आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय सिनेमाचे आगळेवेगळे मध्यांतर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सहाव्या दशकातील‘भुवन शोम’ पासून ‘समांतर सिनेमा’ला प्रसार माध्यमांनी एका वेगळ्या चित्रपट श्रेणीच्या रूपात प्रसिद्धी दिली. तथापि, काही लोक याची सुरुवात शैलेंद्र यांच्या क्लासिक ‘तीसरी कसम’पासून झाल्याचे म्हणतात. कारण याच्याशी संबंधित बासू भट्टाचार्य, बासू चटर्जी इत्यादींनी बनवलेल्या चित्रपटांना समांतर चित्रपट म्हटले गेले आणि श्याम बेनेगल, गोविंद निहलानी, प्रकाश झा यांनीदेखील याला सशक्त बनवले. यापूर्वीच्या कालखंडात अनेक चित्रपटांची अशीच नियमितपणे निर्मिती होत राहिली. त्यांना तुम्ही समांतर म्हणू शकता. शांताराम यांचा ‘दुनिया ना माने’ १९३७, मेहबूब खान यांचा ‘रोटी’ १९४१, चेतन आनंद यांचा ‘रोटी’ १९४६, विमल रॉय यांचा ‘दो बीघा जमिन’ राज कपूर यांचा ‘आग’, ‘बूटपॉलिश’ आणि ‘जागते रहो’ १९५६, तसेच गुरुदत्त यांचा ‘कागज के फूल’ इत्यादी क्लासिक चित्रपटांची निर्मिती या समांतर सिनेमा नामक पोकळ घोषणेच्या खूप आधी झाली आहे.
चित्रपट उद्योगाशी संबंधित लोकांची वर्गवारी खूप सोपी आहे. चित्रपट फक्त दोन प्रकारचे असतात मनोरंजक आणि कंटाळवाणे. तथापि, इम्तियाज अली, आनंद गांधी आणि अजय बहल यांच्या प्रेरणेने निर्माती प्रीती अली, पल्लवी रोहतगी आणि राघवन भारद्वाज यांनी आठ चित्रपटांची निर्मिती करून तो चित्रपट फिल्म पॅकेजच्या रूपात १५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित केला. मात्र, ‘सिंघम रिटर्न्स’च्या वावटळात हा कचरा कुठे उडाला कोणालाच कळाले नाही. जवळपास १० मिनिटांच्या या प्रत्येक चित्रपटाच्या आठ चित्रपटांच्या पॅकेजचे नाव ‘शुरुआत का इंटरवल’ असे आहे. आज प्रदूषित नद्या आणि भाषांच्या काळानुरूप ‘शुरुआत’ हिंदीत आणि ‘इंटरवल’ इंग्रजीत लिहिण्यात आले. कदाचित नवी राष्ट्रभाषा अशीच विकसित होईल. तथापि, हे आठही चित्रपट मनोरंजक आहेत आणि प्रेक्षकांची वाट पाहता-पाहता आपटतीलही, परंतु बाजारी डिझायनर चित्रपटांचे अफूबाज प्रेक्षक पाहायला येणार नाहीत. या चित्रपटांचे सादरीकरण क्लासिक अंदाजात करण्यात आले आहे. याला आपण कलेची पहाट म्हणू शकतो. त्यामध्ये अंधार आणि उजेड गळ्यात गळे घालताना दिसतात. यापैकी ‘लास्ट अँथम’मध्ये संघर्ष करणा-या अभिनेत्याचे कडू-गोड अनुभव आहेत. अशाच प्रकारे ‘अयान’मध्ये रंगमंचावर सादर केलेल्या रामायणाच्या मध्यांतरात रामाचे पात्र अभिनीत करणारे पात्र नाटक सोडून निघून जाते तेव्हा इतर कलावंत पडद्यामागील सादरीकरण सांभाळण्याचा कसा प्रयत्न करतात, हे दाखवले आहे.
‘इंटरवल थ्रीडी’मध्ये हॉरर चित्रपटांवर अर्थपूर्ण व्यंग आहे. हा चित्रपट महान पद्धतीच्या एका लघुकथेसारखाच आहे. त्यामध्ये एक व्यक्ती दुसऱ्याला विचारते की, तुमचा भूत-प्रेतांवर विश्वास आहे का? आणि विश्वास ठेवणाऱ्यांसमोरून प्रश्न विचारणारा भूताप्रमाणे अदृश्य होतो. अमोल पालेकर यांचा शाहरुख खान अभिनीत ‘पहेली’ ‘भूत विद्ये’चा उत्कृष्ट चित्रपट आहे. अशाच प्रकारे ‘गेटकीपर’मध्ये रेल्वे क्रॉसिंगच्या कर्मचाऱ्याच्या एकटेपणाचा तपशील आहे. हा तपशील मला कुमार अंबुज यांच्या ‘शाम’च्या ओळींची आठवण करून देतो. ओळी आहेत, ‘एक जख्म है नीला सांवला खिलते हुए नए रूप में, एक स्वर उजास की विरलता में कांपता हुआ गहराता, तरंगों से भर गया है आकाश का मैदान, सुनसान का रिसीवर अपनी वेवलेंथ पर आवाजों को पकड़ रहा है, मुद्धिम चीखों और भाषा के अनजान द्वीपों पर किनारे, जमा हो रही है कई वर्षों की किश्तियां...’
या आठही चित्रपटांचा मध्यवर्ती विचार भारतीय सिनेमाचे ‘मध्यांतर’ आहे. जगातील कोणत्याही देशाच्या चित्रपटांमध्ये ‘मध्यांतर’ नसतो. कारण कथेची मध्यांतरापूर्वी आणि नंतरच्या खंडांमध्ये विभागणी केली जाऊ शकत नाही. मध्यांतर केवळ भारतीय चित्रपटांच्या लांबीमुळे नाही. कारण आजकाल १०० मिनिटांच्या चित्रपटांमध्येही ‘मध्यांतर’ होतो. वस्तुत: सिनेमा व्यवसायात मध्यांतरात विकण्यात आलेले पॉपकॉर्न, शीतपेये प्रदर्शन व्यवसायाच्या कमाईचा आधार आहे. खरे म्हणजे मध्यांतर आमच्या सामूहिक अवचेतनातच आहे. संपूर्णता आमचा हेतू नाही. अर्धवटपणा आमच्या इच्छा बनल्या गेल्या आहेत. आम्ही तर सत्यालाही त्याच्या पूर्ण रूपात स्वीकारण्याचे धाडस करु शकत नाही. तसेच आयुष्याच्या चित्रपटातही आम्ही मौज-मजेचा मध्यांतर शोधत असतो. आमच्या मनोरंजनात भूक आणि भुकेत मनोरंजन समाविष्ट झालेले आहे. हा खाऊ-पिऊ देश आहे, मंदिरातही ‘प्रसाद’ आमच्यासाठी ‘दर्शना’पेक्षा अधिक महत्त्वाचा बनला आहे. आम्हाला सत्यात नव्हे तर त्याच्या तमाशात रस आहे, आम्ही अनंत तमासगीर आहोत. राज कपूर आपल्या महत्त्वाकांक्षी ‘जोकर’मध्ये शेवटी म्हणतात, ‘जाइएगा नहीं, मेरा तमाशा खत्म नहीं हुआ, यह तो मध्यांतर है.’