आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पडद्यामागीलः मानवतेच्या उत्सवाचा 'रंग रसिया'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('रंग रसिया' या सिनेमाचे पोस्टर)

सिनेप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. केतन मेहता यांना आपला सिनेमॅटिक फॉर्म पुन्हा गवसला आहे. 'रंग रसिया' भारताच्या महान भव्य संस्कृतीचा उत्सव साजरा करणारा चित्रपट आहे. रंगांचा उत्सव साजरा करणाऱ्या या चित्रपटात मानवी शरीर आणि मनाच्या विविध रंगांची झलकही पाहायला मिळते. माणसाचे शरीरच निसर्गाचा उत्सव आहे. वेदव्यास महाभारतात लिहितात की, ज्या पाच घटकांपासून विश्वनिर्मिती झाली, त्याच पाच घटकांपासून मानवी शरीर तयार झाले आहे. विश्वामध्ये काही घटक एकमेकांच्या विरोधात असल्याचे दिसून येतात. जसे पाण्यामुळे आग विझते, पण मानवी शरीरात या घटकांचा ताळमेळ दिसून येतो. पोटात भुकेची आग लागल्याने पाचक लाळ तयार होते आणि भूक या पाचक लाळेमध्ये कोणतेच वैर नाही.
या चित्रपटामध्ये बालवयात चित्रे काढणाऱ्या नायकाचा जीवनपट आणि त्याच्या स्वत:शी असलेल्या द्वंद्वाचा तपशील आहे. यशासोबत अहंकार आणि त्याच्या शमनाची गाथा आहे. अशाच प्रकारे त्याची मॉडेल सुनंदाच्या मनातील द्वंद्वाचाही तपशील आहे. क्लायमॅक्सपूर्वी एक मैत्रीण आपली चित्रे राजा रवि वर्मा यांना देताना ती पाहते आणि वादाच्या आवेशात वर्मा म्हणतात, 'मेरी कल्पना के परे तुम्हारा कोई अस्तित्व नही है.' तिच्या काही धाडसी चित्रांच्या प्रिंट्स बाजारात आल्यानंतर तिचे जगणे कठीण होते. मात्र, न्यायालयामध्ये ती अभिमानाने म्हणते की, माझ्या सामान्य डोळ्यांमध्ये वर्मा यांनी 'देवी' पाहिली. मात्र, वर्मा यांच्या विरोधात बाजू मांडणाऱ्या वकिलास तिच्यातच 'वेश्या' दिसून येते. मुक्त असलेली केवळ स्त्रीच मानले जाऊ शकत नाही का? आपल्याला मॉडेलिंगच्या प्रक्रियेत आपल्या व्यक्तिमत्त्वाचे खरे सौंदर्य आणि संगीत समजले आहे, अशी ती साक्ष देते. आता अश्लीलतेच्या आरोपांचा खटला नवे वळण घेतो, पण निर्णायक कथन स्वत: वर्मा करतात. ते म्हणतात की, ही चित्रे काढण्यापूर्वी मी संपूर्ण देशाचा दौरा केला आहे. अजिंठा, वेरूळ, खजुराहो, कोणार्कला जाऊन आलो आणि सांस्कृतिक वारशाच्या प्रेरणेनेच या कलाकृती बनवल्या आहेत. ते कोर्टामध्ये या ठिकाणांची चित्रेदेखील सादर करतात. त्यांनी सर्व पुरातन ग्रंथही वाचले आहेत आणि त्याच कथा आपल्या चित्रांमध्ये साकारल्या आहेत.
वस्तुत: भारताची भव्य संस्कृती इंग्रजांच्या काळात व्हिक्टोरियन चष्म्यातून बघण्यात आली. त्यामुळे काही लोक या भव्य संस्कृतीला संकुचित करण्याचा प्रयत्न करतात. चित्रपटात चित्रकार आणि मॉडेल यांच्यातील संबंधही समजून घेण्याचा प्रयत्न करावा लागेल. मॉडेल केवळ माध्यम नसून माणूस आहे आणि चित्रकाराने तयार केलेल्या आपल्या सुंदर प्रतिमेला न्याहाळत कलावंताशीदेखील प्रेम करायला लागते. कलावंताच्या सुविधेसाठी तासन‌्तास स्थिर बसलेली मॉडेल हृदयात उठणारी भरती दाबून ठेवते आणि ती निर्मिती प्रक्रियेचा अविभाज्य घटक आहे. 'मोनालिसा'च्या मॉडेलचा शोध अनेक शतकांपासून सुरू आहे.
चित्रपटामध्ये अनेक शतकांपासून सुरू असलेल्या युद्धाच्या अनावश्यकतेला केतन मेहता रेखांकित करतात. ज्या मंदिराच्या बंद दरवाजाच्या बाहेरील भिंतीवर वर्मा यांनी बनवलेले राम, कृष्ण, हनुमानाचे चित्र लावलेले आहेत, तिथे रवि वर्मांची माजी सेविका त्यांना घेऊन जाते. तसेच ज्यांच्यासाठी मंदिराचे दरवाजे अनेक शतकांपासून बंद आहेत, ती जनता चित्रांमधील ईश्वराची आराधना करत आहे. वर्मा यांच्या लिथो प्रिंट्स गरिबातील गरीब आपल्या घरी लावून त्याची पूजा करतो. यादृष्टीने वर्मा यांनी धर्माचे काम केले आहे, पण धर्माच्या स्वयंभू ठेकेदारांना दुकानदारी बंद होण्याची भीती वाटली तेव्हा त्यांनी न्यायालयामध्ये वर्मांवर धर्माचे नुकसान केल्याचा दावा ठोकला. वर्मांना आश्चर्य होते की, धर्म, विज्ञान आणि कलेमध्ये विरोध कसा निर्माण केला जाऊ शकतो? तिघेही सत्याची इच्छा बाळगतात.
कबीर यांच्या 'घूंघट के पट खोल तोहे पिया मिलेंगे'चा अर्थ आहे, सत्यावर कोणताच पडदा पडलेला नाही, सर्व बुरखे (अहंकार, संपदा, छद्म ज्ञान, जात-पात, वर्णभेदाचे) स्वत: माणसानेच पांघरलेले आहेत. सत्य तर आवरणहीन आहे. शास्त्रज्ञ, कलावंत, सर्वच खरे धर्म भक्त सत्याचे समांतरण करण्यात गुंतले आहेत. 'रंग रसिया' बुरखा हटवण्याचा प्रयत्न आहे. सध्याच्या असहिष्णुतेच्या काळात हा चित्रपट गुणवत्तापूर्ण आहे. चित्रपटकलेत पारंगत असलेल्या केतन मेहता यांनी कमी बजेटमध्ये १९व्या शतकातील वातावरण विश्वासार्हतेने रचले आहे. लोकसंस्कृतीवर आधारित पहिला चित्रपट 'भवनी भवाई'चा थेट संबंध 'रंग रसिया'शी आहे. कारण दोन्हीही भव्य संस्कृतीला आदरांजली दिल्यासारखे आहेत.