आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पडद्यामागील : सावित्री विरुद्ध श्रीदेवी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्रेः सावित्री सिनेमाचे पोस्टर, उजवीकडे अभिनेत्री श्रीदेवी)
बोनी कपूर आणि रामगोपाल वर्मा फार जुने मित्र आणि भागीदार आहेत. मात्र, श्रीदेवीच्या नावाचा वापर एका चित्रपटाच्या शीर्षकामध्ये केल्यामुळे दोघेही एकमेकांवर नाराज आहेत. बोनी यांनी न्यायालयात जाण्याचा इशारादेखील वर्मा यांना दिला आहे. आपला पहिला चित्रपट 'शिवा'च्या यशानंतर रामगोपाल वर्मा बॉलिवूडमध्ये जम बसवण्यासाठी आतुर होते. तसेच बोनी कपूर नेहमीच दक्षिण भारतीय सिनेमाच्या पटलावरील उदयोन्मुख कौशल्य हिसकावण्यासाठी आतुर राहायचे. कारण त्यांचे करिअरच्या सुरुवातीचे दोन चित्रपट 'हम पांच' आणि 'वो सात दिन' दाक्षिणात्य चित्रपटांचेच रिमेक होते. जम बसल्यानंतरही त्यांनी रिमेकची परंपरा कायम ठेवली. श्रीदेवीसोबत लग्न केल्यानंतर तर चेन्नई त्यांची सासुरवाडीच झाली. वस्तुत: त्यांना दक्षिणेचा एवढा मोह आहे की, 'दक्षिण-मुखी' घरदेखील खरेदी करण्याला त्यांचा आक्षेप नाही. तथापि, त्यांचा वास्तुशास्त्रावर विश्वास आहे.
रामगोपाल वर्मा यांच्या 'शिवा'नंतर 'रात' आणि 'द्रोही'चे निर्माते बोनी कपूरच होते. 'द्रोही'साठी ऊर्मिला मातोंडकरची शिफारसदेखील बोनी यांनीच केली होती. 'द्रोही'दरम्यान तयार झालेल्या संबंधांमुळे रामगोपाल यांनी आमिर खान अभिनीत 'रंगीला'मध्ये ऊर्मिलाला असे सादर केले की, ती स्टार झाली आणि तिच्यासोबत अनेक चित्रपट बनवले. तिच्या अंगप्रदर्शनामुळे बॉक्स ऑफिसवर यश मिळत गेले. बोनी यांनी वर्मांसोबत 'कंपनी'देखील बनवला. सारांश हा आहे की, नाते जुने आणि घट्ट होते, आता त्याला तडा जात आहे.
चित्रपट समीक्षक जयप्रकाश चौकसे यांचा सविस्तर लेख वाचण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...