आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पडद्यामागे : महेंद्रसिंग धोनी बायोपिक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'भाग मिल्खा भाग', 'पान सिंग तोमर' आणि 'मेरी कोम'च्या यशानंतर चित्रपट निर्मिती क्षेत्रात बायेापिकचा शोध खजिन्याप्रमाणे घेतला जात आहे. या सर्व चित्रपटांच्या निर्मितीच्या खूप आधी मनमोहन शेट्टी यांच्या कंपनीने हॉकीचे जादूगर ध्यानचंद यांच्यावर चित्रपट बनवण्याची तयारी सुरू केली होती आणि एक वर्षापूर्वीच बऱ्याच संशोधनानंतर एक पटकथा तयार झाली. मात्र, या पटकथेची लांबी कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच पुढच्या महिन्यामध्ये एक परिपूर्ण पटकथा रणबीर कपूरला वाचण्यासाठी देण्यात येईल. तथापि, याच दरम्यान महेंद्रसिंग धोनीच्या बायोपिकची घोषणा करण्यात आली. यात 'काय पो छे'मधील सुशांत सिंह राजपूत महेंद्रसिंग धोनीची भुमिका साकारणार आहे.
सध्या धोनी क्रिकेटमध्ये सक्रिय असून त्याचे करिअर अद्याप संपलेले नाही. म्हणून क्लाइमॅक्स नसलेला चित्रपट कसा बनवला जाऊ शकतो? परंतु भारतीय बायोपिकमध्ये सोयीनुसार बदल केले जातात. बायोपिकमध्ये सत्याचा आग्रह असला पाहिजे. हा आग्रह 'पान सिंह तोमर' आणि 'मेरी कोम'मध्ये झालेला आहे. 'भाग मिल्खा भाग'मध्ये शेवटची धावण्याची स्पर्धा रोम ऑलिम्पिक होती, परंतु लार्जर दॅन लाइफ चित्रपटामध्ये नायकाला पराभूत होताना कसे दाखवले जाऊ शकते. यामुळे पाकिस्तानमध्ये झालेली स्पर्धा क्लायमॅक्स बनवण्यात आली, जेणेकरून बॉक्स ऑफिससाठी आवश्यक पाक-बेशिंगवर टाळ्या मिळवता येतील. म्हणून महेंद्रसिंग धोनी बायोपिकचा क्लायमॅक्स एकदिवसीय क्रिकेट सामना जिंकणे असू शकतो. सत्य हे आहे की, ही वेळ बायोपिकची नाही. मात्र, आजच्या काळात शिजण्याआधीच विकण्यात अधिक फायदा आहे. 'आआयटी'मध्ये अंतिम परीक्षेपूर्वीच नोकरी मिळते. वस्तुत: सर्वच क्षेत्रामध्ये आता शिजण्याची कोणीच वाट पाहत नाही. कारण बाजारालाही हेच हवे आहे. कोल्ड-स्टोरेज केवळ एक व्यवसाय नाही, तर हा एक सखोल विचारदेखील आहे. निर्मिती क्षेत्राशी संबंधित लोक आपल्या सुप्त मनाच्या शीत-कक्षामध्ये अनेक विचार शिजण्याची वाट पाहतात. अनेकदा अर्धवट शिजलेला विचारदेखील घाईमुळे चुकांकडे लक्ष देताच बाजारात येतो.
एका छोट्या शहरातील युवा धोनीने क्रिकेटमध्ये चमत्कार केला आहे. मात्र, क्रिकेटमध्ये समाविष्ट व्यापाराला त्याने आत्मसात केले आहे. त्यामुळे आपल्या लोकप्रियतेच्या शिखरावर चित्रपट प्रदर्शित केल्यास भरपूर फायदा होऊ शकतो, हे त्याला माहीत आहे. मात्र, निवृत्त झाल्यावर हे शक्य नाही. जसा नेता निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याअगोदर तत्काळ निर्णय घेतो, तसेच धोनीनेदेखील क्षितिजावर उभी आपली सेवानिवृत्ती ओळखली आहे.
गेल्या आयपीएल स्पर्धेदरम्यान क्रिकेट सट्टा घोटाळ्यात धोनीच्या नावाचादेखील उल्लेख होता आणि अद्यापपर्यंत तो मुद्गल चौकशी समितीसमोर कदाचित हजर झालेला नाही.
खेळाडूंच्या करिअर मॅनेजमेंट कंपनीमध्ये भागीदारी त्याची भागीदारी असल्याचा आणि तो कॉनफ्लिट ऑफ इंटरेस्टचा दोषी असल्याचा त्याच्यावर आरोप होता. मात्र, पुरावे हाती येण्याच्या अगोदरच कागदी दुरुस्ती करण्यात आली आहे. जर याला क्लायमॅक्स बनवले तर धोनी 'काउंटर क्लोजर'चा शिकार मानला जाऊ शकतो. 'काउंटर क्लोजर' हा ज्यां पॉल सार्त्र यांचा वाक्यप्रचार आहे.
विजयाच्या क्षणी नायकाला माहीत असते की, वस्तुत: त्याचा आदर्श धराशायी आहे आणि विजय पोकळ आहे.