आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पडद्यामागे : विज्ञानाचे आनंद गणित

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो - दिवंगत दादा कोंडके)

दिग्गज चित्रपट दिग्दर्शकांच्या इतिहासात दादा कोंडके यांची बॉक्स ऑफिसवर यशस्वी दिग्दर्शक म्हणून नोंद आहे. त्यांनी लागोपाठ 18 सुपरहिट मराठी चित्रपट बनवले आणि हिंदीतही 'पांडू हवालदार', 'अंधेरी रात में, दिया तेरे हाथ में' इत्यादी यशस्वी चित्रपटांची निर्मिती केली. त्यांच्या चित्रपटांमध्ये ग्रामीण भागातील पुरुषांची प्रचलित असलेली थट्टा होती आणि त्यांना मराठी भाषिक लोकच अश्लील मानत होते. त्यांच्या द्वीअर्थी संवादापासून कादर खान यांनी प्रेरणा घेतली. मेहमूद यांचे विनोदही काही अंशी असेच होते. मात्र, जॉनी वॉकर यांनी कधीच अशा प्रकारच्या गोष्टींचा आधार घेतला नाही. वस्तुत: अशा प्रकारचे विनोद नाटकांमध्ये आणि पारसी थिएटरमध्येही होते. संपूर्ण लोकसंस्कृतीत अश्लीलतेच्या सीमेपर्यंत पोहोचलेले घाणेरडे विनोद करण्यात आले आहेत. 'मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है' आणि 'रंग बरसे भीगे चुनरवाली' हेदेखील उत्तर प्रदेशचे लोकगीत होते. 'कोंडके स्टाइल' प्रवाहाच्या समान विशुद्ध विनोदही सिनेमा माध्यमात रचण्यात आले. ऋषिकेश मुखर्जी यांच्या एका चित्रपटात याला 'निर्मळ आनंद' म्हटले असून ते 'फिकट आनंद'चे अस्तित्त्व स्वीकार करण्यासारखे आहे. विनोदाच्या उच्च श्रेणीत किशोर कुमार यांच्या 'चलती का नाम गाड़ी', मेहमूदचा 'पडोसन', गुलजार यांचा 'अंगूर' आणि ऋषिकेश मुखर्जी यांच्या 'गोलमाल'चा समावेश आहे. वाचकांचा आग्रह असतानाही कपिल शर्माकडे कानाडोळा करण्याचे एक कारण म्हणजे, त्याच्या कार्यक्रमाचा फॉरमॅट विदेशातून कॉपी केला आहे.
पियक्कड दादी, 44 वर्षीय बुआ, पगार नसलेला नोकर आणि बाह्य प्रेरणेच्या उपस्थितीवर पाकिस्तानच्या टीव्हीचा प्रभाव आहे. कपिल चांगला अभिनेता आणि गायक आहे. त्याची संवाद फेकण्याची टायमिंग जबरदस्त आहे, पण त्याच्या स्वत:च्या 'पत्नी'ची अभद्र थट्टा पचवणे कठीण आहे. वस्तुत: टीव्हीवरील संपूर्ण विनोदाचा आधारच महिलांचा अपमान राहिला आहे. तथापि, गेल्या 40 वर्षांपासून काही शास्त्रज्ञ आनंदाच्या मोजमापाच्या शोधात आहेत आणि विनोदाच्या योग्यतेवरून देशांचे वर्गीकरणही केले जात आहे. बाजार अशा प्रकारच्या विलक्षण गोष्टी रचतो. हास्याच्या मोजमापाने आनंदाच्या जाणिवेचे वजन शोधण्याचे हास्यास्पद प्रयत्नही होत आले आहेत. काही शास्त्रज्ञांनी जगप्रसिद्ध पेंटिंग मोनालिसाच्या हास्याचे गणितही सादर केले आहे. त्यांच्या मते, हास्यात 83 टक्के आनंद, 9 टक्के विद्रूप, 6 टक्के भीती आणि 2 टक्के क्रोध आहे. बिचाऱ्या लिओनार्डो डा विंची यांना मेल्यानंतरही आराम मिळत नाहीये. फॅशन बाजारात नितंब, छाती, कमरेच्या मापाच्या आधारे महिलांचे वर्गीकरणही अमानवी आहे. आता एखाद्या चेहऱ्यावर अर्धा इंच हास्य, 3/4 इंच हास्य यासारख्या फाजील गोष्टींनी आनंदाला किलोत मोजण्याचा काय अर्थ आहे?
