आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोठे स्टार एकत्र काम का करत नाहीत ?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सलमान, आमिर आणि शाहरुख या तीन नायकांना सोबत घेऊन साजिद नाडियाडवाला एक चित्रपट बनवणार असल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी प्रकाशित झाले होते. मात्र, दुसऱ्याच दिवशी आमिर खानने या वृत्तास निराधार म्हणत त्यातील हवा काढून टाकली. अमेरिकेत तीन मोठे स्टार एकत्र काम करतात.
पटकथेवर तिघेही स्वाक्षऱ्या करतात आणि भारतात मात्र निर्मितीच्या वेळी पटकथा बदलली जाते. तथापि, एकत्र चित्रपट केल्यावर त्यामध्ये कोणाची भूमिका जास्त महत्त्वाची या मुद्द्यावरून चित्रपटाची निर्मितीच रखडली जाते. चित्रपटातील पात्र हे दिग्दर्शकाच्या बाहुल्या असल्याचे तिघांनाही माहीत आहे. यापेक्षाही निर्णायक गोष्ट म्हणजे तिघांच्या चाहत्यांच्या गोटांमध्ये तिघांपेक्षाही जास्त आक्रमकता, पूर्वग्रह आणि अंधत्व आहे. हेच प्रमुख मुद्दे तिघांना एकत्र काम करू देत नाहीत. इथे राजा हा जनतेच्या इच्छेचा एकप्रकारे गुलाम आहे. चाहते वेडे असतात आणि हे वेडच बॉक्स ऑफिसचा आधार बनला असल्याचे दिसते.
राजकारणाचा आधारही जनतेचे वेड आहे. त्यामुळे वैयक्तिक स्वतंत्र विचारधारा विकसित होऊ नये, यासाठीच संस्थात्मक प्रयत्न होत आहेत. राज कपूर यांनी 'संगम'ची पटकथा दिलीप कुमार यांना दिली आणि म्हणाले की, 'दोन नायकांपैकी एकाची निवड करा, अमर्याद पैसादेखील उपलब्ध आहे.' दिलीप कुमार यांना गोटांची आणि चाहत्यांच्या वेडाची माहिती होती. त्यांनी यास नकार दिला आणि म्हणाले, 'मुद्दा पैसा आणि भूमिकेचा नाही, तर ज्या चित्रपटाचा दिग्दर्शक राज कपूर असेल, तो चित्रपट राज कपूर यांचाच असतो.' 'जिस देश में गंगा बहती है'चे अधिकृत दिग्दर्शक राधू करमरकर होते, परंतु चित्रपट राज कपूर यांचाच असल्याचे म्हटले गेले. याच धर्तीवर 'गंगा जमना'चे दिग्दर्शक नितीन बोस होते, पण तो पूर्णपणे दिलीप कुमार यांचाच चित्रपट असल्याचे म्हटले गेले.
'संगम'च्या १५ वर्षांपूर्वी म्हणजे १९४९ मध्ये मेहबूब खान यांच्या दिग्दर्शनामध्ये नर्गिस, राज कपूर आणि दिलीप कुमार यांनी काम केले होते. तेव्हा दोघेही नवोदित कलावंत होते. रमेश सहगल यांच्या 'शाहीद'ने दिलीप यांना आधीच स्टार बनवले होते आणि नंतर 'बरसात'ने राज कपूर यांनादेखील स्टार बनवले. मात्र, देशाचे विभाजन झाले असले तरी, दोघांच्या चाहत्यांची गटांमध्ये विभागणी झाली नव्हती. दिग्दर्शक मेहबूब खान दोघांपेक्षा मोठे स्टार होते. त्यामुळे 'अंदाज'ची निर्मिती होऊ शकली. तेव्हा नर्गिस यांची लोकप्रियता दोघांपेक्षाही जास्त होती. राज कपूर, दिलीप कुमार आणि देव आनंद यांच्या काळात मीडिया एवढा व्यापक नव्हता. देशामध्ये बोटावर मोजण्याइतकी चित्रपट नियतकालिके होती. आज प्रत्येक वृत्तपत्रातील काही पाने चित्रपटांच्या बातम्यांसाठी राखून ठेवलेली असतात. चित्रपटांच्या चॅनलसोबतच न्यूज चॅनल्सवरही करमणुकीसाठी भरपूर वेळ दिला जातो. चित्रपट उद्योगामध्ये दररोजच खळबळजनक अथवा गॉसिप करण्यासारखे काही घडत नाही, पण मीडियाला तशा बातम्या बनवाव्या लागतात. बातम्यांच्या या पावसामध्ये खरी बातमी ओळखणे कठीण काम आहे. मीडियाने सिनेताऱ्यांबद्दलचे वेड गगनावर पोहोचवले आहे.
काही लोक या वेडाला नाकारतात आणि हा त्यांचा हेकेखोरपणा आहे. अशाच एका माणसाला स्टारच्या बाजूची सीट मिळाली. औपचारिकता म्हणून दोघेही एकमेकांना हॅलो म्हणाले, एकमेकांचे नाव विचारले. हेकेखोर असलेल्या त्या माणसाने सर्व काही माहीत असतानाही स्टारला विचारले की, 'तुम्ही काय काम करता?' त्याच्या बोलण्यातील गोम ओळखून स्टार म्हणाला, 'मी बाटा शू कंपनीचा सेल्समन आहे.' तो माणूस म्हणाला, 'खोटे का बोलता, तुम्ही तर चित्रपट कलावंत आहात?' स्टार म्हणाला, 'तुम्ही म्हणत असाल तर मी मानतो, पण मी सेल्समनच आहे.' त्या हेकेखोराने अखेर माफी मागत त्या स्टारची मोठी चाहती असलेल्या आपल्या मुलीसाठी ऑटोग्राफ घेतला. स्टारने ऑटोग्राफच्या खाली आपण सेल्समन असल्याचेच लिहिले. हे खरे आहे की, या बाजार युगात आपण सर्वच सेल्समन आहोत, प्रत्येकजण काही ना काही विकतच आहे. कपाळावर प्राइस टॅग लावलेला आहे. काही ठिकाणी तसा भावसुद्धा होतो. बाजारात मागणी वाढली की किंमतही वाढते. बाजाराचे नियंत्रक अनेकदा बोगस मालाची नकली डिमांडही निर्माण करतात. न्यूयॉर्कमध्ये शेअर बाजाराच्या गल्लीचे नाव 'वॉल स्ट्रीट' आहे. जेव्हा ती तुटते तेव्हा अनेक लोकांचे दिवाळे निघते. याचा प्रभाव हा विश्वव्यापी आहे. मुंबईत शेअर मार्केटला दलाल स्ट्रीट म्हटले जाते. जे. पी. दत्ता यांच्या'बंटवारा'मध्ये एक वृद्ध दलाल आपल्या मुलाला म्हणतो की, दलाल प्रत्येक कालखंडात होते आणि स्वतंत्र भारत दलालीचा सुवर्णकाळ असेल.
बातम्या आणखी आहेत...