आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पडद्यामागील : सदाशिव अमरापूरकर यांना सलाम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सदाशिव अमरापूरकर यांचे वयाच्या ६४ व्या वर्षी निधन झाले. त्यांचा मृत्यू फुप्फुसात झालेल्या जंतुसंसर्गामुळे झाल्याचे म्हटले आहे. डॉक्टरांच्या अहवालावरून हे तर स्पष्ट होऊ शकते की, दूषित हवेमुळे किती लोकांचे फुप्फूस कमकुवत झाले आहेत. आपल्या तथाकथित विकासासोबत प्रदूषित आणि पृथ्वीच्या आतड्यांना नियमित पोहोचवल्या जाणाऱ्या नुकसानाशी संबंधित आहे. मात्र, मागासलेल्या लोकांना वाटते की, विकास होताच सर्व सुखी होतील. प्रत्येक कालखंड आपल्या आवडीनुसार मृगजळाची निवड करतो. हादेखील योगायोग आहे की, पृथ्वीराज कपूर, अमरीश पुरी इत्यादी लोकांच्या मृत्यूचे कारण त्यांचे फुप्फूसच होते.
आज शशी कपूर यांनादेखील श्वास घेताना त्रास होत आहे. हे शक्य आहे की, नाट्यकलावंत संवाद फेकताना आपल्या फुप्फुसांचा अधिक वापर करत असावेत आणि काळानुरूप ते अशक्त असावेत. वस्तुत: फुप्फुसे कापसाप्रमाणे नाजूक असतात. मात्र, त्यांच्यात खूप ताकद असते. अभिनेत्यांना संवाद फेक करताना आणि हाव-भाव करताना श्वासासोबत खेळावे लागते. याचा त्यांना सराव असतो. मृत्यूच्या दृश्याच्या शूटिंगदरम्यान दीर्घ काळ श्वास रोखून धरावा लागतो. मी लिहिलेल्या 'कत्ल'ची नायिका श्वास घेण्यात चूक करत होती. त्यामुळे तिच्या आंधळ्या मारेकऱ्याने तिच्यावर नेम साधला होता. आवाजावर नेम साधण्याच्या शिक्षणाला द्रोणाचार्यांपासून सुरुवात झाली होती.
जयप्रकाश चौकसे यांचा सविस्तर लेख वाचण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...