आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पडद्यामागे : घूंघट के पट खोल तोहे पिया मिलेंगे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो - 'पीके'तील आमिरचा लूक)

राजकुमार हिराणी आणि आमिर खान यांच्या 19 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या 'पीके'चे एक स्थिर चित्र प्रकाशित झाले. त्यात आमिर खान रेल्वे रुळावर ट्रांझीस्टरने 'लज्जा' झाकत निर्वस्त्र उभा आहे. यावर आता वाद सुरू झाला आहे आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया याला खळबळजनक मानत आहे. आगामी काळात हा वाद वाढतच जाणार आहे. जाहिरात तज्ज्ञ छतांवर उभे राहून, प्रचाराचे युद्ध आमिर खानने जिंकले आहे, म्हणत ओरडत आहेत. कारण टीका करणारेच सर्वात आधी या चित्रपटाचे तिकीट खरेदी करतील. धर्माचे जाणकारही खेळात सहभागी झाले आहेत. आज त्यांच्या विना सर्व खेळ अपूर्ण आहेत.
राजकुमार हिराणी यांचे आतापर्यंत प्रदर्शित झालेले तीन चित्रपट करमणूक करणारे होते. एका जबाबदार दिग्दर्शकाप्रमाणे त्यांनी चित्रपटात अनेक वेगवेगळ्या विषयांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. आमिर खानने गेल्या दशकात 'लगान', 'तारे जमीं पर', 'पीपली लाइव्ह' आणि 'धोबी घाट'ची निर्मिती केली आहे. या सर्व चित्रपटांमध्ये करमणुकीसह सामाजिक बांधिलकी जपली होती. टीव्हीवरही त्याने जनजागृतीपर 'सत्यमेव जयते' सादर केला. या कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात महात्मा गांधींनी उचललेले मुद्देच मांडण्यात आले आहेत आणि दुसऱ्या मोसमाची शूटिंग यशराज स्टुडिओत गेल्या महिन्यापासून सुरू आहे.
राजकुमार हिराणी आणि आमिर खान यांची मागील कारकीर्द सामाजिक बांधिलकीने भरलेली आहे. दोघेही अत्यंत जबाबदार व्यक्ती असून खळबळ उडवून देणे त्यांच्या स्वभावातच नाही. 'पीके'च्या या स्थिर चित्राने हा अंदाजही लावता येईल की, चित्रपटाची कथा सत्याचा शोध घेणारी आहे. सत्याला कधीच आवरणाची गरज नसते. सत्य निर्वस्त्रच असते. भारतीय इतिहासातील महान कवी कबीर यांचे दोहे आठवण्याचा प्रयत्न करा, 'घूंघट के पट खोल, तोहे पिया मिलेंगे, झूठ वचन मत बोल, तोहे पिया मिलेंगे.' येथे 'पिया' ईश्वर किंवा सत्य असून त्यावर कोणतेच आवरण नाही, असे म्हणता येईल. आपल्या स्वत:च्याच डोळ्यांवर आवरण म्हणजेच घूंघट आहे. हा घूंघट असत्याचा असून तो आपल्या उद्धटपणाचाही आहे. म्हणून सर्व घूंघट हटवताच सत्य दिसून येते.
सुरुवातीला 'पीके' हा समाजात पसरलेली अंधश्रद्धा आणि कुप्रथांच्या विरोधात तयार करण्यात आलेला चित्रपट असल्याचे वृत्त होते.
सारांश हा आहे की, हा सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न असलेला चित्रपट आहे. किंबहुना अवडंबर आणि देखाव्याच्या विरोधात साध्या, थेट आणि खऱ्या जीवनशैलीच्या बाजूने रचलेला हा दस्तऐवज आहे. गेल्या 15 वर्षांपासून आमिर खान स्वत:चाच शोध घेत आहे. याच प्रक्रियेच्या परिणामस्वरूप काही चित्रपटांची निर्मिती झाली. 'सत्यमेव जयते'देखील याच सूक्ष्म विचाराचा एक भाग आहे. काही लोक म्हणत आहेत की, चित्रपटाच्या एका भागात इतर ग्रहातून आलेल्या प्राण्याचे दृश्य आहे. हेदेखील शक्य आहे की, हा चित्रपट म्हणजे सामाजिक जीवनात आलेला देखावा आणि बनावटीपणा दाखवण्याचा प्रयत्न आहे. जमातींच्या थेट आणि निसर्गासोबत जगण्याच्या परंपरेत सर्वजण जवळपास निर्वस्त्र राहतात. शानी यांच्या 'सांप-सीटी' कादंबरीत आदिवासी जमातींच्या एका गावात शहराच्या सािनध्यात आलेली एक स्त्री ब्लाउज घालते तेव्हा इतर महिला तिला निर्लज्ज म्हणतात. विकास चक्र उलटे चालवण्याचे हे समर्थन नाही, पण जीवनशैलीत आलेल्या बनावटपणावर प्रकट केलेले दु:ख आहे. सिमेंटच्या जंगलापेक्षा जमातींची जीवनशैली चांगली आहे. उल्लेखनीय म्हणजे, आमिर खानच्या हातात एक ट्रांझीस्टर आहे. जर इतर ग्रहातून आलेल्या व्यक्तीचा मुद्दा असेल तर हे त्याचे संवादाचे माध्यम आहे.
वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले तर 'ट्रांझीस्टर'च्या आगमनाने सामाजिक परिवर्तन झाले आहे. तंत्रज्ञानाचा प्रत्येक टप्पा समाजाला बदलतो. मोबाइल आल्यानंतर परिवर्तन घडले नाही का? जर ट्रांझीस्टरला आपण बातम्या ऐकण्याचे यंत्र मानले तर बातम्यांच्या रचलेल्या भयावह मायाजाळाकडे आपले लक्ष जाते. तुम्हाला आठवते, 'टू इन वन' ग्रामीण भागात पोहोचताच लोकप्रिय चित्रपटगीतांच्या तालावर भजने तयार करून आपण ग्रामीण भागातील आवडी-निवडीच बदलल्या होत्या. एक दशकापूर्वी मार्लिन ब्रँडो सारख्या महान अभिनेत्याने 'लास्ट टँगो इन पॅरिस'मध्ये स्वत:ला निर्वस्त्रच सादर केले होते. गेल्या काही वर्षांमध्ये 'स्टुडंट आॅफ इयर'सारख्य चित्रपटांमध्ये नायक नायिकांपेक्षा कमी कपडे घातलेले दिसतात. या एका स्थिर चित्राने अनेक आख्यायिकांना जन्म दिला. मात्र, याला खळबळजनक म्हणणे योग्य नाही. आपल्याला राजकुमार हिराणी आणि आमिर खानवर विश्वास ठेवला पाहिजे आणि चित्रपटाच्या प्रदर्शनानंतरच एखाद्या निष्कर्षापर्यंत पोहोचले पाहिजे.