आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हैदराबादची चव आणि दंतेवाडाची भूक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मजान महिन्यातील हैदराबाद, ही ‘बॉबी जासूस’ची पार्श्वभूमी आहे. दिग्दर्शकाने हैदराबादेतील वातावरण आणि तेथील लोकांचे गोड बोलणे उत्तमरीत्या सादर केले आहे. ज्याप्रमाणे विद्या बालन अभिनीत सुजॉय घोष यांच्या ‘कहानी’मध्ये कोलकात्याला जिवंत पात्रासारखे सादर केले आहे, त्याचप्रमाणे या चित्रपटातही हैदराबाद शहराला सादर केले आहे. तेथील गल्ली-बोळात आनंदाने जगणार्‍या पात्रांना महत्प्रयासाने सादर करण्यात आले आहे. विद्या बालनने पुन्हा एकदा आपल्या अभिनयाने मंत्रमुग्ध केले आहे.
दिग्दर्शकानेही आपल्या पार्श्वभूमीला योग्य न्याय दिला आहे. त्याने चित्रपटाचा क्लायमॅक्सही हैदराबादी बिर्याणीच्या आधारावर रचला आहे. या चित्रपटातील नात्यांमध्ये वडील आणि मुलास महत्त्व देण्यात आले आहे. यात एक वडील दंगलीत हरवलेल्या मुलांचा शोध घेतात, तर दुसरे वडील अपारंपरिक हेरगिरी करण्याची आवड असलेल्या आपल्या मुलीसोबत शेवटच्या रीळमध्ये भावनात्मक नाते तयार करतात.
या चित्रपटात मुख्य पात्रासोबतच सहायक भूमिकांवर अधिक लक्ष देण्यात आले आहे. सर्व लोकांना अत्यंत विश्वसनीय पद्धतीने सादर केले आहे. छोट्या-छोट्या गोष्टींवरही बारीक लक्ष दिले आहे. एवढेच नाही तर एका जुन्या घरातील एका कोपर्‍यात धूळ खात पडून असलेले एक वाद्यही ठेवण्यात आले आहे.
विद्या बालनसह चरित्र भूमिका करणारे पात्रही जिवंत वाटतात. चित्रपटाची प्रेमकथाही चित्रपटाला साजेशी आहे. जणू काही हौशी गुप्तहेर नकळतच गुन्हेगाराच्या हातचे बाहुले बनले आहे, असा आभास होतो. तसेच रहस्याचे आवरण हटल्यावर जे तथ्य समोर येते ते विश्वसनीय वाटत नाही. आपण गुन्हा घडण्याची वाट पाहतो, पण शेवटी एका भावुक वडिलांचे प्रयत्न दिसतात. जणू काही कोणताच गुन्हा नसतानादेखील हा हेरगिरीवरील चित्रपट आहे. तो नात्यांचे तुटलेले धागे जोडतो. हैदराबादी ढंगातील संवाद खूप चांगले वाटतात. चित्रपटात मजेशीर चरित्र चित्रण आहे. खरे म्हणजे हौशी गुप्तहेराच्या निष्पाप चुका आणि शेवटी यशस्वी होणे एक फॉर्म्युलाच आहे, परंतु या चित्रपटातील वातावरण आणि हैदराबादी ढंग, यामुळे हा चित्रपट वेगळा ठरतो.
आरिफ अलीचा ‘..दीवाना दिल’देखील एक प्रेमकथा आहे. प्रेक्षक एक दशकापासून पाहत आलेल्या प्रेमींची भेट होणे, एकमेकांपासून वेगळे होणे आणि पुन्हा भेटणे, अशा प्रकारच्या युवा प्रेमकथेची ही पुनरावृत्ती आहे. आरिफ अलीने मोठा भाऊ इम्तियाज अली प्रमाणे एक प्रवास कथा निवडली आहे, पण त्याच्याकडे आपल्या भावासारखी वैचारिक खोली नाही. या चित्रपटात युवा प्रेमी छत्तीसगड राज्यातील माओवादी भाग असलेल्या दंतेवाडा भागात पोहोचतात, परंतु याचा कोणताच फायदा उचलण्यात आला नाही.
अनेक शतकांपासून अन्याय सहन करणार्‍या त्या भागात माओवादी विचारसरणी रुजलेली होती आणि ते एक गंभीर राजकीय क्षेत्र होते. जर दोन्ही र्शीमंत पात्रांनी दंतेवाड्यात होत असलेला अन्याय आणि त्याला असलेला विरोध जवळून पाहिला असता तर त्यांना त्यांच्या आयुष्याचा पोकळपणा समजला असता. चित्रपटातील अरमान जैन आणि दक्षिणेची नायिका दोघेही प्रतिभावंत आहेत. तसेच अनुभवी कलावंतांप्रमाणे त्यांच्यात आत्मविश्वास ठासून भरलेला आहे. मात्र, सपाट पटकथा आणि दिग्दर्शकाचे आपले द्वंद्व, त्यांच्या प्रतिमेला न्याय देऊ शकत नाहीत.