आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शादी = बँड, बाजा, बारात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हृतिक रोशनच्या घटस्फोटानंतर करिश्मा कपूरनेही घटस्फोट घेतला आहे. र्शीमंतांच्या घटस्फोटापूर्वी मोठय़ा रकमेची देवाण-घेवाण होते आणि हा आकडा कधीच समोर येऊ दिला जात नाही. आजकाल तर संबंध तुटल्यावर घटस्फोटासाठी किती रक्कम द्यावी लागेल, अशा प्रकारचा करारही र्शीमंत लोकांच्या घरी लग्नापूर्वीच केला जातो. जरा विचार करा की, संबंध तयार होण्यापूर्वीच ते तुटण्याचा मोबदला निश्चित केला जात असेल तर अशा प्रकारच्या नात्यांमध्ये किती विश्वास असेल? एका बड्या निर्मात्याच्या कुटुंबातील छोट्या मुलाचे लग्न, मुलीने केवळ अशा प्रकारच्या अविश्वासाने भरलेल्या करारनाम्यावर स्वाक्षरी करण्यास नकार दिल्यामुळे होऊ शकले नाही. घटस्फोटाची किंमत चुकवल्यामुळे विदेशातील अनेक प्रसिद्ध लोकांचे दिवाळे निघाले आहे.
जर्मनीचा प्रसिद्ध टेनिसपटू बोरिस बोर्गला तर आपले विम्बल्डन चषक विकावे लागले. एलिजाबेथ टेलरला आपल्या चित्रपटांच्या मानधनापेक्षा अधिक रक्कम तिने घेतलेल्या अर्धा डझन घटस्फोटांद्वारे मिळाली. रिचर्ड बर्टन आणि एलिजाबेथ टेलर यांनी एकदा घटस्फोट देऊन पुन्हा लग्न केले होते, पण तेदेखील टिकले नाही.
त्यांचे नाते एका जंगलाप्रमाणे होते. त्यामध्ये दोन सिंह, दोन राजे कसे राहू शकले असते? मध्यमवर्ग आणि लघु वर्ग या भानगडीतून मुक्त आहेत. तथापि, मध्यम वर्गात जेवढे वैफल्य आणि मानसिक हालचाल असते, तेवढे खालच्या वर्गात नाही. विविध जमातींमध्ये लग्न आणि घटस्फोट कोणत्याही खर्चाविना होतात.
भारताच्या ग्रामीण क्षेत्रात तर अनेकदा शेतकरी लग्न किंवा मृत्यू भोजनासाठी कर्ज घेऊन आपले संपूर्ण आयुष्य व्याज देत घालवतात. अनेक सामाजिक संघटना आणि महान लोकांनी अनेक शतकांच्या प्रयत्नांतून लग्नातील ढोंगीपणा कमी करण्यासाठी आणि हुंड्यासारख्या कुप्रथांपासून मुक्ती मिळवण्यासाठी प्रयत्न केले होते.
या कार्यात मिळालेले आंशिक यशही सूरज बडजात्यांच्या ‘हम आपके हैं कौन’ने नष्ट केले. कारण याच चित्रपटाच्या प्रचंड यशानंतर लग्नसोहळे पाच दिवसांचे व्हायला लागले. वस्तुत: सूरज बडजात्यांचा चित्रपट केवळ एक बहाणा होता. आर्थिक उदारीकरणानंतर काही लोकांकडे खूप पैसा आला आणि त्यांना अशाच अभद्र प्रदर्शनाच्या संधीची प्रतीक्षा होती.
काही संपन्न समाजांमध्ये असलेले लग्नाचे दलाल दोन समृद्ध कुटुंबीयांमध्ये नाते जुळवतात आणि लग्नसोहळ्यासाठी खर्च केलेल्या रकमेवर त्यांना कमिशनही मिळते. अनेक व्यवसाय लग्नसोहळ्यांवर टिकून आहेत. याच तथ्यावर आदित्य चोप्राने ‘बँड बाजा बारात’ बनवला होता. आजकाल डेस्टिनेश वेडिंगही होते. म्हणजेच वर-वधू पक्ष एखाद्या तिसर्‍या ठिकाणी एकत्र येतात. अनेक हॉटेल्सचा अशा प्रकारच्या लग्नसोहळ्यांचे आयोजन करण्याचा दांडगा अनुभवही आहे. काही लग्नसोहळ्यांमध्ये युवक-युवतींच्या प्रेमकथा फुलतात.
वस्तुत: आपण उत्सवप्रिय लोक असून लग्नसोहळे छेडछाड करण्याची संधी देतात. थट्टा-मस्करी करण्यासाठी हे सोहळे शुभमुहूर्त बनतात. आज महानगरांमधील अनेक तरुण विवाहितांना मुले जन्माला घालावी वाटत नाही. दोघेही ड्यूटी संपल्यानंतर क्लब किंवा हॉटेल्समध्ये जेवण करतात. म्हणजेच संपूर्ण आनंद पाहिजे, पण जबाबदारी स्वीकारण्यास नकार आहे. अशा प्रकारच्या जोडप्यांना डिकन्स म्हणजेच डबल इन्कम नो किड्स असे म्हणतात. यांच्यासाठी लग्न म्हणजे न संपणारी लगाम आहे. अशा प्रकारचे विचार असलेले लोक जर त्यांच्या आई-वडिलांचीही हीच धारणा असती तर त्यांची कथाच जन्मली नसती, हे कसे काय विसरतात? माझा आकाश प्रकाश नावाचा एक नातेवाईक आहे. त्याने लाखो रुपयांची कमाई असलेली नोकरी सोडली. कारण त्याला आपला मुलगा आणि मुलीला शिकवायचे आहे आणि त्यांना घडवण्यासाठी तो काही वर्षे काम करणार नाही. तो आपल्या पितृऋणातून अशा प्रकारे मुक्त होत आहे.
जसे सिनेमाच्या मृत्यूबद्दल म्हटले आहे, त्याच अंदाजात लग्न नामक संस्थेचा शेवट होण्याबद्दलही म्हटले जात आहे. काही लोकांचा व्यवसायच घाबरवणे आणि काल्पनिक बागुलबुवा उभा करणे हा आहे. आपण अनेकदा विश्व नष्ट होण्याच्या भविष्यवाण्या मोठय़ा चवीने वाचतो. असो, मी स्वत: र्शी. हरिकृष्ण प्रेमी यांच्याकडे त्यांच्या मुलीला मागणी घालण्यास गेलो होतो, तेव्हा संकोच करत अशा प्रकारे बोललो, पुस्तके महाग झाली असून मी आणि तुमची मुलगी उषा अर्धी-अर्धी रक्कम देऊन पुस्तके खरेदी करत आलो आहोत. म्हणून लग्न करायचे आहे. त्यानंतर प्रेमी आत गेले. त्यांच्या घरात बंदूक नाही, पण ते काठी आणू शकतात, हे मला माहीत होते. ते परत आले आणि म्हणाले, मी दरवर्षी एक-एक हजार रुपये तुम्हा दोघांना देणार, जेणेकरून तुम्हाला पुस्तके खरेदी करता येतील. ते म्हणाले, लग्नासाठी केवळ प्रेमच आवश्यक आहे. प्रेम असेल तर लग्न करा, नाही तर पुस्तकांसाठी मी नेहमी पैसे देत राहील. प्रेमविहीन लग्न सर्वात मोठे ओझे असते. ते वाहता-वाहता लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त होते.