आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पडद्यामागे : रणबीर कपूर आणि कतरिनाचे नाते

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो - रणबीर कपूर आणि कतरिना कैफ)
कतरिना कैफने नुकताच आपला 31 वा वाढदिवस युरोपमध्ये तिचा मित्र रणबीर कपूरसोबत साजरा केला. काही दिवसांपूर्वीच कतरिना नीतू सिंह यांना डिनरसाठी पंचतारांकित हॉटेलमध्ये घेऊन गेली होती. अनेकदा भारतीय सिनेतारे आपल्या आईच्या खूप जवळ असतात. कारण त्यांच्या लहानपणी त्यांचे वडील आपल्या शूटिंगमध्ये इतके व्यग्र असत की, मुलांचे पालन-पोषण करण्याची जबाबदारी आईवरच असायची.
प्रत्येक युवा सिनेतारका जाणते की, संभाव्य सिनेतारा पतीच्या मनाचा रस्ता त्याच्या आईच्या मनातून जातो. कतरिना कैफ समजदार सिनेतारका आहे. तिच्याशी झालेल्या काही भेटीनंतर मी या निष्कर्षापर्यंत पोहोचलो की, स्टार असतानाही तिचे पाय वास्तवाच्या जमिनीवर टिकून आहेत. ती कधीच हवेत महाल बांधत नाही. ती एका विभक्त कुटुंबातील नऊ बहिणींमध्ये आईच्या बळावर मोठी झालेली मुलगी आहे. फॅन्टसी चित्रपटांमध्ये काम करणे तिचा व्यवसाय आहे. मात्र, तिचा कोणत्याच फॅन्टसीवर विश्वास नाही. आयुष्याने तिला याची परवानगीच दिलेली नाही. ती भलेही बार्बी डॉलसोबत खेळत मोठी झाली नसेल, पण तिच्या व्यक्तिमत्त्वाने प्रेरित बार्बी डॉलची बाजारात खूप विक्री झाली आहे.
चित्रपट समीक्षक जयप्रकाश चौकसे यांचा सविस्तर लेख वाचण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...