आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पडद्यामागील : सिनेताऱ्यांचे प्रेमविवाह

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः रति अग्निहोत्री)

रति अग्निहोत्रीने कमल हासनसोबत 'एक दुजे के लिए' या हिट चित्रपटाद्वारे आपल्या करिअरची सुरुवात केली होती. शिवाय त्यानंतर अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये तिने उत्कृष्ट अभिनय केला. यामध्ये बलदेवराज चोप्रा दिग्दर्शित 'तवायफ'मधील तिच्या अभिनयाची बरीच प्रशंसा करण्यात आली. आपल्या करिअरच्या मध्यांतरामध्ये तिने आई-वडिलांच्या विरोधात जाऊन एका आर्किटेक्टसोबत प्रेमविवाह करत फिल्मी दुनियेला अलविदा केला. काही दिवसांपूर्वीच तिने आपल्या पतीविरोधात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार पोलिस ठाण्यात नोंदवली आहे. रति अग्निहोत्रीने तक्रारीमध्ये म्हटले की, संपूर्ण कुटुंबाचा विराोध पत्करून केलेला प्रेमविवाह अयशस्वी होईल, या भीतीने मी अनेक वर्षे हा अत्याचार सहन करत होते.

ज्या आठवड्यामध्ये ही तक्रार नोंदवण्यात आली त्याच आठवड्यामध्ये दीपिका पदुकोणचा 'माय चॉइस' हा व्हिडिओ प्रदर्शित झाला होता. 2 मिनिटे 34 सेकंदांच्या या व्हिडिओचे दिग्दर्शन होमी अदजानियाने केले आहे. स्त्री-पुरुष समानता ही केवळ बोलण्याची गोष्ट नसून ती तुमच्या कृतीतूनही दिसली पाहिजे, हा या व्हिडिओमागचा साधारणत उद्देश होता. महिलांनाही स्वत:च्या इच्छेप्रमाणे जगण्याचा अधिकार आहे. यावर व्हिडिओच्या माध्यमातून भाष्य करण्यात आले. 'फॅशन' मासिकामध्ये महिलांचे केले जाणारे धाडसी चित्रीकरण हे या मासिकांच्या खपाचे प्रमुख कारण आहे. या दोन घटनानंतर एका पत्नीला बळजबरीने 'सती' पाठवण्यात आल्याची बातमी ऐकायला मिळते. काही दिवसांपूर्वी अनुष्का शर्माचा 'एनएच १०' प्रदर्शित झाला आहे. सारांश हा की, स्त्री-पुरुष समानतेचा प्रश्न पुन्हा प्रकाशात आला आहे. अनेक शतकांपासून चालत आलेली ही मोहीम यशस्वी होईल, याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
लैंगिक संबंध विवाहापूर्वी किंवा नंतर हा आपल्या व्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा आहे, हे दीपिका पदुकोनचे वक्तव्य वादग्रस्त आहे. लैंगिक संबंधांबाबतचे स्वातंत्र्य पुरुषांना आहे, ते स्त्रियांना नाही. पुरुषांच्या बाबतीत याला 'विजय' म्हटला जातो, तर दुसरीकडे मात्र महिलांच्या बाबतीत याला लज्जित होणे असे म्हटले जाते. एकेकाळी अनेक लग्नं पहिल्या रात्रीच मोडले जात असत. कारण चादरीवर केवळ रक्ताचे डाग नाहीत म्हणून. या आध्यात्मिक देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारे शरीराची पवित्रता आणि कुमार वयाच्या कथा रंगवण्यात आल्या आहेत. मात्र, हे प्रकरण हृदयाच्या कुमारवयाचे आहे. प्रेमप्रसंगामध्ये हृदय कधी आणि केव्हा गौण झाले आणि शरीराने प्रमुखाची जागा घेतली, हे समजत नाही.
पुढे वाचा, उर्वरित लेख...