हृतिक रोशनचे आजोबा संगीतकार रोशन 1967 मध्ये हरी वालिया यांच्या मेजवानीत विनोद ऐकवत राहिले, खदखदून हसत राहिले आणि क्षणार्धात हृदयविकाराचा झटका येऊन गतप्राण झाले. त्या वेळी त्यांच्या चेहऱ्यावर त्यांच्या खदखदून हसण्याच्या खरवडीसारखे एक हास्य कायम होते. मृत्यूच्या कवेत झोपलेल्या व्यक्तीच्या हास्याला संशोधक काय म्हणतील- अंतिम आनंद. ज्या कुरूप वेश्या तुसड्या ग्राहकाच्या आनंदासाठी शरीर कुटवून घेण्यापेक्षाही जास्त स्मित हास्य देतात त्या वेश्यांच्या हास्याला काय म्हणाल? आनंद खरोखर आनंदच आहे, हे सांगणे कठीण आहे. संपूर्ण प्रकरणच पहाटेसारखे आहे. त्यात दु:खाचा 'चंपई अंधेरा' आहे आणि आनंदाचा 'सुरमई उजाला' आहे.
एक श्रीमंत माणूस महागडी स्पोर्टस कार मिळाल्याने खुश होतो, कांकेर येथील वन्य जमात मीठ मिळाल्यावर खुश होते. रस्त्यावर पैसा मिळवण्यासाठी स्वत: आपली पाठ हंटरने रक्तबंबाळ करणारा पोट भरण्याच्या आशेने हंटर खाऊन खुश आहे. आनंदाच्या परिभाषेत इतिहासाच्या भूमिकेकडे कानाडोळा करता येणार नाही. हिटलर यहूदी जातीच्या लोकांवर अत्याचा करून आनंदी होता आणि आता त्या जातीच्या लोकांचा इस्रायल गाझा पट्टीत मुलांना ठार मारून खुश होत आहे. नूरजहांने गुलाबाच्या अत्तराचा शोध लावला होता, पण ती आपल्या आनंदासाठी गुन्हेगारांना हत्तींच्या पायाखाली तुडवत असे. शास्त्रज्ञांच्या गटाचे म्हणणे आहे की, आनंदाचे हे मोजमाप सरकारांना जनहितार्थ धोरणे बनवण्यासाठी मदत करेल. कदाचित अशाच एखाद्या मूल्यांकनाद्वारे भारतीय रेल्वेत विदेशी गुंतवणुकीमुळे उत्कृष्ट स्थानक, स्वच्छ वातानुकूलित गाड्या, स्वस्त पॅसेंजर गाड्या रद्द केल्या जात आहेत. जणू काही शायनिंग इंडियासाठी हे रचले जात आहे. किंवा त्यासाठी प्रयत्न केले जात अाहेत. मात्र, या गुंतवणुकीवर नफा कमावणारे व्यापारी रेल्वे भाडे एवढे वाढवतील की, गरिबांसाठी प्रवास अशक्य होईल. वस्तुत: सर्वच क्षेत्रात संपूर्ण संरचनाच अशीच केली जात आहे, जणू काही आनंद भारत आणि असहाय भारत अशा दोन खंडात विकास होईल. हेदेखील शक्य आहे की, विज्ञान, काळाच्या नदीच्या दुसऱ्या किनाऱ्यावरून आलेल्या नवजात अर्भकाच्या स्मित हास्याने ईश्वरीय स्पर्शाला वेगळे करून आकलन करेल आणि बाटलीत बंद करून विकेल.