आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

EXPERT VIEW: अखेर का एकाकी आयुष्य व्यतित करत आहेत शशी कपूर?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(शशी कपूर)

76 वर्षीय बॉलिवूड अभिनेते शशी कपूर यांना रविवारी संध्याकाळी श्वसन प्रक्रियेत अडथळा निर्माण झाल्यामुळे कोकिलाबेन धिरुभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले. गेल्या दोन वर्षांपासून किडनीच्या आजारामुळे ते आठवड्यातून दोन वेळा डायलिसिस करुन घेत आहेत. त्यांचे मोठे भाऊ शम्मी कपूर यांनीसुद्धा डायलिसिसच्या सहाय्याने बारा वर्षे काढली. मात्र त्यांच्या मृत्यूचे कारण किडनी आजार नव्हे, तर अन्य आजार होता. त्यांचे (शम्मी कपूर) आणि छोटे भाऊ शशी कपूर यांचे आजार जवळपास सारखेच आहेत, मात्र आजारपणाकडे बघण्याच्या दोघांच्या दृष्टिकोनात अंतर आहे.
शम्मी कपूर म्हणायचे, की आठवड्यातील तीन दिवस रुग्णालयात काढल्यानंतर ते उर्वरित चार दिवस दबंग स्टाइलने आयुष्य जगतात. त्यांना कार चालवण्याची आवड होती. मात्र पायांची त्यांना साथ मिळत नव्हती, म्हणून त्यांनी हाताने नियंत्रित होणारी कार बाहेर देशातून मागवली होती. त्यांनी आपल्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे आजारपणाचे दुःख दूर केले आणि सेवा करणा-या कुटुंबीयांना त्रास होऊ दिला नाही.
पुढे वाचा, शशी कपूर यांचा दृष्टिकोनच त्यांचा त्रास वाढवत आहे..