आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पडद्यामागील: 'शमिताभ' अर्धवट मूकपणाचे गाणे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आर. बाल्की यांचा अमिताभ बच्चन यांच्यासोबत 'चिनी कम', 'पा'नंतर 'शमिताभ' हा तिसरा चित्रपट आहे. अमिताभ बच्चन आर. बाल्की यांच्या निर्मिती प्रक्रियेचा कणा असल्याचे मानले जाते. या चित्रपटात लंडन येथील रॉयल अकादमीत नायकाला निर्मिती प्रक्रियेवर भाषण देण्यासाठी निमंत्रित केले जाते. या दृश्यामध्ये बाल्की यांनी निर्मितीचा खुलासा केला नाही. फक्त प्रेक्षकांच्या प्रसन्न चेहऱ्यांवरून असा आभास होतो की, हे भाषण त्यांना चांगले वाटले. या खासगी निर्मिती प्रक्रियेबाबत त्यांची काहीच बोलण्याची इच्छा नसते. हा चित्रपट भारतीय चित्रपट सृष्टीला आदरांजली म्हणून तयार करण्यात आला आहे. पहिल्या गाण्यातूनच स्पष्ट केले आहे की, 'सिनेमा इश्क है, सिनेमा जुनून है', परंतु सिनेमातून स्वातंत्र्य लोप पावत असल्याची थट्टादेखील त्यांनी जोरदारपणे केली. उदाहरणार्थ, अमिताभ अभिनीत पात्राचे असे म्हणणे आहे की, जो उद्योग आपल्यासाठी स्वतंत्र नावदेखील शोधू शकला नाही, त्यामध्ये स्वतंत्र कथांची अपेक्षा कशी करता येईल. कारण हॉलीवूडशी मेळ बसवत बॉलिवूड म्हणणे आपला स्वत:चा अपमान केल्यासारखे आहे.
एका गाण्याचे छायांकन सुंदर निसर्गरम्य स्थळी कमोडचे विविध रूप दाखवून करण्यात आले आहे. शौचकूपाचा असा अभिनव प्रयोग साजिद खान आणि त्याची बहीण फराह खानच्या फिल्मी आकलनाचे जोरदार विडंबन आहे. इलेक्ट्रॉनिक माध्यमाने 'बॉलिवूड' नाव स्थापित केले. त्यावर 'माध्यमे तर चेहरे आणि आवाजामध्येही युद्ध घडवून आणू शकतात,' असे विडंबन केले आहे. बाल्की प्रतिभावंत असून आपल्या गंभीर कथानकांमध्ये मोठ्या प्रमाणात विनोद सादर करतात. या चित्रपटात तुम्ही खूप हसू शकता, खासकरून मध्यांतरापर्यंत. सखोल अर्थाच्या अनेक पातळ्या असलेल्या चित्रपटाची कथा साधी आहे. अमिताभ सिन्हा ४० वर्षांपूर्वी अभिनय करण्यासाठी आले, परंतु गहन, गंभीर घुमणाऱ्या आवाजामुळे त्यांना नाकारले. आकाशवाणीनेही त्यांना नोकरी दिली नाही. हा प्रसंग स्वत: बच्चन यांच्या वास्तव जीवनातून घेण्यात आला आहे. यामध्ये वास्तव जीवनाचे अनेक देखावे आहेत. उदा. रेखा नायकाला पुरस्कार देताना म्हणते, 'अपनी आवाज का ख्याल रखना.' हा नाकारलेला अभिनेता सनकी होतो आणि स्मशानात राहतो. तेथील अधिकृत सेवक त्यांना 'जहांपनाह' म्हणतो. तसेच हादेखील अमिताभ बच्चन यांच्या 'शहंशाह' चित्रपटाचा संदर्भ आहे.
