आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करमणूक जगतात 'अंडरडॉग' आणि कुत्रा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अक्षय कुमारच्या 'एंटरटेन्मेंट'च्या प्रोमोवरून असे वाटते की, एखाद्या श्रीमंताने आपली संपत्ती कुत्र्याच्या नावावर केली आहे आणि नायक त्या संपत्तीचा अर्धा मालक आहे. संपूर्ण चित्रपट नायक आणि कुत्रा यांच्यातील एकमेकांबद्दलच्या द्वेषाची आणि प्रेमाची कथा आहे. भारतीय सिनेमात कुत्र्यांचा वापर अनेक पद्धतीने झाला आहे. के. सी. बोकाडिया यांच्या 'तेरी मेहरबानियां'मध्ये कुत्रा केंद्रीय शक्ती आहे. तसेच रमेश तलवार, यश चोप्रा आणि संगीतकार खय्याम यांच्या भागीदारीत बनलेल्या 'नूरी'मध्येही कुत्र्याची महत्त्वाची भूमिका आहे. मल्टिस्टारर 'काला पत्थर'ला विलंब झाल्यामुळे नवतारका पूनम धिल्लनसोबत कमी बजेटमध्ये बनवण्यात आलेल्या या चित्रपटाने 'काला पत्थर'पेक्षाही जास्त कमाई केली होती. पूनम धिल्लनला 'त्रिशूल'मध्ये नायकांच्या बहिणीची छोटी भूमिका मिळाली होती.
कुत्रा अत्यंत हुशार आणि निष्ठावान प्राणी आहे. अनेक संवेदनशील लोक त्याला समानतेची वागणूक देतात. विदेशात कुत्र्यांसाठी विशेष खाद्य बनवणार्‍या कंपन्या भरपूर नफा कमावतात. अनेक लोक कुत्र्यांवर भरपूर पैसा खर्च करतात आणि त्यांची सेवा करतात. पाळणार्‍यांचा वर्ग भेद कुत्र्यांवरही लागू करण्यात आला आहे. श्रीमंत माणसांच्या कुत्र्यांचा थाट वेगळा आहे. काही कुत्र्यांच्या गळ्यात बांधलेल्या पट्टय़ावर हिरेदेखील जडलेले असतात. मात्र, रस्त्यावरील 'बेवारस' कुत्र्यांची स्थिती दयनीय असते. तेसुद्धा सामान्य गरीब माणसासारखे असतात. इंग्रजी भाषेत कमकुवत व्यक्तीला 'अंडरडॉग'च म्हणतात. क्रीडा विश्वात कमकुवत संघाला अशाच प्रकारे संबोधले जाते. राज कपूर यांच्या 'आवारा'मध्ये पथदिव्याखाली बेघर नायक बसलेला आहे. एक मोकाट कुत्रा त्याच्याजवळ येतो. नायक त्याला म्हणतो की, दोघांचीही स्थिती सारखीच आहे. जो वाटसरु रस्त्यावरून जाताना कुत्र्याला लाथ मारतो तोच कुत्रा त्याचा गळा पकडतो. दिग्दर्शक छोट्याशा दृश्यात स्पष्ट करतो की, नायक अंडरडॉग आहे. वस्तुत: आपल्या समाजवादी प्रवृत्तीमुळे राज कपूर यांनी 'जागते रहो' आणि 'जोकर'मध्येही कुत्र्याचा प्रतीकात्मक वापर चांगल्या तर्‍हेने केला आहे. अशाच प्रकारे 'चिल्लर पार्टी' नामक चित्रपटात एक अनाथ मुलगा आपला मित्र असलेल्या कुत्र्यासोबत एका परिसरात कार धुण्याचे काम करतो आणि परिसरातील मुले त्याचे मित्र बनतात. ही सर्व मुले 'बेवारस कुत्र्यां'ना पकडण्याचा आदेश देणार्‍या मंत्र्याच्या विरोधात संघर्ष करतात. वस्तुत: मंत्री माणसांनाही कुत्राच समजतात.
चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये टीव्हीवर मंत्री आणि मुले यांच्यात वादविवाद होतो. याच्या शेवटी अनाथ मुलगा म्हणतो की, 'मला इतर मुलांप्रमाणे शाळेत जाऊन शिकण्याची इच्छा होती, परंतु काही शिकलेल्या लोकांचे आचरण पाहून मला वाटते की, अशा प्रकारे साक्षर होण्यापेक्षा अशिक्षित राहणेच चांगले आहे.' हे अत्यंत सखोल आणि बोलके वक्तव्य आहे. निदा फाजली यांच्या ओळींचा आशय आहे की, मुलांचा वजनदार पुस्तकांपासून बचाव करा. कारण ही पुस्तके वाचून ते तुमच्या-आमच्यासारखे होतील. 'चिल्लर पार्टी' कुत्र्याला केंद्रस्थानी ठेवून बनवण्यात आलेला सामाजिक बांधिलकी जपणारा सवरेत्कृष्ट चित्रपट आहे.
'जोकर'मध्ये नीरज यांच्या 'ए भाई जरा देखकर चलो' गाण्याच्या काही ओळी अशा आहेत की, ज्यामधून प्राणी माणसापेक्षा जास्त निष्ठावंत आहे; हे दिसून येते. माणूस ज्याचा माल खातो, ज्याच्याकडून प्रेम मिळवतो त्याच्याच पाठीत खंजीर खुपसतो. तथापि, सलीम खान यांच्या फार्म हाऊसमधील त्यांचा कुत्रा उच्च दर्जाच्या पेडिग्रीचा नसून रस्त्यावरील कुत्रा आहे. एकेदिवशी सलीम साहेब म्हणाले की, 'माझ्याजवळ बसलेली माझी नातवंडे आणि मित्र, सलमान खान येताना पाहन त्याच्या दिशेने धावतात, पण माझा हा निष्ठावंत कुत्रा माझ्याजवळच बसून राहतो.' पिता-पुत्रांच्या लोकप्रियतेबाबत प्रतिस्पर्धा आहे, असा या ओळींचा अर्थ होत नाही. खान कुटुंब मजबूत कौटुंबिक संस्कारांनी बांधलेले आहे. सलीम साहेबांचा असे मत आहे की, महान कवी वाल्मीकीने निष्ठेचे प्रतीक स्वरूप रचलेले हनुमानाचे पात्र वानर ठेवले आहे.
ते मनुष्य रूपाने रचलेले नाही. कारण ते संपूर्ण सर्मपण आणि निष्ठावानाचे प्रतीक ठरू शकत नाही. तथापि, 'एंटरटेन्मेंट' हा विनोदी चित्रपट आहे. एका लालची माणसाच्या अर्ध्या संपत्तीचा मालक कुत्र्याबाबत असलेल्या द्वेषाच्या दृष्टिकोनासोबतच तो कुत्र्याच्या सहवासात चांगला माणूस बनतो, अशा प्रकारच्या परिवर्तनाची ही कथा असू शकते. वास्तविक हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीचा व्यक्त केलेला अंदाज आहे.