आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉक्स ऑफिस, निवडणुका आणि कुटुंब

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इम्तियाज अलीचा धाकटा भाऊ आरिफ अलीचा ‘लेकर हम दिवाना दिल’ प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचा निर्माता सैफ अली खान आहे. चित्रपटाचा नायक युवा अरमान जैन आहे. तो राज कपूर यांची मुलगी रिया आणि मनोज जैन यांचा मुलगा आहे. अरमान आणि आरिफ आपल्या घराणेशाहीमुळे नव्हे तर स्वबळावर यश मिळवतील. चित्रपटात घराणेशाहीची भावना आहे, पण राजकारणात काही पक्षांनी घराणेशाहीचे एका शिवीत रूपांतर केले आहे. तथापि, कुटुंबच मध्यमवर्गीयांचा कणा राहिला आहे. वैदिक संस्कृतीने आपल्या उदात्त स्वभावाच्या अनुरूप संपूर्ण विश्वालाच एका कुटुंबाच्या रूपात परिभाषित केले होते. मात्र, दुर्दैवाने खुज्या लोकांद्वारे या संस्कृतीची संकुचित परिभाषा करण्यात आली असून ती राजकारणाशी जोडल्या गेल्यामुळे संकुचित झाली. जर धर्म आणि राजकारण वेगळे राहिले असते तर कदाचित एखाद्या व्होट बँकेच्या मिथ्येमुळे कोणत्याही प्रकारचा संकुचितपणा यात समाविष्ट होऊ शकला नसता. आज त्रिशूळ, कमंडलू इत्यादी करमुक्त करण्यात आले आहेत आणि वैदिक भव्य विचाराकडे कानाडोळा करण्यात आला.
कुटुंब संपूर्ण संस्कृतीच्या विकासाचे मूळ युनिट राहिले आहे. मात्र, आर्थिक असमानता आणि अन्यायाने लाभ-लोभासाठी पलायन आवश्यक केले. तसेच मूळ युनिट संकुचित होऊन आपली संस्कार देण्याची ताकद गमावून बसले. आपल्या विचार विश्वातही विरोधाभास आहे, परंतु त्यांची योग्य परिभाषा केल्यानेच त्यांचा बचाव करता आला असता. उदाहरणार्थ, गीतेत कर्म करा आणि फळाची चिंता करू नका, यासोबतच जीवन, मृत्यू सर्वकाही आधीच निश्चित झालेले आहे, असा भाग्यवादी विचारही आहे. मग कर्माचा उपदेश का देण्यात आला आहे? मनुष्याची संपूर्ण पटकथा जन्मामध्ये मृत्यूपर्यंत आधीच तयार आहे. फळाची चिंता न करणे हाच पूर्वनियोजित पटकथेचा मुद्दा आहे आणि कर्मच सर्व प्रश्नांचे उत्तर आहे, अशा प्रकारे या विरोधाभासाचा बचाव करता आला असता. भाग्यवादाच्या पटकथेला फळापर्यंत र्मयादित ठेवले तरी कर्मच चालतो. अशाच प्रकारे वैदिक सूत्राचे विश्वच एक कुटुंब आहे. महाभारत तुटण्याचीच कथा आहे, असा याचा विरोध आहे. मात्र, महाभारत कमीत कमी शब्दात सांगायचे असेल तर ही कथा स्वत: आणि इतरांची आहे. म्हणजेच विविध नात्यांच्या कच्च्या-गोड अनुभवातून जाण्याची प्रक्रिया स्वत:ला जाणून घेण्याचे माध्यम आहे. याच ज्ञानाने इतरांसोबतचा संघर्ष संपतो.
आजही विविध जमातींमध्ये कुटुंबाचा अर्थ त्यांचे पूर्ण गाव, असा असतो. ते कुटुंबाला फक्त रक्ताचे नाते मानत नाहीत, तर ते भौगोलिक तुकडा कुटुंब असून तिथे ते जगतात, मरतात. त्यांचा इतिहास त्यांच्या भूगोलाशी संबंधित आहे. मध्यमवर्गाच्या जीवनात कुटुंबाला खूप महत्त्व आहे आणि याच वर्गाचा नीचपणा कुटुंबाची परिभाषा संकुचित करतो. उच्च वर्गात कुटुंब व्यवसायाच्या र्मयादेत परिभाषित असते. मात्र, जेव्हा उत्पन्नाच्या आधारावर एखाद्या सदस्याचा आदर कमी उत्पन्न असणार्‍यापेक्षा जास्त केला जातो, तेव्हा मध्यमवर्गात हीच व्यावसायिकता बीभत्स रूपात समोर येते. कुटुंबाच्या परिभाषेत विविधता आहे. उदाहरणार्थ, अमेरिकेत मेडिकल इंश्युरन्सची हुकूमशाही आणि फतव्यामुळे एक डॉक्टर दुसर्‍या डॉक्टरच्या विरोधात साक्ष देत नाही आणि तो कॉन्सपिरेसी ऑफ सायलेन्सचा भाग बनतो. कुटुंबाचे माहात्म्य कथन करतानाच त्यावर टीकाही केली जात आहे. पृथ्वीराज यांच्या तीन मुलांनी मोठा संघर्ष करून आपले स्थान निर्माण केले आणि पुढच्या पिढीतही सर्मथ ऋषी कपूरच दीर्घ खेळी करत आहे.
धर्मेंद्र यांचा मुलगा सनी देओल स्वबळावर यशस्वी ठरला, पण त्याचा लहान भाऊ बॉबी चालू शकला नाही. तसेच राजकारणात निवडणूकच निर्णायक ठरते. घराणेशाहीला शिवी बनवण्यात काहीच अर्थ नाही. कारण कुटुंबाची भावना आणि संस्कार लोप पावत असल्यामुळेच भ्रष्टाचाराशी लढा देऊ शकत नाही. मुलाच्या आधी शालेय कुटुंब राहिले नाही आणि शालेय कुटुंबापासून दूर कुटुंब बनू शकले नाही.