दुसरा नायक जन्मत: मूक असून लहानपणापासूनच त्याची सिनेस्टार बनण्याची इच्छा असते. भारतातील खेड्यांमधील अनेक तरुणांची सिनेस्टार बनण्याची इच्छा असते. त्यांचे हे वेडच चित्रपटमय भारताचे वास्तव आहे. धनुषने ही भूमिका जिवंत केली आहे. त्याची स्टार बनण्याची तडफड, त्याचा अंतर्नाद आणि राग प्रेक्षकांसोबत भावनिक नाते तयार करतो. सिनेताऱ्यांचे एेश्वर्य आणि अहंकाराचे प्रतीक त्यांची भव्य व्हॅनिटी व्हॅन असते. बाल्की यांचा गरीब, महत्त्वाकांक्षी नायक एखाद्या सिनेताऱ्याच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये लपून अनेक दिवस घालवतो. व्हॅनिटी व्हॅन सिनेताऱ्याच्या विचारांमध्ये शिरण्याप्रमाणे आहे.
अमिताभ आणि धनुषसारख्या असामान्य प्रतिभावंत कलावंतांद्वारे अभिनीत पात्रांच्या हृदयातील अहंकार आणि अंधार असलेल्या चित्रपटामध्ये अक्षरा हसन दिव्य प्रकाशाप्रमाणे आपल्या उजेडाने चित्रपट संकल्पनेला सार्थकता देते. आई सारिकाप्रमाणे सुंदर आणि वडील कमल हसनप्रमाणे प्रतिभावंत आहे. हेच पात्र ज्यामध्ये धनुषचे तोंड आणि अमिताभ यांच्या संवादाची युती होते, त्या घटनाक्रमाचे संचालन करते. या प्रक्रियेत तंत्रज्ञानाचा एक अडथळादेखील आहे. दोन्ही पुरुष पात्र अहंकारामुळे व्यावहारिकतेला नाकारतात. त्यांच्यातील संपर्क आणि संतुलनाचे प्रतीक अक्षरा बुद्धी, व्यावहारिकता आणि एकमेकांमधील ताळमेळाच्या शक्तीचे प्रतीक आहे. पुरुषप्रधान चित्रपटाच्या तराजूचे दोन्ही पारडे समान ठेवण्याचे काम अक्षरा अभिनीत महिला पात्राने केले आहे. समाजामध्ये पुरुषप्रधान संस्कृतीचे वेड अक्षरा सहन करते आणि तिचे दु:ख, एटेपणा थेट प्रेक्षकाच्या हृदयाला भिडून समाजाची विसंगती विरोधाभासावर प्रहार करते. बाल्की यांच्या निर्मिती प्रक्रियेत गौरी शिंदेच्या प्रेरणेलादेखील अधोरेखित केले आहे.
बाल्की जीवनातील सामान्य वस्तूंमध्येही असामान्य सत्याचा शोध घेतात. अमिताभ स्वत:ला दारू आणि धनुषला केवळ पाणी समजतात, तर बाल्की दारूच्या बाटलीवर तथ्याच्या ४३ टक्के अल्कोहोल आणि ५७ टक्के पाण्यापासून तयार होणारे सत्य समोर आणतात. हा चित्रपट गिरीश कार्नाड यांच्या 'हयवदन' नाटकाची आठवण करून देतो. या नाटकात नायिका पूर्णत्वासाठी कवीचे डोके पहिलवानाच्या शरीरावर आणि पहिलवानाचे डोके कवीच्या शरीरावर लावते. मात्र, कालांतराने दोघेही पूर्वीसारखेच होतात. बाल्की यांनी 'शमिताभ' या टायटलद्वारेच सर्वकाही सांगण्याचा प्रयत्न केला आहे. धनुषचा 'श' अमिताभ यांच्या 'मिताभ'शी जोडलेला आहे. हा एक विरळ चित्रपट असून याच्या माध्यमातून अर्धवट भारतीय सिनेमा पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यामध्ये अर्थाच्या सर्व पातळ्यांपर्यंत जाण्यासाठी प्रयत्न करावा लागणार आहे.