आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हा सेल्फ आणि ‘सेल्फी’चा काळ आहे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ही वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या एका व्यावसायिक छायाचित्रकाराने आपल्या आवडत्या टेनिसपटूला पाहिले आणि त्याच्यासोबत फोटो काढण्याची विनंती केली. आसपास कोणताच फोटोग्राफर नसल्याने त्याने स्वत:कडील कॅमेर्‍याचा वापर करून फोटो काढला. डेव्हलप केल्यानंतर तो अंधुक दिसत होता. त्यानंतर त्याने आपल्या कॅमेर्‍याला एक लेन्स लावला, जेणेकरून तो स्वत:च्या हातात कॅमेरा पकडून स्वत:चा चांगला फोटो घेऊ शकेल. सुसज्ज कॅमेरा असलेले मोबाइल बाजारात नव्हते, तेव्हाचा हा किस्सा आहे. त्या ऑस्ट्रेलियन फोटोग्राफरने अशा प्रकारच्या छायाचित्रांना सेल्फी म्हटले. याबाबत तीन दिवसांपूर्वी मी एका वर्तमानपत्रात वाचले होते. त्यामध्ये ‘सेल्फी’चा वापर करणार्‍याचे नाव सचित्र प्रकाशित करण्यात आले होते. खेदाची बाब म्हणजे त्या दिवशीची सर्व वर्तमानपत्रे रद्दीत विकण्यात आली.
आजकाल स्वत:च्या मोबाइलने घेतलेला ‘सेल्फी’ संकेतस्थळावर टाकण्याची फॅशन , तंत्रज्ञानाशी खेळण्यांसारखे खेळणार्‍या युवा वर्गात अत्यंत लोकप्रिय आहे. अनेकदा युवा वर्गाची या ‘सेल्फी’च्या खेळाद्वारे करमणूक होते. कुटुंबांचे फोटो अल्बम आठवणींचा भाग बनतात.
आजकाल लग्नसमारंभात कॅमेरामनच्या सोयीसाठी काही प्रथा नवरी-नवरदेवाला वारंवार कराव्या लागतात. एवढेच नाही तर सातऐवजी 14 फेरे होतात. शिवानी यांची ‘चौदह फेरे’ लोकप्रिय रचना आहे. लग्न दीर्घकाळ अल्बममध्ये सुरक्षित ठेवले जातात, परंतु ते कमी काळातच तुटतात. ज्या पद्धतीने आजकाल फोटोग्राफ घेणे आणि संग्रहित करणे जीवनशैलीचा भाग झाले आहे, त्यानुसार असे वाटते की, 1839 पूर्वी झालेले लग्न रद्द करावे लागतील. कारण स्थिर छायांकनाचा शोधच 1839 मध्ये लागला आहे.
सेल्फीचा आग्रह केवळ आठवणी साठवून ठेवण्यासोबतच हादेखील संकेत देतो की, आजकाल आत्ममुग्ध होण्याची फॅशन पूर्वीपेक्षा वाढली आहे. आत्म प्रशंसेवर मुग्ध होणे जुनी गोष्ट झाली आहे; पण बाजार, जाहिरात आणि तंत्रज्ञानाने आजारी होण्याइतपत ही फॅशन रूढ केली आहे. हेदेखील वाटते की, सर्वजण बोलत आहेत, कोणीतरी ऐकतही आहे. हे सांगणे कठीण आहे की, सर्वजण तीव्र गतीने धावत आहेत. मात्र, कोण, कुठे ‘पोहोचत’ आहे, हे आपण पाहू शकत नाही. आता खेळणी आणि खेळातून भवरे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. मला आठवते की, लहानपणी काही चतुर आणि चपळ लोक भवरा हवेत उडवून आपल्या हातावर घेत असत. ही क्रियादेखील एक प्रकारची सेल्फीच होती काय? वस्तुत: संपूर्ण मानव इतिहासात कमी किंवा अधिक प्रमाणात ‘सेल्फी’चा उल्लेख आहे.
राजे, महाराजे आणि बादशाह आपल्या दरबारात मानधनावर इतिहासकार ठेवत असत. या पगारी लोकांनी लिहिलेल्या इतिहासात त्यांच्या मालकाची खोटी प्रशंसा असायची. विष्णू खरे यांनी सांगितले की, ‘दरबारी इतिहास’ व्यतिरिक्त एक ‘सबलॅटरन इतिहास’ही असतो. तो युद्धात भाग घेणारा सैनिक लिहितो. इतिहासाच्या या आवृत्तीला प्रामाणिक म्हटले आहे. हे शक्य आहे की, युद्धावर गेलेला सैनिकही सायंकाळी आपल्या तंबूत डायरी लिहिताना कदाचित तटस्थता गमावून बसला असावा आणि वास्तवात कल्पनेची रेष त्याच्या नकळतच येत असावी.
कल्पना अशा प्रकारे वास्तवाची सख्खी बहीण होते आणि या जुळ्या बहिणी हमशकल नसतात. आजकाल तर सरकार जुने दस्तऐवज डिजिटल स्वरूपात बनवण्यासाठी टेक्नोक्रॅटला असा आदेश देत आहे की, काही फायली नष्ट करा आणि त्याचे डिजिटल स्वरूप बनवू नका. म्हणजेच भविष्यात संशोधन करणार्‍यांना ‘दरबारी इतिहासा’वर अवलंबून राहावे लागेल. त्या कालखंडाचा इतिहास भावी पिढीला याच्या जाहिरातपटाच्या किंवा चित्रपटांच्या साक्षीवर लिहावा लागेल. एका अर्थाने सर्व पुरस्कारांचेही ‘सेल्फी’च्या स्वरूपातच रूपांतर होते. लवकरच मी या सेलिब्रिटी सर्कसचा एक सदस्य होणार आहे. कीर्ती अनेकदा निर्मिती शक्तीला डसते.