उत्साही प्रेक्षकांमुळे चित्रपटगृह परिसरातील खाण्या-पिण्याच्या दुकानांवर पैशांचा वर्षाव होतो. जसे मोठय़ा उद्योगासोबतच कमाईचा जुगार खेळणार्‍या छोट्या उद्योगांची भरभराट होते. तसेही सिनेमा उद्योगासोबतही त्यांचे अनेक छोटे व्यवसाय जोडलेले आहेत.
आजकाल सिनेतारे आपल्या चित्रपटांचा प्रचार एक-दोन महिन्यांपूर्वीच सुरू करतात, पण यातही काही दुकानांना फायदा होतो. सिनेतार्‍यांच्या प्रवासाचा खर्च, पंचतारांकित हॉटेलमधील मुक्काम आणि टीव्हीवरील प्रचारामुळेदेखील अनेक लोकांना फायदा होतो. तसेच या सर्व कवायतीत सरकारलादेखील फायदा होतो. चित्रपटसृष्टी 200 कोटी रुपयांचा आयकरही भरते. बातमी अशी आहे की, शाहरुख खान चित्रपटातील कलावंतांसोबत ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये युरोप व कॅनडासारख्या अनेक शहरांची भ्रमंती करणार आहे. आपल्या अभिनीत चित्रपटांच्या व्यवसायाचा खूप मोठा हिस्सा विदेशातून येतो याची कल्पना शाहरुखला आहे. म्हणून तो विदेशात रोड शो करणार आहे.
सलमान खानचे बलस्थान भारतीय जनता आहे. त्यामुळे तो आपल्या पद्धतीने प्रशंसकांना भेटणार आहे. सलमानने 'किक'मध्ये दोन गाणी गायली आहेत आणि काही काळातच तो देश-विदेशात आपला 'कॉन्सर्ट' करणार आहे. आमिर खानही प्रचार तंत्राच्या अनोख्या पद्धतींचा वापर करतो. उदाहरणार्थ, 'थ्री इडियट्स'साठी त्याने वेश बदलून संपूर्ण भारतभ्रमण केले. 'तारे जमीं पर'चे प्रचार धोरण 'लगान'च्या मार्केटिंगपेक्षा वेगळे होते आणि मुरुगदास दिग्दर्शित 'गजनी'मध्ये आमिरप्रमाणे अनेक तरुणांनी मुंडण केले होते.
जेव्हा सलमान खानच्या कोणत्याही आगामी चित्रपटाचा प्रचार केला जातो, तेव्हा शाहरुख खानदेखील एखाद्या योजनेंतर्गत प्रसिद्धीच्या झोतात येतो. अशाच प्रकारे जे स्थान सलमान खानला मिळणार असते, त्याची दोन भागांत विभागणी होते. हे शक्य आहे की, सर्व प्रतिस्पर्धी लोकांच्या मनात एखादा समान विचार येतो, जणू काही 'शत्रू' तुमच्या मनात बसला आहे आणि मैत्रीच्या पातळीवर जेव्हा प्रतिस्पर्ध्यांना भेटण्याची इच्छा नसते तेव्हा 'शत्रुत्वा'च्या जमिनीवरीच का होईना, ते कुठेतरी सोबत उभे असलेले हमखास दिसतात. वस्तुत: मित्रत्वाच्या आवेगापेक्षा अधिक तीव्रता शत्रुत्वात असते. हाच भाव तुम्हाला सणाच्या दिवशी रस्त्यावर समोरासमोर किंवा जवळच्या दुकानातील सजावटीमध्ये पाहायला मिळतो. प्रत्येकाजवळ आपला 'सिक्रेट अजेंडा' आहे आणि एखाद्या राजकीय पक्षाचा यावर कोणताच एकाधिकार नाही.
हीच गोष्ट सिनेतारे, दुकानदार आणि उद्योगांमार्गे देशांपर्यंत जाते. भारत गंगेला प्रदूषणमुक्त करण्याचा विचार करत आहे, तर तिकडे चीनने आपल्या अधिकार क्षेत्रातील बर्फाच्छादित डोंगरावरील विरघळत्या बर्फाचया पाण्यावर कब्जा केला आहे. आपण गंगा प्रदूषण मुक्त करावी आणि ती कोरडी पडावी, असे तर होणार नाही ना? आपली ग्रंथी पाकिस्तान आहे आणि चीनच्या बाबतीत आपण निष्काळजी आहोत. तसेच आपल्यापेक्षा मोठय़ा शत्रूला घाबरल्यामुळेही डोळे बंद झाल्यासारखे होतात. प्रतिस्पर्धेचे हळूहळू शत्रुत्वात रूपांतर होते आणि आपल्या मनाला शत्रूच्या विचाराने कोण किती मुक्त ठेवतो, हाच संपूर्ण खेळाचा मुद्दा आहे.