आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पडद्यामागील : तनू आणि राज शेखर यांची 'घरवापसी'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आनंद राय यांचे 'तनू वेड्स मनू' आणि 'रांझणा' हे चित्रपट ताज्या हवेप्रमाणे होते. आता चार वर्षांनंतर ते 'तनू वेड्स मनू'चा दुसरा भाग घेऊन येत आहेत. याचदरम्यान कंगनाने 'क्वीन'च्या माध्यमातून नवी लोकप्रियता मिळवली आहे. आता तिने आपल्या समकालीन अभिनेत्रींपेक्षा वेगळी ओळख निर्माण केली आहे. 'रांझणा'च्या यशाने आनंद राय यांनादेखील नवी ओळख दिली आहे. 'तनू'चे गीतकार राज शेखरही आपल्या 'घरी' परतले आहेत. 'तनू'च्या पहिल्या भागाचे 'खाकर अफीम रंगरेज पूछे रंग का कारोबार क्या है' हे उत्कृष्ट गीत होते. त्यामुळे दुसऱ्या भागाची सर्वांनाच प्रतीक्षा असेल.
नाट्यमय परिस्थितींमध्ये तनूला लंडन येथील शर्मा यांच्यामध्ये आपला जोडीदार दिसून येतो, पण शर्मा व्यग्र असतो आणि तनू कंटाळलेली असते. पहिल्या भागातील या शेवटापासूनच दुसऱ्या भागाची सुरुवात होते. जर देवदास आणि पारो यांचे लग्न झाले असते, तर सर्व शेजाऱ्यांनी त्यांच्या भांडणाचा आनंद लुटला असता, हा विचार कुणी केला का? अनेकदा प्रेमविवाह तुटण्याच्या मार्गावर असतात. कारण प्रेमाच्या काळात एकमेकांबद्दल असलेले आकर्षण लग्नानंतर दैनंदिन जीवनाच्या धावपळीमध्ये वास्तवाशी धडकून त्याचे तुकडे-तुकडे होतात. वस्तुत: पती-पत्नीने आपले प्रेम टिकवण्यासाठी संवेदनशील होण्यासह अन्वेषकही झाले पाहिजे. जेणेकरून नवे इंधन प्रेमाची ज्योत कायम तेवत ठेवू शकेल. कल्पनाशीलतेच्या अभावाला वास्तव निर्दयी असल्याचा बहाणा बनवला जातो. खूप व्यग्र असलेली व्यक्तीदेखील काही क्षण चोरू शकतो. वस्तुत: सामान्य माणसाला आयुष्याच्या जत्रेत पाकीटमाराप्रमाणे आनंद चोरून आणावा लागतो. हे चौर्य कर्म शास्त्रांनाही मान्य नाही.
कंटाळलेली तनू इंग्रज मॅडम बनून आपल्या घरी परत येते आणि पश्चात्ताप करणारा पतीदेखील भारतात येतो. मात्र, त्याची भेट हुबेहूब तनूसारखी दिसणाऱ्या हरियाणवी खेळकर मुलीशी होते. जणू काही चित्रपट एखाद्या दंगलीप्रमाणे असेल आणि त्यात इंग्रजी मॅडम थेट हरियाणवी खेळकर मुलीशी सामना करणार आहे. जेव्हा एखादी भारतीय महिला विदेशातून परत येते, तेव्हा ती मूळ मॅडमपेक्षा जास्त नखरेबाज होते. ओढलेले व्यक्तिमत्त्व तीव्रच असते. जसे आपण नेत्यांमध्ये पाहतो. कल्हई केलेले भांडे नेहमी अस्सल तांब्याच्या भांड्यापेक्षा चकाकणारे वाटते. तथापि, हे स्पष्ट आहे की, आनंद राय यांनी दुसरा भाग कंगनामधील बहुमुखी कौशल्य पाहूनच रचला आहे. भारतीय चित्रपट उद्योगात नेहमीच यशस्वी सिनेताऱ्यांना पुन्हा नव्या चित्रपटांमध्ये घेण्याचा प्रयत्न केला जातो. सिनेताऱ्याच्या बैलावर कितीही ओझे ठेवता येऊ शकते. अशाच प्रकारे स्टार कोल्हू बैलाच्या रूपात बदलला जातो आणि प्रेक्षकाचा संयम त्याची साथ सोडतो. मात्र, हाच प्रेक्षक राजकीय कोल्हूच्या बैलाला दीर्घ काळ सहन करतो. कारण व्यवस्थेच्या विरोधात असण्याचा त्याने लाख अभिनय केला तरी कुठे ना कुठे त्याच्या सुप्त मनात या भ्रष्ट व्यवस्थेबद्दल प्रेम आहे. अदूरच्या एका चित्रपटामध्ये क्रांतीच्या वेळी शोषित बंधूच्या हातात तलवार आहे, पण तो आपल्या मालकाला मारू शकत नाही. अनेक शतकांपासूनची गुलामी त्याच्यामध्ये आत्मविश्वासाचा अभाव निर्माण करते आणि हेच शोषणाचे सर्वात मोठे षड्यंत्र आहे.
तनूच्या पुनरागमनासह याचे गीतकार राज शेखर यांच्या पुनरागमनामुळे आम्हाला पुन्हा 'अफीम खाये रंगरेज'ची अवस्था पाहायला-ऐकायला मिळेल. आनंद राय यांच्या चित्रपटाची शूटिंग लखनऊ, कानपूर, हरियाणा, लंडन येथे झाली आहे. या चित्रपटात पाश्चात्त्य आणि पूर्वेकडील संस्कृतींची धडक होत नाही, तर ही सौहार्दाची कथा आहे. तनू छोट्या गावातून लंडनला जाते आणि तेथून मॅडम बनून भारतात परत येते, पण तिचे मन अजूनही भारतीयच असते. खरे म्हणजे ती एक प्रेमिका आहे, पण तिने विद्रोहाचा मुखवटा लावला आहे. ज्या पतीला ती कंटाळली होती, त्या पतीला दुसऱ्या स्त्रीकडे आकर्षित होताना पाहून ती पुन्हा आपल्या प्रेमासाठी लढते. या चित्रपटामध्य प्रेमाचा त्रिकोण आहे आणि यात मानवी भावनांचा सूक्ष्म तपशील पाहायला मिळतो. विविध संस्कृती कधीच एकमेकांना धडका देत नाहीत. त्या द्रवरूपी असतात आणि एकमेकांना भेटून नवा प्रभाव निर्माण करतात.
बातम्या आणखी आहेत...